लेणी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर अजिंठा, वेरुळ आणि सह्यद्रीच्या कानाकोपऱ्यांत काळ्या बेसॉल्टमध्ये खोदलेली सुबक लेणी येतात. बेसॉल्टव्यतिरिक्त महाराष्ट्रात, विशेषत: कोकणात आढळणारा दुसरा दगड म्हणजे जांभा दगड. हा दगड सच्छिद्र आणि ठिसूळ असल्याने लेणी खोदण्यासाठी हा दगड निकृष्ट प्रतीचा समजला जातो. त्यामुळे जांभा दगडात सहसा लेणी खोदलेली पाहायला मिळत नाहीत. कोकणापासून काहीशे मल दूर असलेल्या लातूर जिल्ह्यतील खरोसा गावाजवळ एक चक्क जांभा दगडाचा डोंगर आहे. लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीच्या पोटात झालेल्या उलथापालथीमुळे या ठिकाणी या जांभ्या दगडाच्या डोंगराची निर्मिती झाली. ती का आणि कशी झाली, यावर भूगर्भशास्त्रज्ञांची अनेक मते आहेत. ती आपण बाजूला ठेऊ या. पण या भागात असलेल्या या वेगळ्याच प्रकारच्या लालसर रंगाच्या दगडाचे त्यावेळच्या लेणी खोदणाऱ्या कलाकारांना आकर्षण वाटले असेल आणि त्यातूनच या ठिसूळ दगडात त्यांनी लेणी कोरायचे आव्हान स्वीकारले असेल. इसवी सनाच्या सातव्या-आठव्या शतकात चालुक्य राजवटीत या लेण्यांची निर्मिती झाली असे मानले जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा