• रक्त शुद्ध करण्याचा, रक्तस्राव थांबवण्याचा आणि जंतुनाशक गुणधर्मामुळे हळद ही प्रामुख्याने बऱ्याच रक्त व त्वचाविकारांमध्ये वापरली जाते.
  • बाजारात मिळणाऱ्या हळदीपेक्षा ओली हळद घरी आणून वाळवून तिची पावडर करून ती औषधी म्हणून जास्त उपयोगी आहे.
  • हळद व कडुनिंबाच्या पानांची पावडर गुळाबरोबर एकत्र करून खावी किंवा दोन्हींची पावडर त्वचेबरोबर चोळावी. खाज येणाऱ्या सर्व त्वाचा विकारांमध्ये उपयोगी.
  • ’ हळद व गुळाच्या वाटाण्या एवढय़ा गोळय़ा करून वारंवार चघळाव्या. त्याने खोकल्याची ढास थांबते. हीच एकेक गोळी रात्री झोपताना खायला देऊन वावडिंगाचा काढा दिला तर मुलांच्या जुनाट कृमींच्या तक्रारी नाहीशा होतात.
  • हळद एक भाग आणि आवळा पावडर दोन भाग या प्रमाणात एकत्र करून सकाळ-संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर घ्यावे. मधुमेहात अत्यंत गुणकारी. वजन जास्त असलेल्या मधुमेही व्यक्तींना यात दोन भाग त्रिफळा चूर्णही घ्यावे. ज्यांना लघवीला वारंवार जावे लागते त्यांना उपयोगी.
  • अचानक आणि वारंवार होणाऱ्या लघवीसाठी हळद, तीळ व गूळ चावून खावे. वर थोडे कोमट पाणी प्यावे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Turmeric