उस्मानाबाद जिल्ह्य़ात ऐन पावसाळ्यात मुद्दाम जावे आणि आवर्जून पाहावे असे एक मानवनिर्मित नवल म्हणजे नळदुर्गचा भुईकोट किल्ला आणि त्यातला जलमहाल. सोलापूरपासून फक्त ४७ किलोमीटरवर असलेल्या या किल्ल्याला लागूनच बोरी नदी वाहते आणि त्या नदीपलीकडे आहे रणमंडळ नावाचा अजून एक किल्ला. हे दोन किल्ले जोडणारा एक प्राचीन बंधारा या बोरी नदीवर बांधलेला आहे. आणि या बंधाऱ्यातच आहे जलमहाल. साधारण ऑगस्ट महिन्यात जेव्हा मोठा पाऊस होतो तेव्हा या बंधाऱ्यावरून पडणारे पाणी जलमहालाच्या छपरावरून खाली पडते. आपण तेव्हा जर जलमहालात उभे असू तर आपल्यासमोर वरून पडणाऱ्या पाण्याचा एक पडदा तयार झालेला दिसतो. हा देखावा खरोखर नयनरम्य असतो. पूर्वी अनेक वेळा हे दृश्य पाहता यायचे. परंतु आता बोरी नदीवर वरच्या बाजूला झालेल्या अजून एका बंधाऱ्यामुळे खूप मोठा पाऊस झाला की मगच हे दृश्य दिसते. नळदुर्ग किल्ल्यापाशी बोरी नदीचं पाणी वळवून एका अजस्र िभतीने हे पाणी अडविले आहे. या िभतीतील राजा कमान आणि राणी कमान अशा दोन प्रचंड धारांच्या रूपाने हे पाणी खाली कोसळते. या िभतीतच पाणी महाल, गणेश महाल, पाताळ मोरी, पाणचक्की अशा व्यवस्था केलेल्या दिसतात. पाणी महालात असलेल्या शिलालेखावरून याचे बांधकाम इ.स. १६१६ मध्ये मीर महंमद याने केल्याचे समजते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा