’ पोटात न दुखता जुलाब होण्याचे हे फार मोठे औषध आहे. नुकत्याच जन्मलेल्या बाळालाही मध+ एरंडेलाचे चाटण देण्याची पद्धत होती. वृद्धांच्या पोट साफ न होण्याच्या तक्रारीतही हे रोज घेता येते.
’ गर्भवतींनी ‘सिझेरियन’ टाळायचे असेल तर नववा महिना लागताच रोज एक चमचा एरंडेल घ्यावे.
’ पोट मुरडून संडासला होणे, आंव पडणे, मळाच्या गाठी होणे, अपेंडिक्सला सूज येणे, आमवात, सायटिका, गाऊट, गुडघेदुखी यांसारख्या रोगात एरंडेल खूप उपयोगी आहे.
’ सुंठ पावडर+ एरंडेलचा दुखऱ्या किंवा सुजलेल्या सांध्यावर लेप लावतात.
’ आल्याच्या चहातून किंवा सुंठीच्या पाण्यातून एरंडेल घ्यावे. घशातली एरंडेलची चव जाण्यासाठी ताकाच्या गुळण्या कराव्यात. लहान मुलांना मधातून किंवा कणकेची पोळी करताना त्यात एरंडेल व चिमूटभर सुंठ पावडर टाकून ती द्यावी.
’ रांजणवाडी किंवा डोळय़ातल्या खुपऱ्या वाढणे यासाठी एरंडेलाचा थेंब बोटावर घेऊन तो काजळासारखा पापण्याच्या आत फिरवावा.
–