- चांगली भूक लागण्यासाठी, कोणत्याही विकारामुळे गेलेली तोंडाची चव येण्यासाठी आल्याच्या तुकडय़ाला साधे किंवा सैंधव मीठ लावून जेवणापूर्वी चावून खावे.
- खोकल्याची सतत ढास लागत असेल किंवा दम लागला असेल तर एक चमचा आल्याचा रस+एक चमचा मध घालून सावकाश चाटण करावे आणि गरम पाणी प्यावे.
- पोटदुखी, अपचन, अजीर्ण, ओकारी, मळमळ, पोट डब्ब होणे या सर्व तक्रारींसाठी आले रस+लिंबूरस+सैंधव मीठ यांपासून बनविलेले ‘पाचक’ २/२ चमचे तीन वेळा गरम पाण्याबरोबर घ्यावे. जेवणात आले+पुदिना+कोथिंबीर+हिंग+जिरे+सैंधव अशी चाचणी करून खावी.
- सर्दी-सायनस असो किंवा पित्ताने डोकेदुखी असो, आले ठेचून त्याचा चोथा कपाळावर घासावा किंवा आल्याचा रस टाळूवर चोळावा. थोडी आग होते, पण लगेच डोके उतरते.
- थंड प्रदेशात फिरताना अंग थरथरते, दातखीळ बसते, अंग गार पडते यासाठी लगेच आल्याचा तुकडा चावून खायला द्यावा आणि आल्याचा रस कपाळ, मान, छाती, हात-पायाचे तळवे यांना चोळावा.
- दुखऱ्या सांध्यांना आल्याच्या रसात मोहरी वाटून लेप द्यावा किंवा एरंडेल+आले रस एकत्र करून चोळावे किंवा आले व लसून वाटून त्याचा लेप द्यावा.