* नारळाचे जायफळ आणि जायपत्ती ही एकाच झाडाची फळे व पाने आहेत. दोघांचाही उपयोग प्रामुख्याने आतडय़ांच्या व पचनाच्या विकारांवर होतो, तसेच दोघांचाही उपयोग धातुदौर्बल्यामध्ये रसायन म्हणून केला जातो.
* जायपत्ती, ज्येष्ठमध, कंकोळ, कात, वेलची, लवंग हे सर्व विडय़ाच्या पानांमध्ये घालून खाणे सर्व कफविकारांवर उपयोगी आहे. अपचनाने येणाऱ्या तोंडाच्या दरुगधीवरही उपयोगी आहे. जायपत्रीने भूक वाढते, ती उष्ण असल्याने पचन सुधारते. म्हणून रोजच्या मसाल्यातही वापरतात.
* वारंवार थोडे थोडे शौचास होणे, पोटात मुरडून शौचाला होणे, पाण्यासारखे ढाळ जुलाब होणे, रक्त पडणे या सर्वासाठी आणि ‘फूड पॉयझन’मध्ये प्रथमोपचार म्हणून जायफळ खूप उपयोगी आहे.
* पाव-पाव चमचा सुंठ-जायफळ पावडर, गुळाचा खडा आणि तूप खाऊन वर कोमट पाणी प्यावे किंवा सुंठ-जायफळ हे तूप किंवा डाळिंबाच्या रसातून घ्यावे.
* जायफळ दुधात उगाळून कपाळावर लेप दिल्याने किंवा झोपताना जायफळाची कॉफी प्यायल्याने झोप छान लागते.