छत्तीसगढ राज्यातील बस्तर जिल्ह्यत चित्रकूट नावाचा अप्रतिम सौंदर्याचा नैसर्गिक धबधबा आहे; ज्यास भारताचा नायगारा म्हणतात. शक्यतो उन्हाळ्यात न जाता हिवाळा किंवा पावसाळा इथे जाण्यासाठी उत्तम. थंड हवेत चित्रकूटचे हवेत उडणारे तुषार खूप मजा आणतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विंध्यपर्वताहून वेगाने वाहत येणाऱ्या इंद्रावती नदीच्या प्रवाहाने निर्माण झालेला हा नैसर्गिक धबधबा देशात सगळ्यात मोठा आहे. धबधब्याखाली जाण्यास पायाने चालवता येणाऱ्या छोटय़ा बोटी तिथे मिळतात. साहसी मंडळी जरा जोरकस पाण्याच्या प्रवाहाखाली बोटिंग करायला नाहीतर पोहायला नक्की जातात तर धार्मिक लोकं तिथल्या शांत प्रवाहाखाली बघायला मिळणाऱ्या काही शिविलगांचे आवर्जून दर्शन घेतात. २००३ पासून शासनाच्या पर्यटन विभागाने इथे इको-टुरिझमचा प्रयत्नपूर्वक विस्तार केला आहे. नदीकाठी कॅिम्पग करता येते. दुरूनच चित्रकूटचे अवर्णनीय सौंदर्य बघण्यासाठी खास सोय केली आहे. पावसाळ्यात चित्रकूटच्या पाण्यात जास्त वाढ होते; त्यामुळे घोडय़ाच्या नालीप्रमाणे आकार असणारा चित्रकूटचा अखंड पाण्याचा प्रवाह प्रचंड दिसतो.

अलाहाबाद, खजुराहो, वाराणसीहून विमानाने जाता येते. कार्वी जवळचे रेल्वे स्टेशन, तसेच चित्रकूट धाम येथूनदेखील रेल्वे उपलब्ध आहे. अलाहाबाद, झाशी, सतनाहून नियमित बससेवा आहे. चित्रकूटहून खजुराहो जवळपास चार

तासांवर आहे. दोन्ही मिळून एकत्रित सहल आयोजित करता येते.

sonalischitale@gmail.com