* नारळाचे पाणी हे गोड आणि थंड आहे, त्याने शरीराची आग, उष्णता कमी होते. सलाइनप्रमाणे लगेच ताकद देते. लघवीची आग, ठणका कमी करते, ताप किंवा बरेच दिवसांच्या रोगानंतर शक्तिवर्धक म्हणून उपयोगी. खूप तहान लागणे, जीव कासावीस होणे, चक्कर येणे, प्रेशर ‘लो’ होणे यासाठीही उपयोगी आहे.

* नारळाचे तेल केस वाढविते, त्वचेवरील सुरकुत्या कमी करते, त्वचेचा कोरडेपणा घालवते. त्यामुळे अनेक त्वचाविकारात बाहेरून लावायला उपयोगी. सांध्यातील वंगण वाढविण्यासाठी पोटातही घेतात.

* नारळाची करवंटी उगाळून किंवा करवंटीतून निघणाऱ्या तेलाचा उपयोग खरूज, नायटा किंवा पांढरे डाग घालवण्यासाठी केला जातो.

* नारळाची शेंडी जाहून केलेले राख मधातून थोडी थोडी वांरवा चाटण केल्यास उचकी, उलटी थांबते.

* नारळ हा गोड व थंड असल्याने तो कफ वाढवणार आहे. त्यामुळे कफाचा त्रास होणाऱ्यांनी तो कमी खावा.

* सुखे खोबरे हे रक्तातील चरबी वाढवणारे असून त्यामुळे मलावरोध होतो. त्यामुळे त्याचाही वापर योग्य प्रमाणातच करावा.