’ घरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना ‘लेंडी पिंपळी’ माहीत आहे. कफाच्या व पोटाच्या अनेक विकारांमध्ये पिंपळी गुणकारी आहे.

’ खोकला, कफ सुटत नसेल, सतत ढास लागून थोडासाच कफ पडत असेल तर पाव चमचा पिंपळीचूर्ण थोडय़ा ज्येष्ठमधाच्या पावडरसोबत सावकाश मधातून चाटवावे.

’ पिंपळीचूर्ण मधातून घेतल्यास भूक लागते, पचन सुधारते. अंग गार पडले असता शरीरात उब निर्माण होते. मूळव्याधीमध्ये दोन्ही जेवणानंतर पाव चमचा पिंपळीचूर्ण ताकातून घ्यावे.

’ सर्वाना माहिती असलेल्या ‘सीतोपलादि चूर्णा’ मध्येही पिंपळी हा महत्त्वाचा घटक आहे. सर्व प्रकारचे खोकले, कफ, वारंवार ताप, सर्दी-ताप, भूक न लागणे, अशक्तपणा, वजन वाढवण्यासाठी ‘सीतोपलादि’चा चांगला उपयोग होतो.

’ पिंपळी ही रसायन आहे. म्हणजे ती विकारांमध्ये उपयोगी आहेच, पण याच्या विशिष्ट प्रयोगाने वृद्धावस्थाही दूर केली जाते. अर्थात बल व शक्ती बराच काळ टिकवून ठेवली जाते. पिंपळी, सुंठ व खडीसाखर यांचा दुधात काढा करून दिला जातो. या प्रयोगाला ‘वर्धमान पिंपळी’ असे म्हणतात.