जागतिक आरोग्य संस्थेचे स्पष्टीकरण
झिकावरील औषधांच्या निर्मितीसाठी मोठय़ा स्वरूपात सुरू असलेल्या प्रयत्नांच्या निष्पत्तीसाठी अजूनही १८ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता असून आठवडय़ापूर्वी रोगजंतू आणि हानिकारक अशा दोन परिस्थितींमध्ये आढळलेली समानता यात संबंध असण्याची शक्तता नाकारता येत नाही, असे जागतिक आरोग्य संस्थेने(डब्ल्यूएचओ)ने शनिवारी सांगितले.
जागतिक चितेंचे कारण बनलेल्या या धोकादायक रोगजंतूंवरील औषधाच्या निर्मितीसाठी अंदाजे १५ कंपन्या किंवा विविध गट कार्यरत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संस्थेच्या आरोग्य सेवा आणि नव संशोधन विभागाच्या उपसंचालक मेरी-पॉल कायने यांनी पत्रकारांना दिली. सध्या तरी अमेरिकेच्या ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ’ आणि भारतातील ‘भारत बायोटेक’ या कंपन्यांनी औषधनिर्मितीचा केलेला दावा सर्वात उपयुक्त वाटत असून या आशादायक दाव्यांव्यतिरिक्त औषधाच्या निर्मितीसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नाची निष्पत्ती किमान १८ महिन्यांच्या कालावधीनंतरच होईल, असे कायने यांनी सांगितले.
झिकाने प्रभावित झालेल्या अनेकांमध्ये ‘गिलेन-बारे’ या आजाराची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत, पण या रोगजंतूचा दोन गंभीर परिस्थितीशी जोडला जाणारा संबंध हा नव्या विंवचनेला कारणीभूत ठरत आहे. ‘मायक्रोपेली’ हा आजार लहान मुलांमध्ये जन्मत:च छोटे मस्तक आणि मेंदूला तर ‘गिलेन बारे’ हा पक्षाघात किंवा मृत्यूसाठीदेखील कारणीभूत ठरतो, असे कायने म्हणाल्या.
झिकाचा प्रादुर्भाव हा डासांमुळे होत असून लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन भागात त्याचा प्रसार अधिक वेगाने होत आहे. त्यामुळेच प्रादुर्भाव असलेल्या भागातील महिलांना गर्भधारणेपासून काही काळ दूर राहण्याचे आवाहन तेथील सरकारने केले आहे.
या आजाराचा सर्वात जास्त फटका ब्राझीलला बसला असून २०१५ पासून १.५ दशलक्ष लोकांना झिकाची बाधा झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पध्रेच्या आयोजनाविषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. उपलब्ध औषधे प्राथमिक असून प्रगत परीक्षणांचीही नितांत गरज आहे. त्यामुळे अंदाजे २० कंपन्यांकडून वेगवेगळ्या पातळ्यांवर निदान करण्याच्या वेगवेगळ्या श्रेणींचे आणि जलद परीक्षणाच्या पद्धतींचा वापर प्राथमिकतेने दुर्गम भागांमध्ये केला जाऊ शकतो, असे मत कायने यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा