Lok Sabha Election Results 2024 (लोकसभा निवडणूक निकाल २०२४)

लोकसभा निवडणूक २०२४ चा बिगुल वाजला आहे. यावेळी प्रमुख लढत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी यांच्यात होत आहे, एकीकडे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीए आघाडीचं नेतृत्व करत असताना दुसरीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीनं अद्याप पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. मित्रपक्षांमध्ये एनडीएकडे भाजपाव्यतिरिक्त जनता दल संयुक्त, जनता दल धर्मनिरपेक्ष, तेलुगु देसम पार्टी, राष्ट्रीय लोकदल यांच्यासह सुमारे ३३ पक्ष आहेत. तर दुसरीकडे इंडिया आघाडीमध्ये काँग्रेससह द्रमुक, समाजवादी पक्ष, माकप आणि आम आदमी पक्ष यांच्यासह सुमारे ४० पक्ष आहेत. यावेळी भाजपाकडून अब की बार, चारसौ पारचा नारा देण्यात आला आहे. तर इंडिया आघाडीकडून भाजपाला सत्तेपासून रोखण्याचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलं आहे.

७ टप्पे
९७ कोटी
मतदार
३.४ लाख पोलीस
४ जूनला निकाल
ECI ची
स्थापना – १९५०
किमान वयोमर्यादा

भारतात दर पाच वर्षांनी लोकसभेच्या निवडणुका होतात. येत्या पाच वर्षांत देश कोणत्या दिशेनं वाटचाल करेल हे या निवडणुकांच्या निकालांमधून स्पष्ट होतं. यंदा देश १८व्या लोकसभा निवडणुकांना सामोरा जात आहे. भारतात १९५२ मध्ये पहिल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या. देशात झालेल्या निवडणुकांचा इतिहास आपण आता जाणून घेऊयात…

पहिली लोकसभा निवडणूक १९५२
  • ५३ पक्षांचा सहभाग, २६ राज्य आणि ४८९ जागांसाठी मतदान
  • पहिल्या निवडणुकीत मतदानासाठी वयोमर्यादा होती २१ वर्षे
  • काँग्रेसनं २४५ जागांवर विजय मिळवला, जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान बनले
दुसरी लोकसभा १९५७
  • यावेळी काँग्रेसला ४७.७८ टक्के मतांसह २९६ जागांवर विजय मिळाला
  • फिरोज गांधींनी रायबरेलीहून निवडणूक लढवली
  • यावेळी एकही महिला उमेदवार निवडणुकीत नव्हती
  • याच काळात हरित क्रांतीला सुरुवात झाली होती
तिसरी लोकसभा १९६२
  • ऑक्टोबर महिन्यातच भारत-चीन युद्ध झालं
  • मे १९६४ मध्ये नेहरूंच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले
  • १९६५ साली पाकिस्तानला भारतानं युद्धात हरवलं
  • शास्त्रींच्या निधनानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या
चौथी लोकसभा १९६७
  • लोकसभा आणि काही विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसला
  • इंदिरा गांधी पंतप्रधान तर मोरारजी देसाई अर्थमंत्री झाले
  • १९६९ मध्ये मोरारजी देसाईंनी काँग्रेस (O) स्थापन केली
  • डिसेंबर १९७० पर्यंत इंदिरा गांधींनी माकपच्या मदतीने अल्पमतातलं सरकार चालवलं
पाचवी लोकसभा १९७१
  • अल्पमतामुळे इंदिरा गांधींनी मुदतपूर्व निवडणुका लावल्या
  • ‘गरिबी हटाओ’च्या घोषणेमुळे काँग्रेसला मोठं बहुमत मिळालं
  • १९७१मध्ये भारत-पाकिस्तान युद्धामुळे बांगलादेशची निर्मिती झाली
  • अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालानंतर इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित केली
सहावी लोकसभा १९७७
  • आणीबाणी हटवल्यानंतर निवडणुका झाल्या, काँग्रेस पहिल्यांदाच सत्तेबाहेर पडली
  • जनता पक्षाचे मोरारजी देसाई पंतप्रधान झाले
  • जनसंघानं सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर चरणसिंह पंतप्रधान झाले. पण त्यांना बहुमत सिद्ध करता आलं नाही.
सातवी लोकसभा १९८०
  • काँग्रेसनं ३५१ जागांसह मोठं बहुमत मिळवलं
  • जून १९८४ मध्ये अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात ऐतिहासिक ऑपरेशन ब्लू स्टार राबवलं गेलं
  • ऑक्टोबर १९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशातील वातावरण बिघडू लागलं
आठवी लोकसभा १९८४-८५
  • राजीव गांधी ४०३ इतक्या प्रचंड बहुमतानं देशाचे पंतप्रधान झाले
  • राजीव गांधींनी पक्षांतर बंदी कायदा आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण आणलं
  • राजीव गांधींनी IPFK ला श्रीलंकेला पाठवलं
  • बोफोर्ससारखे भ्रष्टाचाराचे अनेक आरोप सरकारवर झाले
नववी लोकसभा १९८९
  • काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला, पण बहुमत मिळू शकलं नाही
  • भाजपाला ८९ जागा मिळाल्या, नॅशनल फ्रंटनं सरकार स्थापन केलं
  • आधी व्ही. पी. सिंह आणि नंतर चंद्रशेखर पंतप्रधान झाले
  • निवडणुकीत जात-धर्माच्या राजकारणाचा उदय झाला
  • राम जन्मभूमीचा वाद चिघळला, आडवाणींनी देशभर रथयात्रा काढली
१०वी लोकसभा १९९१
  • निवडणुकीत मंडल आयोग आणि राम मंदिराचा मुद्दा चर्चेत राहिला
  • निवडणुकांदरम्यान राजीव गांधींची हत्या झाली
  • काँग्रेसला निवडणुकीत २३२ तर भाजपाला १२० जागा मिळाल्या
  • नरसिंह राव पंतप्रधान झाले, मनमोहन सिंग अर्थमंत्री झाले
  • देशात आर्थिक सुधारणा राबवल्या गेल्या
११ वी लोकसभा १९९६
  • १६१ जागांसह भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला, काँग्रेसला १४० जागा मिळाल्या
  • १३ दिवसांत वाजपेयी सरकार कोसळलं, १८ महिन्यांसाठी देवेगौडा पंतप्रधान झाले
  • देवेगौडा यांच्यानंतर इंद्र कुमार गुजराल यांनी पंतप्रधानपद सांभाळलं
१२ वी लोकसभा १९९८
  • अटल बिहारी वाजपेयी १३ महिन्यांसाठी पंतप्रधान झाले
  • पोखरणमध्ये अणुचाचणी करण्यात आली
  • सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या
१३ वी लोकसभा १९९९
  • रस्त्यांबाबतच्या पायाभूत सुविधांसाठी सुवर्ण चतुष्कोण योजना राबवली
  • कारगिल युद्धात पाकिस्तानचा भारतानं पराभव केला
  • १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी ‘सर्व शिक्षा अभियान’ राबवण्यात आलं
  • नवीन टेलिकॉम धोरण राबवल्यानंतर सामान्य लोकांपर्यंत मोबाईल पोहोचला
१४ वी लोकसभा २००४
  • माहिती अधिकार कायदा लागू झाला
  • मल्टिब्रँड रिटेलमध्ये थेट परकीय गुंतवणुकीला मान्यता
  • किमान मजुरीच्या शाश्वतीसाठी मनरेगा लागू
  • लोकांच्या विशिष्ट ओळखीसाठी आधार लागू
१५ वी लोकसभा २००९
  • डीबीटी आणि अन्न सुरक्षा कायदा लागू
  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं आयोजन
  • लोकपाल विधेयक पारित झालं
  • २ जी घोटाळा उघड झाला
१६ वी लोकसभा २०१४
  • काळा पैसा रोखण्यासाठी नोटबंदी लागू
  • देशभरात जीएसटी लागू
  • नीति आयोगाची स्थापना आणि सामान्यांची जनधन खाती उघडली
  • पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक
१७ वी लोकसभा २०१९
  • काश्मीरमधून कलम ३७० हटवलं
  • देशाला मिळालं नवीन संसद भवन
  • महिला आरक्षण विधेयक व सीएए लागू
  • राम मंदिराचं बांधकाम
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक २०२४ च्या जागा

इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (ई.वी.एम.)

evm
  • पहिल्यांदा कधी वापर झाला
    १९८२, केरळ विधानसभा निवडणूक
  • एका ईव्हीएममध्ये किती नावं नोंद होऊ शकतात
    64
  • कोण बनवतं ही यंत्रे
    इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) बेंगलुरू आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECIL) हैदराबाद
  • यावेळी किती ईव्हीएम यंत्रांचा वापर होईल
    ५५ लाख
  • एका ईव्हीएमची किंमत किती
    ७९०० रुपये