डॉ. विक्रांत शहा

संगणकाच्या पडद्यासमोर एकाग्रतेने लक्ष देणारा कर्मचारी हे प्रत्येक कार्यालयात दिसणारे चित्र. अनेक कार्यालयांमध्ये तर तासन्तास संगणकासमोर बसून काम केले जाते. योग्य काळजी घेतली नाही तर संगणकाच्या सततच्या वापराने त्रास उद्भवू शकतात. यंत्राचा वापर हा मानवाच्या सोयीसाठी केला असला तरी त्याचे फायदेतोटे लक्षात घ्यावे. त्यानुसार वापर केल्यास आजारांपासून दूर राहता येते. सातत्याने संगणक किंवा लॅपटॉपसमोर बसून काम करणाऱ्यांना डोकेदुखी, मानदुखी, डोळे व हाताच्या बोटांच्या समस्या उद्भवतात. याबरोबर सातत्याने एका ठिकाणी बसून राहिल्याने स्थूलतेचे प्रश्नही निर्माण होतात.

Viral video of disabled swiggy delivery boy doing food delivery by riding a cycle
परिश्रमाशिवाय पर्याय नाही! दिव्यांग असूनही करतोय फूड डिलिव्हरी, VIDEO पाहून वाटेल अभिमान
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
desi jugaad video old fridge convert into shoe rack
बाबो! खराब फ्रीजचा असा वापर तुम्ही आयुष्यात कधी पाहिला नसेल; Video पाहून युजर्सनी मारला कपाळावर हात
Viral video of a man carries a snake to the hospital after it bites him
सापाने दंश केला तरी जगण्याची इच्छा सोडली नाही, रुग्णालयात सापाला घेऊन आला अन्…, VIDEO पाहून माणसाच्या हिमतीला कराल सलाम
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
Pimpri, Female computer operator bribe, computer operator bribe Female, bribe,
पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत
Terrifying Video of father saving his children life from accident video went viral on social media
हा VIDEO पाहून कळेल आयुष्यात वडिलांचं असणं किती गरजेचं, बापाने मरणाच्या दारातून लेकराला आणलं परत, पाहा नेमकं काय घडलं
Most robotic surgeries performed by Tata hospital in shortest time
टाटा रुग्णालयाकडून कमी कालावधीत सर्वाधिक रोबोटिक शस्त्रक्रिया

डोकेदुखी :  सर्वसाधारणपणे तीव्र वास, मोठ्ठा आवाज, डोळ्यांवर खूप प्रकाश येणे, गर्दीत जाणे या कारणांबरोबरच सतत संगणकासमोर काम केल्याने अर्धशिशीचा त्रास सुरू होतो. मेंदूच्या काही भागांत रक्तप्रवाह वाढतो आणि काही भागांत कमी होतो. रक्तप्रवाहातील या असमतोलामुळे मेंदूमध्ये काही विशिष्ट संप्रेरक स्रवतात. या संप्रेरकांच्या असमतोलामुळे डोके एकाच बाजूस दुखू लागते.

डोळे दुखणे : सातत्याने संगणकाचा प्रकाश डोळ्यावर पडल्यामुळे डोळ्यांना अतिरिक्त त्रास होतो. संगणकाच्या प्रकाशामुळे चष्म्याचा नंबर वाढण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी संगणकासमोर बसताना ठरावीक पद्धतीच्या चष्म्याचा वापर करावा. संगणक, मोबाइल, टीव्ही अशा उपकरणांचा सततचा वापर, जागरण, सतत प्रवास या गोष्टींमुळे डोळे कोरडे पडण्याचे (ड्राय आय) प्रमाण वाढते आहे. संगणकासमोर बसल्यानंतर डोळ्यांवर ताण येत असेल किंवा डोळ्यातून पाणी येत असेल तर थंड पाण्याने डोळ्यांवर पाणी मारावे किंवा हलक्या हाताने डोळ्यांभोवती बोटे फिरवावीत.

मानेचे दुखणे : संगणकासमोर बसल्यानंतर अनेकजण तासनतास खुर्चीवरून उठत नाही. अशा वेळी खुर्चीवर बसण्याची अवस्था कशी आहे हे एकदा तपासून पाहायला हवे. संगणकावर एकटक पाहताना मानेची नस ताठरण्याची शक्यता असते. त्यामुळे मान फार काळ एकाच अवस्थेत राहणार नाही याची काळजी घ्यावी. संगणकासमोर बसल्यावर मान फार खाली किंवा वर स्थिर ठेवावी लागणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी संगणकाची वरची फळी डोक्याशी समांतर आहे हे तपासून पाहावे, तर संगणकावर काम करताना सातत्याने मानेची हालचाल करावी. शक्य झाल्यास दिवसातून एकदा तरी मान गोल फिरवणे, वर-खाली करणे हा व्यायाम करावा. लॅपटॉप मांडीवर घेऊन काम केल्यामुळे मान सुस्थितीत राहत नाही. त्यामुळे लॅपटॉप मांडीवर घेऊन बसण्याऐवजी छोटय़ा टेबलावर लॅपटॉप ठेवून पाठीला आधार ठेवून बसावे.

पाठीचा कणा : संगणकासमोरील आरामदायी खुर्ची पाठीचे आजार टाळण्यासाठी गरजेची आहे. पाठीच्या चुकीच्या अवस्थेमुळे मणक्याचे आजार जडण्याची शक्यता असते. संगणकासमोरील खुर्चीच्या टोकाशी बसून काम करण्याची अनेकांना सवय असते. मात्र फार वेळ बसून काम करावयाचे असल्यास पाठीला उशीसारखा आधार असावा.

हाताची बोटे : सातत्याने कीबोर्डवर टाइप करताना हाताला मुंग्या येणे, सूज येणे किंवा बोटांना ताठरता येणे यांसारख्या समस्या उद्भवतात. त्यासाठी कालांतराने ब्रेक घेऊन बोटांचे व्यायाम करणे फायदेशीर ठरते. माऊस व कीबोर्डवर टाइप करण्याच्या योग्य पद्धतींचे पालन करावे. कीबोर्डवर टाइप करताना मनगट कीबोर्डला टेकवू नये किंवा फार वरही उचलून धरू नये. हात दुखणार नाही अशा अवस्थेत टाइप करावे.

सातत्याने संगणक किंवा लॅपटॉपसमोर बसून काम करणाऱ्यांनी तासातासाने उठून काही पावले चालावीत. दुपारच्या जेवणानंतरही थेट संगणकासमोर येऊन बसण्याऐवजी काही अंतराचा ब्रेक घेऊन चालण्याचा व्यायाम करावा. सातत्याने एकाच जागेवर बसून स्थूलता वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी केल्या जाणाऱ्या व्यायामाव्यतिरिक्तही एकाच जागेवर न बसता हालचाल करावी. उभे राहून हात फिरवणे, मान फिरवणे, पायांची हालचाल हे व्यायाम करता येऊ  शकतात आणि हे छोटेछोटे व्यायामही फायदेशीर ठरतात.