मेळघाट हे मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वतरांगामध्ये वसलेले अभयारण्य आहे. या पर्वतरांगांना गाविलगड पर्वतरांग असेही संबोधले जाते. मेळघाटातून खंडू, खापर, सिपना, गाडगा आणि डोलार या पाच नद्या वाहतात. त्या पुढे तापी नदीला जाऊन मिळतात. मेळघाट हे महाराष्ट्र राज्याचे जैवविविधतेचे भांडार आहे. घनदाट जंगलात माखला, चिखलदरा, चिलादारी, पातुल्डा आणि गुगमाळ ही अतिशय दुर्गम ठिकाणं आहेत. विविध प्राणी, जैवसंपदा आणि वनांनी समृद्ध असा प्रदेश आहे.
हिरवाईची चादर पांघरलेला आणि हिरवाईचाच गालीचा अंथरलेला हा प्रदेश दूरवर पसरलेल्या ऊंच ऊंच पर्वत रांगा आणि खोल दऱ्यांमुळे श्वास रोखून धरायला लावतो. ऊंचावरून कोसळणारे धबधबे, विस्तीर्ण पसरलेली नसíगक तळी मन मोहून टाकतात. या परिसरात कोरकू आदिवासी जमात राहात असून इतर समाजाचेही लोक राहातात.
येथे पट्टेवाला वाघ, बिबळे, रानगवे, सांबर, भेकर, रानडुकर, वानर, चितल, नीलगायी, चौसिंगा, अस्वल, भूईअस्वल, रानमांजर, तरस, कोल्हे, लांडगे, ससे यासारख्या प्राण्यांबरोबरच कृष्णमृग, उडत्या खारी, मोर, रानकोंबडय़ा, राखी बगळा, भुर बगळा, करकोचे, बलाक, बदके, ससाणे, सर्पगरुड, पारवे, बुलबुल असे पक्षीही आहेत. या अभयारण्यात सागाची झाडे विपुल प्रमाणात आहेत. वाघ आणि आदिवासी लोक इथं एकत्र नांदताना पाहावयास मिळतात. मेळघाट जंगलाला कौतुकाने किपिलग प्रदेश असे संबोधण्यात येते. सातपुडा-मकलचा हा प्रदेश खोल दऱ्या आणि ऊंच पर्वत रांगांनी बनलेला आहे. पक्ष्यांचे संगीत आणि वाघांच्या डरकाळ्यांनी तेथे पर्यटनांची वेगळीच अनुभूती येते.
भारतात घोषित करण्यात आलेल्या नऊ व्याघ्रप्रकल्पांपकी एक असणारा मेळघाट व्याघ्र प्रकल्प फेब्रुवारी १९१४ रोजी अस्तित्वात आला. हा भारतातील सर्वात मोठय़ा व्याघ्र प्रकल्पांपकी एक आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात गुगामल राष्ट्रीय उद्यान, मेळघाट, वान, आंबाबरवा आणि नरनाळा या अभयारण्याचा समावेश झाला असून अमरावती जिल्ह्यचे बरेचसे क्षेत्र या व्याघ्रप्रकल्पांतर्गत येते. तर राखीव क्षेत्राचा भाग हा अमरावती, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यंमध्ये येतो.मेळघाट पाहून चिखलदऱ्याला मुक्कामी राहता येते.
कसे जाल?
हवाईमार्गे नागपूर : तिथून २४० किमी
रेल्वे : वडनेरा जंक्शन ११० किमी
रस्ता : बससेवा परतवाडा ते धारणी व बरहाणपूर
drsurekha.mulay@gmail.com