माझ्या एका मित्राने विक्रीबाबत हॅचबॅक श्रेणीत वरचष्मा असलेल्या एका कंपनीची कार नुकतीच खरेदी केली. भारतीय वाहन बाजारपेठेतील या कंपनीचा हिस्सा ४० टक्के. शोरूमने त्याला कॅश बोनस ऑफर देऊ केली. २० हजार रुपयांची सवलत किंवा २५ हजार रुपयेपर्यंतचे कारचे विविध सुटे भाग अशी ती योजना होती.
याबाबत त्याने काय करावे, असा साधा प्रश्न. अर्थातच तो त्या अतिरिक्त सुटे भागाच्या निर्णयाकडे वळला. आता या सुटय़ा भागांची यादी पाहा. मोल्डिंग बंपर, सीट कव्हर, स्टीअरिंग कव्हर, रिव्हर्स पार्किंग सिस्टीम, रबर मॅटिंग, मड फ्लॅप, मोबाइल चार्जर, दरवाजांमध्येही एलईडी दिवे, कुशन पिलो, ग्लॉस श्ॉम्पू, विंडो फ्रेम किट वगैरे.
हे सुटे भाग घेण्यापेक्षा सरळ २०,००० रुपये रोख घेतलेले बरे. वर वर ५,००० रुपयांचं नुकसान दिसत असलं तरी, प्रत्यक्षात ते तसं नाही. बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या वाहनांचे सुटे भाग विकणाऱ्या शहरातील प्रसिद्ध दुकानात आम्ही गेलो. वर नमूद केलेले, कंपनी देऊ करत असलेल्या सर्व सुटय़ा भागांच्या किमती काढायला आम्ही सांगितलं. त्यांनी दिलेली किंमत होती १२,२६५ रुपये. कारची शोरूम किंमत आणि सुटे भाग विक्रेत्याने दिलेली किंमत यामध्ये १२,७३५ रुपयांचा फरक होता. म्हणजे जवळपास ५१ टक्के बचत होणार होती.
अशा प्रकारे शोरूमवाले वाहन खरेदी करण्यासाठी सुटय़ा भागांच्या सवलतीचे दर देऊ करतात. चालकालाही आपल्याला अतिरिक्त बचत करता येणार, या भ्रमात असतात. पण हे सरसकट घडते असे नाही. वाहनांच्या सुटय़ा भागातून मिळणारा उत्पादक कंपन्यांचा नफा मोठय़ा प्रमाणात असतो, यात शंका नाही. कंपनीची कार विकणाऱ्यांनाही याद्वारे अतिरिक्त पैसा मिळतो. पहिल्यांदाच वाहन खरेदी करणाऱ्यांकडून अशी चूक अधिक प्रमाणात होते. अखेर हा खरेदीदार आवश्यकतेपेक्षा अधिक पैसा यानिमित्ताने खर्च करत असतो.
तेव्हा शोरूममधून अतिरिक्त सुटे भाग मग ते ऑफरच्या कोंदणातील का असेना, घेण्यापूर्वी प्रत्यक्षात बाजारात त्याच सुटय़ा भागांची किंमत काय आहे, हे तपासायला विसरू नका.
pranavsonone@gmail.com