२०१३ मध्ये जैसलमेर जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले. राजस्थानमधील जैसलमेर हे शहर प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे. जैसलमेरचा शब्दश अर्थ म्हणजे राजा जैसलने बांधलेला टेकडीवरचा किल्ला. जो सोनार किल्ला किंवा स्वर्णमहल म्हणून प्रसिद्ध आहे. जैसलमेर किल्ला पिवळ्या वालुकाश्मातून बांधला गेला आहे. सूर्यप्रकाशात तो सोनेरी रंगात असा काही चमकतो की जसा काही तो सोन्याचाच बनलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या देशातला हा एकमेव किल्ला आहे ज्यात अजूनही त्या गावातील निम्म्याहून अधिक जनता किल्ल्यामध्ये वस्ती करून राहते. किल्ल्यामध्ये चारपाच जैन मंदिरे आहेत. जवळच बाजार भरतो. इथे राहण्याची हॉटेल्सदेखील आहेत. एकदा किल्ल्यात राहण्याचा अनुभव घेण्यासारखा आहे. जवळच्या गडीसागर तलावात बोटिंग करता येते. आजूबाजूला खूपशा कोरीवकाम केलेल्या छत्र्या आहेत. समोरच्या बाजूला राजस्थानी बाहुल्यांचा कठपुतली शो पाहणे मजेशीर आहे. बडा बाग, हेरीटेज म्युझियम इ. प्रेक्षणीय स्थळे आहेत. थरच्या वाळवंटात जीप राइड व कॅमेल राइडची सफर घेऊ शकतो. वाळवंटातील सूर्यास्त बघत इथल्या लोकगीत आणि लोकनृत्याचा खास राजस्थानी बाज अनुभवण्यास मजा येते. रात्रीच्या अंधारात टिपूर चांदणे बघणे हे जर तिथे कॅिम्पग केले तरच सहजसाध्य आहे. राजस्थानी थाळीचा आस्वाद नक्कीच लक्षात राहतो. अतिउष्ण व अतिथंड असे दोन्ही टोकाचे हवामान राजस्थानात आढळते. पाकिस्तानच्या सीमेलगतचे थरचे वाळवंट देशी-विदेशी पर्यटकांचे खास आकर्षण आहे. सध्या राजस्थान टुरिझम बोर्ड तिथे पर्यटन विकसित करत आहे. हे करताना मूळचे लोकजीवन विस्कळीत होऊ न देणे महत्त्वाचे ठरते.

 योग्य कालावधी : नोव्हेंबर ते मार्च

 जवळचा विमानतळ : जोधपूर, जयपूर.  जयपूर, जोधपूर, दिल्ली, कोलकाता, मुंबई, सुरत, इ. ठिकाणाहून ट्रेनने जैसलमेरला

पोचता येते. मुंबई, पुणे, बिकानेर, अहमदाबाद, जयपूर, दिल्ली इ.ठिकाणाहून बससेवा उपलब्ध आहे.

सोनाली चितळे – sonalischitale@gmail.com