• काविळीत हळद देत नाहीत हा गैरसमज आहे. उलट काविळीत दही किंवा ताकातून हळद पावडर दिली जाते.
  • सर्व कफ प्रकृतीच्या किंवा कफाच्या विकारी व्यक्तींनी दूध घेताना कोमट व हळद पावडर घालून द्यावे. ते गायकांनाही गुणकारी आहे.
  • पडल्यावर जो भाग सूजतो आणि सूज कमी होत नाही. अशा वेळी हळकुंड+रक्तचंदन+तुरटी पाण्यात उगाळून तो लेप थोडा कोमट करून लावावा.
  • कोणत्याही जखमेत रक्तस्राव लगेच थांबण्यासाठी आणि जखम र्निजतुक राहाण्यासाठी हळद चेपावी.
  • डोळे आल्यावर खूप दुखतात, आग होते, खूपतात अशा वेळी नुसत्या हळदीच्या काढय़ात रुमाल भिजवून त्याच्या घडय़ा डोळ्यावर ठेवाव्यात.
  • मूळव्याधीतील वेदना थांबवण्यासाठी हळद उगाळून लोण्यातून लावावी.
  • कांजिण्यांचे डाग जाण्यासाठी हळद व कात एकत्र उगाळून डागांवर लावावे.
  • प्रसूतीनंतर दोन महिने पाव चमचा हळद रात्री झोपताना कोमट पाण्याबरोबर घ्यावी. बाळंतिणीला इन्फेक्शनचा त्रास होत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Turmeric