- काविळीत हळद देत नाहीत हा गैरसमज आहे. उलट काविळीत दही किंवा ताकातून हळद पावडर दिली जाते.
- सर्व कफ प्रकृतीच्या किंवा कफाच्या विकारी व्यक्तींनी दूध घेताना कोमट व हळद पावडर घालून द्यावे. ते गायकांनाही गुणकारी आहे.
- पडल्यावर जो भाग सूजतो आणि सूज कमी होत नाही. अशा वेळी हळकुंड+रक्तचंदन+तुरटी पाण्यात उगाळून तो लेप थोडा कोमट करून लावावा.
- कोणत्याही जखमेत रक्तस्राव लगेच थांबण्यासाठी आणि जखम र्निजतुक राहाण्यासाठी हळद चेपावी.
- डोळे आल्यावर खूप दुखतात, आग होते, खूपतात अशा वेळी नुसत्या हळदीच्या काढय़ात रुमाल भिजवून त्याच्या घडय़ा डोळ्यावर ठेवाव्यात.
- मूळव्याधीतील वेदना थांबवण्यासाठी हळद उगाळून लोण्यातून लावावी.
- कांजिण्यांचे डाग जाण्यासाठी हळद व कात एकत्र उगाळून डागांवर लावावे.
- प्रसूतीनंतर दोन महिने पाव चमचा हळद रात्री झोपताना कोमट पाण्याबरोबर घ्यावी. बाळंतिणीला इन्फेक्शनचा त्रास होत नाही.
संग्रहित लेख, दिनांक 20th Aug 2016 रोजी प्रकाशित
आयुर्मात्रा : हळद
कोणत्याही जखमेत रक्तस्राव लगेच थांबण्यासाठी आणि जखम र्निजतुक राहाण्यासाठी हळद चेपावी.
Written by वैद्य राजीव कानिटकर

First published on: 20-08-2016 at 01:57 IST
मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Turmeric