गुळवेल म्हणजे गुडूची किंवा अमृता. नावाप्रमाणेच सर्व प्रकारच्या तापांमध्ये आणि बऱ्याच पित्तविकारांमध्ये ही अमृताप्रमाणे काम करते. गुळवेलीचा वेल असून त्याच्या फांद्या (खोड) व पाने औषधी आहेत. गुळवेल सत्त्व सर्वाच्या परिचयाचे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

* उन्हाळय़ात येणारे सर्व प्रकारचे ताप, तापात अंगाची आग होणे, लघवीला गरम होणे, डोळय़ांची आग होणे, खूप तहान लागणे अशा पित्तज्वरांत गुळवेल देतात.

* खूप दिवसांचा ताप, रोज तापासारखे वाटणे, मलेरिया, डेंग्यू यांसारखे ताप, अन्य पॅथीच्या औषधांनी एकदा ताप गेल्यानंतरही पुन:पुन्हा ताप येणे, तापामुळे (सप्लीन) प्लीहा वाढणे, भूक मंदावणे, सतत अंग दुखणे, अशक्तपणा वाटणे अशा विकारांत गुळवेल अमृताप्रमाणे काम करते.

* तापाशिवाय कफाचे विकार, सांध्यांचे विकार, हृदयाचे विकार, त्वचाविकार, कावीळ इत्यादी अनेक रोगांमध्ये गुळवेल अत्यंत गुणकारी आहे.

* गुळवेलीच्या जाडसर फांद्यांचा काढा, पानांचा रस, फाद्यांपासून काढलेले ‘सत्त्व’ औषधांमध्ये वापरले जाते. ही वात, पित्त, कफाने होणाऱ्या तिन्ही विकारांत वापरली जाते.

वैद्य राजीव कानिटकर

मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jaggery well