- नारळाला कल्पवृक्ष म्हटले जाते, ते काही चुकीचे नाही. ओला नारळ, सुखे खोबरे, नारळपाणी, नारळाचे दूध, नारळाचे तेल आणि तूप उपयुक्त आहे. एवढेच नव्हे तर नारळाची शेंडी आणि करवंटीसुद्धा उपयोगी आहे.
- अंगाची आग होणे, संडास किंवा थुंकीतून रक्त पडत असेल तर ओले खोबरे, काळा मनुका किंवा खडीसाखरेसोबत चघळून खावे.
- गळय़ात खवखवून खोकला येत असेल किंवा तहानेने घशाला शोष पडत असेल तर ओला नारळ चावून खावा.
- खोबरे हे बलवर्धन आहे. अशक्त माणसांनी खडीसाखरेसोबत खावे. (त्याने थोडा मलावरोध होतो. त्यामुळे औषधी उपयोग करताना काळय़ा मनुकांबरोबर खावे.) पुरुषांमधील वंध्यत्वात शुक्राणूवृद्धीसाठी हा प्रयोग अवश्य करून पाहावा.
- पचनाच्या तक्रारींसाठी रोजच्या जेवणात पुदिना, आले, लसूण, कडिपत्ता व ओला नारळ यांची चटणी अवश्य खावी. याच चटणीत ओवा व सैंधव घातले असता वातामुळे शरीरात कुठेही कंप किंवा थरथरणे याने कमी होते.
संग्रहित लेख, दिनांक 17th Sep 2016 रोजी प्रकाशित
आयुर्मात्रा : नारळ
पचनाच्या तक्रारींसाठी रोजच्या जेवणात पुदिना, आले, लसूण, कडिपत्ता व ओला नारळ यांची चटणी अवश्य खावी.
Written by वैद्य राजीव कानिटकर

First published on: 17-09-2016 at 00:21 IST
मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coconut