पाण्याला जीवन असे म्हणतात. पण जर पाणी स्वच्छ आणि जीवजंतुनाशक असेल तरच ते जीवनदायी ठरू शकते, अन्यथा हेच ‘जीवन’ जीवघेणेही ठरू शकते. पावसाळ्यात होणारे पोट बिघडण्याचे आजार प्रामुख्याने दूषित पाणी आणि असे पाणी वापरून बनवलेले अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे होतात. अनेकांना रोजच नाईलाजाने बाहेर खावे लागते. शिवाय पावसाळ्यात वर्षां सहलींना गेल्यावर उघडय़ावरील खाणे खूप होते, अनेक जण हौसेने धबधब्यांचे वा नदीचे पाणी पितात. पण हे पाणीही स्वच्छच असेल याची खात्री देता येत नाही. स्वच्छ दिसणाऱ्या पाण्यातही जवळपासच्या प्राणी वा माणसांच्या विष्ठेद्वारे जंतू मिसळलेले असू शकतात. त्यामुळे त्यातूनही पोट बिघडण्याची शक्यता असते.
दूषित पाणी आणि अन्नामार्फत होणाऱ्या आजारांमधील नेहमी दिसणारे आजार म्हणजे कावीळ आणि गॅस्ट्रो.
काविळीतील ‘हिपेटायटिस ए’ व ‘हिपेटायटिस ई’ या काविळी खराब पाण्यामुळे होतात. यात रुग्णाला हळूहळू पोटात उजवीकडे दुखू लागते. मळमळ, जेवणावरची वासना उडणे, भूक कमी होणे ही लक्षणेही दिसतात. उलटी होण्याची भावना होते. थकवा येऊ लागतो. त्यानंतर त्वचा, लघवीमध्ये पिवळेपणा दिसू लागतो. डोळे पिवळे दिसू लागतात. काहीजणांना अंगाला खाजही सुटते. ही लक्षणे हळूहळू दिसायला लागतात. कावीळ प्रामुख्याने विष्ठेतील जंतू मिसळलेले पाणी पोटात गेल्यामुळे होते.
- ‘हिपेटायटिस’चे निदान लवकर होऊ शकते. त्यामुळे मळमळ, अन्नावरील वासना उडणे आणि थोडाफार ताप येऊ लागला, तर लगेच डॉक्टरांकडे जाऊन काविळीचे निदान करून घेणे आवश्यक आहे. डोळे वा त्वचा पिवळी दिसणे वा जिभेच्या खाली पिवळेपणा येणे ही लक्षणे नंतर दिसतात. ती सुरू होण्याच्या आधीच कावीळ ओळखून उपचार सुरू करता येतात.
- कावीळ खरे तर आपली आपण हळूहळू बरी होत असते. तशी ती बरी होण्यास मदत करणारे औषधोपचार काविळीसाठी केले जातात.
- ‘गॅस्ट्रो एंटेरायटिस’ अर्थात उलटय़ा-जुलाब पावसाळ्यात नेहमी दिसतात. काही जणांना यात आजाराच्या सुरुवातीच्या काळात ‘अब्डॉमिनल क्रँप्स’ म्हणजे पोटात मुरडा येतो, एकदम उलटय़ा सुरू होतात आणि नंतर जुलाब होतात. बाहेरचे दूषित पाणी वा खाणे पोटात गेल्यानंतर ६-७ तासांतच हा त्रास सुरू होऊ शकतो. काही जणांमध्ये लक्षणे तीव्र असतात. अगदी ३०-४० उलटय़ा, तेवढेच जुलाब होणे अशीही लक्षणे दिसू शकतात.
- ‘कॉलरा’ आणि ‘शिगेलोसिस’ हे आजार गॅस्टोर एंटेरायटिसचेच प्रकार आहेत. कॉलरामध्ये अगदी भाताच्या पाण्यासारखे पांढरे पातळ जुलाब होतात. ‘शिगेलोसिस’मध्ये हगवणीबरोबर रक्त पडते. असे होऊ लागले तर रुग्णाला शरीरातील पाण्याचे प्रमाण चांगले राहून लघवी व्यवस्थित होणे आवश्यक असते. त्यामुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेऊन सलाईन देतात. फारच जुलाब होत असतील तर त्यामुळे मूत्रपिंडावर प्रभाव पडून तात्पुरत्या काळासाठी ‘किडनी फेल्युअर’ होऊ शकते. त्यामुळे तीव्र लक्षणांमध्ये रुग्णांनी घरी वेळ न काढता लगेच डॉक्टर गाठणे गरजेचे. पाणी तोंडावाटे प्यायले तरी उलटी-जुलाबांमुळे ते टिकत नाही. त्यामुळे शरीरातील कमी झालेले पाणी भरुन काढणे फारच महत्त्वाचे ठरते.
- गॅस्ट्रो झालेल्या काही जणांना मात्र लक्षणे खूप तीव्र नसतात. जुलाब-उलटय़ांचे प्रमाण कमी असते. यात मुरडा येऊन दिवसाला २-३ जुलाब होतात आणि एखादी उलटी होते, काहींना थोडी मळमळही होते. या लोकांना बाह्य़रुग्ण म्हणून उपचार घेऊन आणि घरी सतत इलेक्ट्रॉलचे पाणी, लिंबू सरबतासारखी पेये घेऊन हळूहळू बरे वाटते. पण लक्षणे जरी तीव्र नसली तरी डॉक्टरांकडे जाऊन आजार कोणता याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.
काळजी काय घ्यावी?
- या दिवसांत सर्वानीच पाणी उकळून व गाळून प्यायलेले बरे. बाहेर जाताना व सहलींच्या वेळीही आपली पाण्याची बाटली घेऊन जावी. बाहेरची थंड पेये टाळावीत.
- अनेकदा शाळांमध्ये बऱ्याच लहान मुलांना जुलाब-उलटय़ांचा त्रास झालेला दिसतो. विषाणूजन्य गॅस्ट्रोमध्ये फ्लूसारखा सर्दी, खोकला व नंतर जुलाब, उलटय़ा सुरू होतात. हा आजार जास्त काळासाठी चालतो. त्यामुळे लहान मुलांना उकळलेले पाणी बाटलीत देणे विसरू नका. त्यामुळे या आजारांना प्रतिबंध होऊ शकेल.
- मधुमेह्य़ांनी व प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांनी बाहेरचे पाणी कटाक्षाने टाळावे.
- मळमळ व उलटय़ा-जुलाब असताना उकळलेल्या पाण्यापासून बनवलेले व मीठ-साखर घातलेले लिंबू सरबत, इलेक्ट्रॉल वा ओआरएस घेता येईल. कारण पाणी कमी प्यायल्यामुळे गळून जायला होते. अशा वेळी अन्न फिके-कमी मसालेदार घ्यावे. ताक व दही नेहमीपेक्षा अधिक चालू शकेल. त्यातील जीवाणू आपल्या आतडय़ांतील चांगल्या जीवाणूंचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात.
- या दिवासांत हात वारंवार धुऊन स्वच्छ ठेवणे गरजेचे. त्यामुळेही अनेक प्रकारचे संसर्ग दूर ठेवता येतात. मुलांनाही ही गोष्ट सांगायला हवी. बाहेर गेल्यावर वा मुलांनी शाळेत असताना हातावर सॅनिटायर टाकून हात चोळून घेतले तरी चालेल.
- -डॉ. संजय कोलते, उदरविकारतज्ज्ञ
sanjaykolte@yahoo.com