बिपीन साळवी, फिटनेस तज्ज्ञ
धावणे, चालणे हे व्यायाम प्रकार केल्यानंतरही वाढलेले पोट कमी होत नाही, ही समस्या अनेकांना असते. अतिखाल्ल्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होतो. या चरबीचा थर पोटात असलेल्या यकृत, स्वादुपिंड या अवयवांवर जमा होतो. शारीरिक कामांमधून या चरबीतील उष्मांक वापरले गेले नाही की या चरबीचा थर वाढत जातो. परिणामत: या अवयवांची क्रिया मंदावण्याची भीती असते. लठ्ठपणा अनेक आजारांना निमंत्रण देतो तो यामुळे! अनेकदा प्रसूतीनंतर पोट कमी होत नसल्याची तक्रार स्त्रिया करतात. मात्र त्याचे कारण प्रसूतीपेक्षाही बैठी जीवनशैली असते. घरात कितीही कामे केली तरी त्यामुळे पोटावरील चरबी कमी होण्याची शक्यता नसते. आता तर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे सर्व कामे एका क्लिकवर होत असल्याने घरातील कामे ही व्यायामापेक्षा व्यवस्थापनाचा भाग झाली आहेत. स्त्रियांप्रमाणेच अनेक पुरुषांनाही चाळिशीत पोट सुटण्याच्या प्रकाराला सामोरे जावे लागते. बैठय़ा जीवनशैलीसोबतच मद्यपानाची सवय त्यासाठी कारणीभूत ठरते. नियमित बीअर पिणाऱ्या व्यक्तींच्या वाढणाऱ्या पोटाला बीअर बॅली म्हणतात. बीअरमध्ये उष्मांकाचे प्रमाण अधिक असते. व्यायामावाटे या उष्मांकाचे ज्वलन झाले नाही तर चरबीचे प्रमाण वाढते. बीअर पिणे हे आरोग्यासाठी हितकारक नाहीच पण त्यासोबत खाल्ले जाणारे तेलकट व मसालेदार पदार्थ (चकणा) हे पोटावरील चरबी आणखी वाढवतात.
केवळ धावणे, चालणे हा व्यायाम पोटाची चरबी कमी करण्यासाठी पुरेसा नसतो. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी पोटांवरील स्नायूंचे व्यायाम करणेच उपयुक्त ठरू शकते. त्यासाठी काही व्यायाम प्रकार देण्यात आले आहेत. मात्र पाठीचे दुखणे असणाऱ्या रुग्णांनी हे व्यायाम प्रकार करू नये. इतरांनीही हे व्यायाम करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
क्रंचेस
हा व्यायाम कुठेही करता येऊ शकतो. हा व्यायाम अधिक परिणामकारकही आहे. हा व्यायाम करताना सुरुवातीला जमिनीवर झोपावे. त्यानंतर गुडघे वाकवून समांतर वर उचलावे. या वेळी दोन्ही पायांमध्ये फार अंतर ठेवू नये. दोन्ही हात डोक्याच्या मागच्या बाजूला ठेवून पोटातून वर उठावे आणि गुडघ्याच्या दिशेने पुढे जावे. शक्य असेल तर डोके गुडघ्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा. मात्र पाय उचलले जाणार नाही याची काळजी घ्यावी. एका वेळेस हा प्रकार १० ते १५ वेळा करावा. यानंतर असेच दहा संच करून हा व्यायाम करावा. यामध्ये विविधता आणता येऊ शकते. हातात मोठा चेंडू घेऊनही हा व्यायाम करता येऊ शकतो.
रशियन ट्विस्ट
हा व्यायाम प्रकार कंबर कमी करण्यास उपयुक्त ठरतो. यासाठी प्रथम दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवून उभे राहावे. उजवा हात उजव्या दिशेला वरच्या बाजूला ताठ करावा. हाताच्या तळहातावर ताट किंवा पाण्याने भरलेली बाटली ठेवून हात हळूहळू डाव्या दिशेने न्यावा. या वेळी पाठीचा कणा ताठ ठेवा पोक काढू नका. कंबरेत जेवढे वाकणे शक्य असेल तेवढे वाकून हा व्यायाम प्रकार करावा. या प्रकारात कंबरेवरील स्नायू ताणले जातात. पहिल्यांदा हा व्यायाम करीत असल्यास कमी वेळ करावा आणि हळूहळू वाढवावा. त्यामुळे कंबरेची चरबी कमी होते.
टायरवर हातोडी मारणे
हा व्यायामाचा नवीन प्रकार आहे. मात्र हा प्रकारही तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा. या प्रकारात मोठय़ा आकाराच्या टायरवर हातोडी मारली जाते. मात्र हे करताना पायामध्ये अंतर ठेवले जाते. शिवाय गुडघे वाकवावे. त्यानंतर पोटातून वाकून टायरवरील विविध जागेवर हातोडीने मारावे. या वेळी व्यक्तीच्या शारीरिक क्षमतेनुसार हातोडीचे वजन ठरविले जाते. याचाही १० ते १५ पर्यंतचा संच करता येऊ शकतो. भारतात हा व्यायाम प्रकार मोठय़ा प्रमाणात केला जात नसला तरी पाश्चात्त्य देशात पोट कमी करण्यासाठी हा प्रभावी प्रकार मानला जातो.
बॅटल रोप
या व्यायाम प्रकारात ९ मीटर लांबीच्या आणि ७ ते ८ किलो दोरखंडाचा वापर केला जातो. सुरुवातीला दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून उभे राहावे. याशिवाय दोन्ही गुडघे वाकवावे. पुढच्या बाजूला वाकून हा दोरखंड हातात पकडावा व त्याच्या लाटा तयार कराव्यात. दोरखंड वर उचलताना व खाली आणताना पोटाच्या स्नायूंचा व्यायाम होतो. हा व्यायाम प्रथमदर्शनी सोपा वाटत असता तरी हे करताना पोटातील स्नायूंवर ताण येतो.