या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. वैशाली मंदार जोशी

  • प्रथिने हा शरीराच्या वाढीसाठीचा महत्त्वाचा अन्नघटक आहे. नवीन उती निर्माण होण्यासाठी आणि झीज झालेल्या उती भरून निघण्यासाठी त्याचा उपयोग होतो. प्रथिने हा त्वचा, नखे, केस, स्नायू, हाडे, रक्त या सर्वाचा एक घटक असून शरीरात संप्रेरके आणि ‘एन्झाईम्स’ बनवण्यासाठी प्रथिनांचा वापर केला जातो. प्रथिने ‘अमिनो’ आम्लांपासून बनलेली असतात. यातील नऊ अमिनो आम्ले शरीरात तयार होत नाहीत.
  • प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य अशा दोन्ही प्रकारांत प्रथिने मिळतात. मांस, मासे आणि अंडय़ांमधून साधारणत: यांच्या साधारण: १०० ग्रॅममधून २४ ते ३४ ग्रॅम प्रथिने उपलब्ध होतात. १८० मिली गाईच्या दुधातून ५ ग्रॅम, तर म्हशीच्या दुधातून ९० मिलीमधून ५ ग्रॅम प्रथिने मिळतात. एका चीझ क्यूबमधूनही ५ ग्रॅम, तर एका मोठय़ा अंडय़ातून ६ ग्रॅम प्रथिने मिळतात. कोणत्याही डाळी वा कडधान्यात १०० ग्रॅममागे २० ते २५ ग्रॅम प्रथिने असतात. यात सोयाबीनमध्ये १०० ग्रॅममध्ये ३६ ग्रॅम प्रथिने मिळतात. बदामात १०० ग्रॅममध्ये २१ ग्रॅम, अक्रोडात १५ ग्रॅम आणि शेंगदाण्यात २६ ग्रॅम प्रथिने असतात.
  • दूध, सोयाबीन, अंडी आणि मासे यातून मिळणारी प्रथिने परिपूर्ण समजली जातात. कारण त्यातून सर्व गरजेची ‘अमिनो’ आम्ले मिळत असतात. धान्यात ‘लायसिन’ नसते, तर कडधान्ये व डाळींमध्ये ‘मिथिओनिन’ हा घटक कमी असतो. प्राणिजन्य प्रथिनांमध्ये ‘कोलेस्टेरॉल’ अधिक असते. त्यामुळे प्रथिनांचे स्त्रोत असलेले विविध अन्नपदार्थ एकत्र करून जेवणातील प्रथिनांचा दर्जा वाढवला जातो.

शरीराची प्रथिनांची गरज ओळखा

  • वजन कमी करण्यासाठी अनेकांना ‘हाय प्रोटिन’, ‘लो कार्ब’ आणि ‘लो फॅट’ आहार दिला जातो. फिष्टमय पदार्थ आणि स्निग्ध पदार्थ कमी केल्यानंतर शरीराचे ‘मसल मास’ कमी होऊ लागले आणि ते भरुन काढण्यासाठी प्रथिने वाढवली जातात. प्रथिनांमुळे शरीरातील उष्मांक जाळण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते आणि रोज ८० ते १०० उष्मांक अधिक जाळले जाऊ शकतात. प्रथिनयुक्त आहारानंतर बराच काळ भूक लागत नाही.
  • प्रत्येकाच्या शरीराची हालचाल, वय, स्नायूंचे वजन (मसल मास) किंवा व्यक्तीला असलेले आजार या सर्व गोष्टींचा विचार प्रथिनयुक्त अन्नपदार्थ घेताना करावा लागतो कारण त्यानुसार प्रथिनांची गरज बदलते. वाढीच्या वयातील मुले व ‘अ‍ॅथलीट’ खेळाडूंना प्रथिनांची गरज अधिक असते. सर्वसाधारणपणे आपणे खातो त्यातील एकूण उष्मांकांच्या २० ते २५ टक्के उष्मांक प्रथिनांमधून मिळावेत असे म्हटले जाते.

हाय प्रोटिन डाएट’ हा हल्ली विशेषत: वजन कमी करण्यातील परवलीचा शब्द झाला आहे. भरपूर प्रथिने खाल्ली की वजन कमी होण्यास मदतच होईल, या समजातून अनेक जण स्वत:च्या मनानेच आहारात खूप प्रथिने घेऊ लागतात. काही जण त्यात आणखी सोपेपणा आणण्यासाठी ‘प्रोटिन पावडर’ वापरतात. पण हे सारे करण्यापूर्वी आपल्या शरीराची प्रथिनांची गरज ओळखणे गरजेचे.

रुग्णांसाठीच्या  www.patientsafetyalliance.in <http://www.patientsafetyalliance.in/&gt;  या संकेतस्थळावर विशेषत: शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांनी कशाकशाची काळजी घ्यावी याची यादीच दिली आहे. त्यातल्या काही गोष्टी अशा-

  • आधीच्या आजारांबद्दल तसेच आधी झालेल्या शस्त्रक्रियांबद्दल डॉक्टरांना कल्पना द्या.
  • तुम्हाला नेहमी कोणती औषधे सुरू आहेत, आज कोणती औषधे घेतली, हे डॉक्टरांना सांगा.
  • तुम्हाला कोणत्या औषधांची अ‍ॅलर्जी आहे का?
  • शस्त्रक्रिया नेमकी कशी होणार हे तुम्हाला कळले आहे का?, शस्त्रक्रियेचे फायदे, संभाव्य तोटेही विचारून घ्या.
  • शस्त्रक्रियेसाठी व त्यानंतर अंदाजे खर्च किती येऊ शकतो?

dr.sanjeevani@gmail.com

(शब्दांकनसंपदा सोवनी)