चहू बाजूंनी तापलेला निळाशार समुद्र, उफाळणाऱ्या लाटा आणि वाऱ्याचा थमान याला वैश्विक पर्यटनाच्या पटलावर महत्त्वाचे स्थान आहे. समुद्रातच निसर्ग शोधणाऱ्यांना समुद्राच्या शांत, निर्मनुष्य वातावरणात स्वत:ची श्रीमंती नौका घेऊन सफरीला जाण्याची महत्त्वाकांक्षी मनीषा असतेच. किंबहुना आज जगभरात आलिशान क्रूझ जहाजावरून समुद्रपर्यटन हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. तुलनेने महागडय़ा असलेल्या या सरसफरीत भारतीय अभावानेच दिसत असले तरी हळूहळू हे चित्र बदलत चाललेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साडेसात हजार किलोमीटरचा अथांग समुद्र किनारा आणि त्यातील अनेक नैसर्गिक पाचूची बेटे असलेल्या भारताला उशिराने का होईना, परंतु समुद्रपर्यटनाच्या संधीचे गमक ध्यानात आलेले दिसून येते. आंतरराष्ट्रीय पर्यटकांसह आता भारतीयही समुद्री-पर्यटनाचा लाभ घेऊ शकतील, असे राष्ट्रीय क्रूझ धोरण आकाराला आले आहे. जहाज मंत्रालयाचा कारभार हाती असलेले नितीन गडकरी यांनी पुढील पाच वर्षांत भारतात क्रूझ पर्यटकांची संख्या सध्याच्या १.८० लाखांवरून ४० लाखांवर, तर त्यातून महसुली उत्पन्न हे सध्याच्या ७०० कोटींवरून ३५ हजार ५०० कोटींवर जाणे अपेक्षित असल्याचे अलीकडेच म्हटले आहे. देशांतर्गत पर्यटन वाढीचा दर जेथे वार्षिक १३ टक्क्यांच्या घरात असताना, क्रूझ पर्यटनात अपेक्षित वाढ ही १०० टक्क्यांहून अधिक अपेक्षिली जावी, हे बरेच काही सांगून जाणारे आहे.

भारताच्या पर्यटन क्षेत्रासाठी नवचतन्य ठरलेले आणि नव्या पर्यटन अर्थव्यवस्थेची नांदी बनलेले हे क्रूझ पर्यटन नेमके असते तरी काय? उत्तर अमेरिकेनंतर, जगातील दुसऱ्या क्रमांकाची समुद्र पर्यटन बाजारपेठ असलेल्या हाँगकाँग येथील सुविधांना त्यासाठी समजून घेतले पाहिजे. आता कुठेशी साधारण पावणेदोन लाखांच्या घरात भारतीयांनी क्रूझ पर्यटन केले असेल, तर चीन-हाँगकाँगमध्ये २४ लाखांच्या घरात लोकांनी २०१६ सालात क्रूझवारी केल्याचे दिसून येते. ड्रीम क्रुझेस ही समुद्रपर्यटन क्षेत्रातील आशियातील सर्वात मोठी कंपनी हाँगकाँगचीच आहे. भारतात कार्यरत स्टार क्रुझेसची ही पालक कंपनी होय. आशियातील सर्वात मोठी आणि ऐसपस असे गेिन्टग ड्रीम हे आलिशान जहाज याच कंपनीच्या मालकीचे आहे. चीन, हाँगकाँग, सिंगापूर, मलेशियातील पर्यटकांच्या तांडय़ांसह काही भारतीय पत्रकारांसह प्रस्तुत प्रतिनिधीला अलीकडेच या गेिन्टग ड्रीमच्या सर करण्याची संधी मिळाली.

खरे तर गेिन्टग ड्रीम क्रूझच्या सफरींना गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. जहाजाच्या या सफरीशी मुंबईच्या बंदराशी एक अनोखे नाते आहे. या १८ डेक (मजली) असलेल्या आणि तब्बल दीड लाख टन वजनाच्या जहाजाची बांधणी पेपेनबर्ग जर्मनी येथील मायर व्हेफ्र्ट शिपयार्डमध्ये झाली. ते ऑक्टोबर २०१६ मध्ये ड्रीम क्रूझच्या ताब्यात देण्यात आले. जर्मनीपासून जिब्राल्टरची सामुद्रधुनी, भूमध्य सागर, सुएझ कालवा पार करीत हे जहाज मुंबईत २९ ऑक्टोबर २०१६ रोजी दाखल झाले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखविल्यानंतरच गेिन्टग ड्रीम क्रूझ हाँगकाँगच्या दिशेने रवाना झाले. म्हणजे या पंचतारांकित जहाजाच्या उद्घाटन समारंभातच भारताच्या समुद्रपर्यटन संधी व स्वारस्याची बीजे दडली आहेत, असे स्पष्ट होते.

जहाजावरील वेगवेगळ्या श्रेणीच्या जवळपास १७०० खोल्यांमध्ये सामावून घेऊ शकतील अशा ३४००(कमाल क्षमता) पाहुण्यांची सरबराई करण्यासाठी एकूण २०१६ इतका कर्मचारी वर्ग हे या गेिन्टग ड्रीमचे एक अद्वितीय वैशिष्टय़ आहे. सप्ततारांकित हॉटेलांमध्येही प्रत्येक तीन अतिथींमागे दोन कर्मचारी इतके सरस अतिथी-कर्मचारी प्रमाण नसते. पाच रात्र-सहा दिवस आणि सप्ताहाअखेरीचे दोन रात्र-तीन दिवस अशी छोटेखानी सफरीचे दोन पर्याय येथे पर्यटकांना उपलब्ध आहेत. समुद्रमाग्रे आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत जहाजाची सफर होत असल्याने विमान प्रवासाआधी करावे लागणारे चेक इन, सिक्युरिटी चेक, इमिग्रेशन असे सर्व सोपस्कार जहाजावर प्रवेशाच्या वेळीही करावे लागतात. तथापि जहाजावरील वेगवेगळ्या सोयीसुविधांचा व्याप इतका प्रचंड आहे की, रात्रीचा दिवस केला तरी सफरीचा हा कालावधी पुरा पडत नाही. मनोरंजनासाठी एक हजार आसनी भले मोठे प्रेक्षागृह, साहसी खेळ, स्वीिमग पूल, जाकुझ्झी, वॉटर स्लाइड्स, बोिलग अँलीज्, मिनी गोल्फ क्लब, अत्याधुनिक जिम्नॅशियम, क्लब्स, लाइव्ह बँड, बठय़ा खेळाचे अनेक प्रकार, कॅसिनो आणि उंची-अभिजात ब्रॅण्डस्च्या शॉिपगची एक ना अनेक दालने असे सारे सामावून घेणारे हे जहाजाने समुद्रपटलावर एक न्यारी दुनियाच वसविली आहे. शिवाय बाहेरच्या जगाशी संपर्कासाठी जहाजावर वाय-फायद्वारे मोफत इंटरनेट जोडणी आहेच. मुंबईसह गोवा, मंगळुरू, चेन्नई, कोचीन येथील बंदरांच्या सुविधादेखील या दृष्टीने वाढविण्यात येत आहेत. जागतिक पाच महत्त्वाच्या समुद्री पर्यटन स्थळापैकी एक आणि ‘गेट वे ऑफ क्रूझ टूरिझम’ अशी मुंबईची ओळख निर्माण होण्याच्या दृष्टीने आणखी बराच मोठा पल्ला गाठावा लागणार आहे.

स्वप्नवत सफरीची वैशिष्टय़े..

* एकूण एक लाख ५१ हजार तीनशे टन वजनाचे गेिन्टग ड्रीम क्रूझ हे ३३५ मीटर लांब, ४० मीटर रुंद आणि १८ मजली उंचीचे जहाज आहे.

* युरोपियन बेड लिनेन आणि डिझायनर ब्रँड बाथ सुविधा असलेल्या येथे ऐसपस निवासी खोल्या आहेत. यातील ८० टक्क्यांपेक्षा जास्त खोल्यांसाठी खासगी बाल्कनीची सोय आहे.

* जहाजावर ३५ वेगवेगळी रेस्टॉरंट्स आणि बार संकल्पना साकारल्या गेल्या असून, निसर्गाच्या साथीने जगभरातील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेता येईल.

* कुटुंबासाठी आणि रोमांचकारी अनुभूतीसाठी जहाजामध्ये सहा वेगवेगळ्या वेगाच्या वॉटर स्लाइड्स आणि साहसी खेळ प्रकारांची उपलब्धता.

* जगभरात लोकप्रिय ठरलेली दूरचित्रवाणी मालिका ‘चायना गॉट टॅलेंट’च्या कलाकारांचा ४५ मिनिटांच्या थरारक प्रस्तुतीचा ९९९ आसनांच्या झोडियाक प्रेक्षकगृहात थेट सादरीकरण.

sachin.rohekar@expressindia.com