हल्ली मोबाईल फोन म्हटलं की कमीत कमी ४ ते ५ इंचाची टच स्क्रीन असणारा मोठा स्मार्टफोन डोळ्यासमोर येतो. मोबाईल फोन जेव्हा लोकप्रिय होत होते त्यावेऴी मोबाईलचा आकार लहान ठेवण्याकडे कल होता मात्र स्मार्टफोन क्रांतीनंतर मोबाईलचे आकार वाढताना दिसत आहेत. अशातच ‘द झॅन्को टायनी टी वन’ या नावाचा जगातील सर्वात छोट्या आकाराचा फोन बाजारात येणार आहे. छोटा म्हणजे हा फोन चक्क अंगठ्याच्या लांबी इतकाच उंच आहे. तर या फोनचे वजन दहा रुपयांच्या नाण्याइतकेच म्हणजेच अंदाजे १३ ग्रॅमपर्यंत असणार आहे.

ब्रिटनमधील क्युबीट न्यू मिडीया कंपनीच्या संकल्पनेतून साकारलेला हा फोन म्हणजे जगातील सर्वात लहान फंक्शनल फोन आहे. पण हा फोन दिसायला इतका छोटा आणि नाजूक आहे की पहिल्यांदा पहिल्यावर तो लहान मुलांच्या खेळण्यातला फोन वाटेल. हा फोन टूजी तंत्रज्ञानावर काम करेल. तसेच यामध्ये तीन तासाचा टॉक टाइमसाठी पुरेल इतकी दोनशे एमएएजची बॅटरी देण्यात आली आहे. नव्वदच्या दशकामधील सर्वच फोनला याच क्षमतेची बॅटरी होती हे विशेष.

Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Schoolboy commits suicide after not getting mobile phone sangli
सांगली: मोबाईल न मिळाल्याने शाळकरी मुलाची आत्महत्या
Today is the shortest day and longest night of the year
आज वर्षातील सर्वात लहान दिवस व सर्वात मोठी रात्र, जाणून घ्या नेमकं असं का?
Central Railways 76.43 km automatic signalling from varangaon to akola
अकोला : मध्य रेल्वेचे ७६.४३ कि.मी.चे स्वयंचलित ‘सिग्नलिंग’, फायदे काय जाणून घ्या…
Poco C75 and Poco M7 Pro launched in India
Poco C75 : भारतातला सर्वांत कमी किमतीचा ५जी स्मार्टफोन! 50MP ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपसह असणार अनेक फीचर्स
OnePlus 13 and OnePlus 13R launch in India
वर्षाची सुरुवात होणार धमाकेदार! स्लिम डिझाइन, शानदार कॅमेरा लेआउटसह OnePlus 13 भारतात होणार लाँच
Loksatta kutuhal Artificial intelligence helps during COVID
कुतूहल: कोविडकाळात कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत

‘द झॅन्को टायनी टी वन’ची स्क्रीन १२.५५ मिलीमीटरची ओएलडी स्क्रीन असणार आहे. या फोनची रॅम ३२ जीबी असेल तर इंटर्नल मेमरीही ३२ जीबीची असणार आहे. या फोनमध्ये नॅनो सिम वापरता येईल. तसेच युएसबी, ब्लूटूथचीही सुविधा देण्यात आली आहे. ३०० फोन नंबर सेव्ह करण्याबरोबरच ५० फोन कॉल्सचा रेकॉर्ड आणि ५० एसएमएस राहण्याइतकी या फोनची क्षमता असणार आहे. या फोनमध्ये इंटरनेट वापरता येणार नाही. फोनच्या तळाशी माईक आणि लाऊडस्पीकर असतील.

विशेष ऑफरमध्ये हा फोन केवळ ३० युरो म्हणजेच २ हजार २८० रुपयांपर्यंत उपलब्ध होईल. हा फोन १९ जानेवारीला लॉन्च होणार आहे. तरी जगभरातील वेगवगेळ्या देशांमधील ग्राहकांना हा फोन मे २०१८ पासून डिलीव्हर करण्यात येणार असल्याचे समजते.

Story img Loader