- रक्त शुद्ध करण्याचा, रक्तस्राव थांबवण्याचा आणि जंतुनाशक गुणधर्मामुळे हळद ही प्रामुख्याने बऱ्याच रक्त व त्वचाविकारांमध्ये वापरली जाते.
- बाजारात मिळणाऱ्या हळदीपेक्षा ओली हळद घरी आणून वाळवून तिची पावडर करून ती औषधी म्हणून जास्त उपयोगी आहे.
- हळद व कडुनिंबाच्या पानांची पावडर गुळाबरोबर एकत्र करून खावी किंवा दोन्हींची पावडर त्वचेबरोबर चोळावी. खाज येणाऱ्या सर्व त्वाचा विकारांमध्ये उपयोगी.
- ’ हळद व गुळाच्या वाटाण्या एवढय़ा गोळय़ा करून वारंवार चघळाव्या. त्याने खोकल्याची ढास थांबते. हीच एकेक गोळी रात्री झोपताना खायला देऊन वावडिंगाचा काढा दिला तर मुलांच्या जुनाट कृमींच्या तक्रारी नाहीशा होतात.
- हळद एक भाग आणि आवळा पावडर दोन भाग या प्रमाणात एकत्र करून सकाळ-संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर घ्यावे. मधुमेहात अत्यंत गुणकारी. वजन जास्त असलेल्या मधुमेही व्यक्तींना यात दोन भाग त्रिफळा चूर्णही घ्यावे. ज्यांना लघवीला वारंवार जावे लागते त्यांना उपयोगी.
- अचानक आणि वारंवार होणाऱ्या लघवीसाठी हळद, तीळ व गूळ चावून खावे. वर थोडे कोमट पाणी प्यावे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Aug 2016 रोजी प्रकाशित
आयुर्मात्रा : हळद
हळद व गुळाच्या वाटाण्या एवढय़ा गोळय़ा करून वारंवार चघळाव्या. त्याने खोकल्याची ढास थांबते.
Written by वैद्य राजीव कानिटकर

First published on: 13-08-2016 at 00:38 IST
मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Turmeric