अमेरिकेतील संशोधकांचा दावा
झिका विकारावर डेंग्यूची लस परिणामकारक असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. त्यामुळे झिका निर्मूलन अभियानाला गती मिळण्याची आशा संशोधकांनी व्यक्त केली.
झिकाप्रमाणेच पिवळ्या रंगाच्या वायरसमधून पसरणाऱ्या डेंग्यूमुळे जगभरातील १२० देशांमध्ये वर्षांला ३९० दशलक्ष लोकांना या आजाराची लागण होते. तसेच या आजाराची लक्षणे जरी सौम्य असली तरी वर्षांला दोन दशलक्ष लोकांमध्ये डेंग्यू झाल्यानंतर होणाऱ्या रक्तस्रावासोबतच प्रंचड डोकेदुखी, डोळ्यांच्या मागील भागात दुखणे, पुरळ, सांधेदुखी, स्नायू किंवा हाडांचे दुखणे आणि रक्तवाहिन्यांना होणारा दाह यांसारखी लक्षणे आढळून येतात, तर २५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू हा डेंग्यूमुळे होतो.
‘नव्याने संशोधन करण्यात आलेल्या लसीबाबत आम्हाला माहिती असून ती परिणामकारक असल्याची आम्हाला खात्री आहे. कारण डेंग्यू हा विचित्र आजार आहे आणि त्याविषयीचे संशोधन योग्य झाले नाही तर चांगल्यापेक्षा घातक परिणामांना सामोरे जावे लागेल,’ असे जोहान्स होपकिन्स विद्यापीठातील बोल्मबर्ग स्कूल ऑफ हेल्थशी सलंग्न आरोग्य हेल्थच्या प्राध्यापिका अ‍ॅना डरबीन यांनी सांगितले.
टीव्ही ००३ नामक या लसीचे ४८ जणांच्या एका गटावर परीक्षण करण्यात आले. त्यापैकी अर्धा लोकांना ही लस टोचण्यात आली, तर अर्धा लोकांना औषधाप्रमाणेच एक पर्याय(प्लेसेबो)चे सेवन करण्यास देण्यात आले.
टीव्ही ००३ ची निर्मिती अमेरिकेच्या आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय संस्था (एनआयएच)मध्ये करताना संशोधकांनी डेंग्यूच्या चार लक्षणांवर ते परिणामकारक आहे किंवा नाही यांची पडताळणी केली. या वेळी १५ वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या टीव्ही ००३ च्या परीक्षणात प्रगती होताना डेंग्यूच्या एक, तीन आणि चारच्या विषाणूंना अटकाव झाल्याचे दिसून आले.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा