खरेदी हा अनेकांसाठी प्रामुख्याने महिलांसाठी तणाव कमी करण्याचा मार्ग असतो. कामाच्या ताणातून सुटका करून घेण्यासाठी बाजारात किंवा शॉपिंग मॉलमध्ये स्वत:साठी, घरासाठी खरेदी केल्यानंतर काही वेळासाठी आनंद मिळतो. मात्र आताशा बाजारात जाण्यासाठी फावला वेळ काढण्याचीही गरज राहिलेली नाही. नेहमी हातात असलेल्या मोबाइलवरूनच बाजारपेठा ग्राहकांच्या मुठीत आल्या आहेत. अर्थात असे त्यांना वाटते. विविध संकेतस्थळांच्या मोहमयी संदेशांच्या आहारी जाऊन दिवसाचे तासनतास वस्तू पाहण्यात घालवले जातात. तणाव कमी करण्यासाठी खरेदी करण्याच्या सवयीचे नकळत व्यसनामध्ये कधी रूपांतर होते हेच अनेकदा लक्षात येत नाही. किंबहुना दिवसाचा बहुतांश वेळ या संकेतस्थळांवर घालवणे हे व्यसन असल्याचेच मान्य करायला अनेकांची तयारी नसते.

गेल्या काही वर्षांत ऑनलाइन खरेदीच्या प्रमाणात वाढ झाली असून यात तरुण स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. पाश्चात्त्य देशात ऑनलाइन खरेदीतून मानसिक आरोग्य बिघडत असल्याचे निदर्शनास आले आहे. भारतातही ऑनलाइन खरेदीच्या व्यसनाचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. ऑनलाइन खरेदीचा अतिरेक हा क्रेडिट कार्डच्या वापरानंतर वाढतो. क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांकडे पैसे खर्च करण्याची मुभा असते. त्यामुळे पुढच्या महिन्यात पैसे देऊ  या भावनेतून क्रेडिट कार्डची मर्यादा संपेपर्यंत खरेदी सुरू असते. त्यानंतर मात्र त्याचे बिल फेडताना आनंद मिळविण्यासाठी केलेली खरेदी मानसिक आरोग्य अधिक बिघडवते, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप जाधव यांनी सांगितले. व्यसन केल्यानंतर ज्याप्रमाणे मेंदूमध्ये आनंद देणारी संप्रेरके निर्माण होतात. त्याच प्रमाणे ऑनलाइन शॉपिंगमुळे ग्राहकाला अतिशय आनंद मिळतो. कालांतराने ही खरेदी केवळ स्वत:साठी किंवा आवश्यक न राहता नातेवाईक, मित्रमैत्रिणीसाठी केली जाते, खरेदीसाठी नवनवीन कारणे शोधून काढली जातात, असेही डॉ. जाधव यांनी नमूद केले.

Brad Pitt Dating SCAM
Brad Pitt Dating Scam : AI वापरून ब्रॅड पिट असल्याचं भासवलं! फ्रेंच महिलेकडून लुटले ७ कोटी रुपये
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Is Selling Fruits On The Footpath In Pune Watermelon seller's video
पुणे तिथे काय उणे! कलिंगड विकण्यासाठी विक्रेत्याची भन्नाट आयडिया; VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
Little school girl driving jcb as passion video viral on social media dvr 99
लेक असावी तर अशी! शेतकरी बापाच्या मुलीची ‘ही’ कला पाहून तुम्हीही व्हाल अवाक, VIDEO एकदा पाहाच
Success story of kalpana saroj who got married at 12 now owning crores business
बाराव्या वर्षात लग्न अन् सासरच्यांचा छळ! पण हार न मानता २ रुपयांची कमाई करणाऱ्या ‘या’ महिलेने उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य
Girl Juggling On Chandra Song Vs Beatboxing
‘चंद्रा’ गाण्यावर चिमुकलींची जुगलबंदी! ठसकेबाज लावणीला बीट बॉक्सिंगची साथ; VIDEO पाहून अमृता खानविलकरची कमेंट, म्हणाली…
Sushil Karad Walmik Karad
वाल्मिक कराडचा मुलगा अडचणीत? मॅनेजरच्या घरात घुसून बंदुकीच्या धाकावर लूट केल्याची तक्रार; महिलेची न्यायालयात धाव
Haldi Kunku Gift Ideas for Womens in Budget
Makar Sankranti Gift Idea: सुवासिनींना यंदा हळदी-कुंकवासाठी ‘वाण’ काय द्यायचं? पाहा ‘या’ भन्नाट आयडिया; खर्च कमी आणि वस्तूही उपयोगी

ऑनलाइन खरेदीचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे मोबाइलचा अतिवापर. अनेकदा आवश्यकता नसतानाही मोबाइलवर शोधमोहीम सुरू असते. माहिती मिळविण्याचे कारण सांगून आपण शॉपिंग संकेतस्थळांकडे वळतो.ोुळातच मोबाइलचा वापर किती आणि कसा करावा हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते. मनाच्या व्यवस्थापनासाठी अनेकदा मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो. मात्र ऑनलाइन खरेदीतून मानसिक आरोग्य बिघडते हे मान्य केले जात नाही, अशी मानसोपचारतज्ज्ञांची तक्रार असते. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याकडून विनाकारण आणि जास्त खर्च होत आहे हे मान्य करावे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावेत, असे शीव रुग्णालयाचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. लोकेश चिरवटकर यांनी सांगितले. यासाठी केवळ ऑनलाइन खरेदी बंद करण्यापेक्षा आपला तणाव वाढण्याची कारणे शोधावीत. कामाच्या वाढणाऱ्या ताण कमी करण्यासाठी ऑनलाइन खरेदी केली जात असेल तर कामातून आनंद कसा मिळविता येईल या दृष्टीने विचार करा. यासाठी खरेदीऐवजी सकारात्मक पर्यायांचा विचार करा, असेही डॉ. चिरवटकर यांनी नमूद केले.

ऑनलाइन खरेदीचे व्यसन कसे ओळखाल?

  • प्रत्येक वेळी ऑनलाइन खरेदीचा विचार येतो.
  • प्रयत्न करूनही ऑनलाइन खरेदीची इच्छा थांबवू शकत नाही.
  • ऑनलाइन खरेदीमुळे काम, नातेसंबंध आणि आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला आहे.
  • ऑनलाइन खरेदी करता आली नाही तर निराश होणे.
  • ऑनलाइन खरेदी केल्यानंतरच समाधान जाणवणे.
  • आवश्यकता नसलेले आणि आवाक्याबाहेरील वस्तूंची खरेदी करणे.
  • जास्तीची खरेदी झाल्याने अपराधीपणा वाटणे.
  • ऑनलाइन खरेदीच्या कारणामुळे इतर कामांकडे दुर्लक्ष होणे.

ऑनलाइन खरेदीवर नियंत्रण कसे आणाल?

  • क्रेडिट कार्डचा वापर टाळा किंवा आवश्यक असल्यास क्रेडिट कार्डच्या वापरावर बंधन आणा.
  • मानसिक तणाव कमी करण्यासाठी खरेदीव्यतिरिक्त चित्रपट, वाचन, संगीत यांसारख्या पर्यायांचा अवलंब करा.
  • मानसोपचारात ‘डिले ग्रॅटिफिकेश’ नावाची संकल्पना आहे. यानुसार खरेदी करण्याची इच्छा होत असेल तर त्याला त्वरित प्रतिसाद देऊ नका. उदा. तुम्हाला खरेदी करण्याची इच्छा झाली तर तो विचार दुसऱ्या दिवसावर ढकला. या पद्धतीतून हळूहळू ऑनलाइन खरेदीचे प्रमाण कमी होते.
  • ऑनलाइन खरेदीचे व्यसन सुरू होण्यामागे तणाव कारणीभूत असल्याचे मान्य करा आणि आपल्याला निर्माण होणारा तणाव होण्यामागची कारणे शोधा. त्यावर विचार करा. तो तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करा.

Story img Loader