पावसाळ्यात सर्दी, खोकला, घसादुखी, तापाची कणकण, साधे उलटय़ा-जुलाब असे आजार नेहमीचेच. या सर्वच आजारांमध्ये नेमके काय खावे हे अनेकदा कळत नाही. वैद्यकीय उपचारांच्या जोडीला आजार लवकर बरा होण्यासाठी मदत करणाऱ्या पथ्यकर आहाराचे काही पर्याय देत आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्दी-खोकला व घसादुखी –

  • सार किंवा सूप करताना त्यात गवती चहाची पूड घालता येईल. घशाला आलेली सूज कमी होण्यासाठी आणि आराम वाटण्यासाठी त्याचा उपयोग होतो. काळे मिरे पूड आणि लवंग पूड याचाही फायदा होतो. काळे मिरे आणि लवंगा घशात उबदारपणा आणतात. घसा बसल्यावर त्रास कमी होण्यासाठी ते चांगले. अर्थात काळे मिरे आणि लवंगा उष्ण आहेत हेही विसरून चालणार नाही. ज्यांना पित्ताचा फार त्रास आहे किंवा जळजळते त्यांनी गवती चहा पूड घालून चालू शकेल, पण मिरे टाळावेत.
  • शेवग्याच्या पानांचे सूप-पावसाळ्यात शेवग्याची पाने ताजी, हिरवी मिळतात. त्यांचे नेहमी करतो तसेच सूप करता येईल. हीच पाने गरम पाण्यात घालून त्याची वाफ घेतली तरी सर्दी-खोकला व घशाच्या त्रासांमध्ये बरे वाटते.

ताप

  • विषमज्वर, स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया यांसारखे ताप आणि काविळीसारखे खराब पाण्यातून पसरणारे आजार यात पचनशक्ती कमी होते, तसेच शरीराची ताकदही कमी होते व थकवा जाणवतो. डेंग्यू, मलेरिया आणि काविळीत यकृतही आजारी पडते. अशा वेळी यकृताला चालना देणाऱ्या दोडका, टोमॅटो, मुळा, कारले, बीट, ताक या पदार्थाचा समावेश आहारात असावा. हळद पूडही पदार्थामध्ये घालावी. या पदार्थाना आहारात स्थान दिल्याने उपयोग होत असला तरी त्यांचा अतिरेक मात्र नको.
  • ताप तसेच विषाणूजन्य वा जीवाणूजन्य संसर्गातही जवस उपयुक्त ठरते. त्यामुळे जवसाची चटणी आहारात द्यावी. मऊ भात वा खिचडीबरोबर ती खाता येईल.
  • थकवा दूर करून ताकद भरून येण्यासाठी आपण एरवी पेज, सूप ,डाळीचे पाणी हे देतोच. तसेच आमसुलाचे सार देता येईल. दर्जाळूचे सरबतही तापातील थकवा दूर करण्यासाठी मदत करते. जर्दाळू पाण्यात भिजवून हे सरबत करतात. खजुराचे वा गिलक्याचे (घोसाळ्याचे) सरबत करतात. घोसाळे या फळभाजीचे सरबत हे ऐकायला थोडे विचित्र वाटेल, परंतु कच्च्या घोसाळ्याचा रस काढून त्यात मीठ व साखर घालून नेहमीच्या सरबतासारखेच हे सरबत करतात.
  • अँटिबायोटिक औषधे सुरू असताना अनेकदा त्याच्या नंतर खायला सांगितलेले असते. अशा वेळी भाकरीच्या पिठात हळद, मीठ व ओवा घालून केलेली गरम भाकरी साजूक तुपाबरोबर खाता येईल.
  • डाळिंबाचे दाणे सतत थोडे थोडे खावेत. त्याने प्रतिकारशक्ती चांगली होते, जीवनसत्त्वे मिळतात आणि पित्त व बद्धकोष्ठही कमी होते.
  • मधल्या वेळी राजगिरा, ज्वारी अशा विविध प्रकारच्या लाह्य़ा, खाकरा असे हलके पदार्थ देता येतील. त्याने पचनशक्तीवर ताण येत नाही.

उलटय़ाजुलाब

  • उलटय़ा-जुलाबांमध्ये खाल्ले तरी समस्या आणि न खावे तरी समस्या अशी स्थिती असते. नेमके काय खावे हे कळत नसते. अशा वेळी साबुदाणा वा रव्याची खीर, शिंगाडा पिठाची खीर, खसखशीची खीर देता येईल. या खिरींमध्ये थोडे जायफळ जरूर घालावे. खसखशीच्या खिरीसाठी एक चमचा खसखस अर्धा तास पाण्यात भिजवतात व नंतर ती मिक्सरवर वाटून घेऊन दूध-साखर घालून उकळून खीर करतात. या पदार्थामध्ये अल्प प्रमाणात जायफळ घातल्याने उलटीची भावना कमी होते, तसेच आतडय़ांची जळजळही कमी होते.
  • बडिशेपेचे सरबत-जुलाबात पोटात येणाऱ्या कळा या सरबताने कमी होतात, पोटात धरलेला वायू बाहेर पडण्यास मदत होते आणि पोट हलके होऊन बरे वाटते.
  • ताजे ताक काळे मीठ व हिंग घालून घ्यावे.
  • शिंगाडा वा साबुदाण्याची ताकातील लापशीही घेता येईल. यात शिंगाडय़ाचे किंवा साबुदाण्याचे पीठ पाण्यात शिजवून घ्यावे आणि थंड झाल्यावर त्यात काळे मीठ, हिंग व ताक घालून द्यावे. ही लापशी पोटभरीची होते.
  • चिंच किंवा लिंबाचे सरबतही चांगले. उलटय़ा-जुलाबांमध्ये शरीरातून क्षार कमी होतात. ते या दोन्ही प्रकारच्या सरबतांमध्ये मिळतात आणि थकवा निघून जाण्यास मदत होते. ही सरबतेही पोटातील वायू कमी करणारी आहेत.
  • कोहाळा पाक-या दिवसांत कोहाळा चांगला मिळतो. कोहाळा पाक हा पोषक असतो. त्याने उलटीची भावनाही कमी होण्यास मदत होते आणि पोटात थंडावा निर्माण होतो.

त्वचेचे संसर्ग

  • त्वचेवर येणारी खाज, पुरळ अशा संसर्गामध्ये ‘क’ व ‘अ’ जीवनसत्त्व आणि झिंक नैसर्गिकरीत्या देणारा आहार चांगला. शेंगदाणे, जवस, तीळ- (एकत्र चटणी करून), शेवग्याच्या शेंगा, लाल भोपळा, तोंडली, मक्याचे पिवळे दाणे (भाजी करून) आहारात ठेवल्यास जंतुसंसर्गाविरुद्ध लढण्याची त्वचेची ताकद वाढते.
  • विविध कोशिंबिरी व सॅलडमध्ये तुळशीची पाने चिरून घातल्यानेही त्वचेला फायदा होतो. अर्थात याव्यतिरिक्त त्वचेची स्वच्छता राखणे गरजेचेच.
  • कारल्याचा आहारात अधूनमधून नियमित समावेश असेल तरीही त्चचेची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ते फायद्याचे ठरते. उपासाच्या दिवशी खाल्ले जाणारे रताळे त्वचेसाठी चांगले.

डॉ. संजीवनी राजवाडे

dr.sanjeevani@gmail.com