जागतिक आरोग्य संघटनेचा दावा
जागतिक आरोग्य संस्थेने (डब्ल्यूएचओ) ‘झिका’ रोगजंतूचा संबंध क्वचितच मज्जातंतूमध्ये विस्कळीतपणा आणणाऱ्या ‘गुलिअन-बारे’शी जोडण्याबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. झिका आणि गुलिअन-बारे यांच्यात साधम्र्य नाही, असे डब्ल्यूएचओने सांगितले आहे. कोलंबियात गुलिअन-बारे या आजाराने तिघांचा मृत्यू झाला आहे.
अहवालत नमूद केलेल्या तीन मृतांमध्ये ‘गुलिएन-बारे’ आजाराची लक्षणे आढळून आली असून त्याचा ‘झिका’ या आजारांशी संबंध जोडण्याबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संस्था (डब्ल्यूएचओ)चे प्रवक्ता ख्रिस्तियन लिंडमेइर यांनी केले आहे. या तिघांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती नष्ट करून आणि मज्जातंतूवर आघात करून ‘शारीरिक कमकुवतपणा’ आणि ‘लकवा’ला कारणीभूत ठरणाऱ्या ‘गुलिअन-बारे’ या आजारांची लक्षणे आढळून आली होती.
अशा स्वरूपाची लक्षणे असलेल्या गटांची संख्या वाढली असून ‘झिका’ रोगजंतूने लॅटिन अमेरिकेचा बहुतांश भाग व्यापला आहे. सगळ्यांनी सावधगिरी बाळगण्याची गरज असून दोन्ही आजारांना एकत्रित करण्याचे टाळणे गरजेचे असून या आजारांमध्ये काही संबंध असल्याचे अद्याप तज्ज्ञांमार्फत सिद्ध झाले नसल्याचे लिंडमेइर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ब्राझीलनंतर ‘झिका’ या आजाराची सर्वात जास्त झळ बसणारा कोलंबिया हा देश असून दोन हजार गर्भवती महिलांसह आतापर्यंत २० हजार नागरिकांना या आजाराची लागण झाली आहे. डब्ल्यूएचओने ‘झिका’विरोधात लढण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी बुधवारी अमेरिका आणि अन्य देशांत झपाटय़ाने पसरणाऱ्या ‘झिका’ला प्रतिबंध करण्यासाठी १.८ अब्ज डॉलरच्या अतिरिक्त निधीची तातडीने तरतूद करण्याचे निर्देश दिले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा