पर्यटन म्हणजे केवळ छान छान निसर्गरम्यस्थळांची भटकंती नसते. तर पुरातन काळाच्या खुणा जपणारी काही ठिकाणं आडवाटेवर वसलेली असतात. नेहमीच्या भटकण्याच्या पलीकडे पाहायला लावणारे आणि प्राचीन अस्तित्वाच्या खुणा जपणारे तेर आवर्जून पाहायला हवे.

पर्यटनासाठी घराबाहेर पडायचे म्हटले की आपल्या डोळ्यासमोर मुंबई, पुण्याजवळची नेहमीचीच ठिकाणे येतात. पर्यटनासाठी उस्मानाबाद, लातूर, नांदेड वगरे जिल्ह्यंत जायचे म्हटल्यावर अनेकांच्या कपाळावर आठय़ा येतात. डोक्याला फार ताण दिला तर उस्मानाबाद जिल्ह्यतील तुळजापूर आणि नळदुर्ग ही ठिकाणे आठवतात. पण उस्मानाबाद, तुळजापूरजवळ असलेले तेर गाव मात्र आठवत नाही. जगभरातील पुरातत्त्वीय अभ्यासक, इतिहासकार, कला अभ्यासक यांना तेर पूर्वीपासूनच सुपरिचित आहे ते तेर येथील रामिलगप्पा खंडप्पा लामतुरे संग्रहालयामुळे. याशिवाय तेरणा नदीकाठी असलेले संत गोरा कुंभार (गोरोबाकाका) यांचे मंदिर, त्याच्या बाजूलाच असलेले चालुक्यकालीन शिव मंदिर, पूर्णपणे विटांनी बांधलेले महाराष्ट्रातील एकमेव उत्तरेश्वर मंदिर व एखाद्या चत्याप्रमाणे रचना असलेले महाराष्ट्रातील एकमेव त्रिविक्रम मंदिर, नृसिंह मंदिर ही ठिकाणे पर्यटनाचा आनंद द्विगुणित करतात.

Vishwa Hindu Parishad on temple and mosque row
“…म्हणून मशिदीच्या जागेवरील दावे वाढत आहेत”, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यानं सांगितलं कारण
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
Tire killer is going to be tested in three important areas of Thane railway station area
स्थानक परिसरात लवकरच ‘टायर किलर’
Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?

तेरणा नदीच्या तीरावर वसलेल्या तेर ऊर्फ तगर येथे इसवी सनपूर्व चौथ्या शतकापासून वस्ती असल्याचे पुरावे सापडतात. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात सातवाहन काळात तेर हे महाराष्ट्रातील व्यापारी आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून उदयाला आले. येथून भडोच या बंदरामाग्रे रोमन साम्राज्याशी व्यापार चालत असे. या प्रदेशात पिकणाऱ्या कापसापासून बनवलेले सुती तलम कापड, लाकूड, शंखाच्या बांगडय़ा, इत्यादी वस्तूंना रोमन साम्राज्यात मोठय़ा प्रमाणात मागणी होती. या व्यापारामुळे तगर नगराची भरभराट झाली. परदेशी प्रवासी टॉलेमी आणि ग्रीक खलाशाने लिहिलेल्या ‘पेरिप्लस ऑफ दि एरिथ्रियन सी’ या प्रवासवर्णनात तगर नगराचा उल्लेख सापडतो. त्याच कालावधीत बौद्ध धर्मीयांनी तगर येथे धार्मिक केंद्र उभारले. सातवाहनांनंतच्या यादवांपर्यंत सर्व राजवटींनी या नगरात अनेक मंदिरे बांधली. मध्ययुगीन कालखंडात इतर व्यापारी केंद्रे उदयास आल्याने तगर विस्मृतीत गेले. इसवी सन १९०१ मध्ये हेन्री कझिन यांनी तेर येथे सविस्तर पाहणी करून वृत्तांत प्रसिद्ध केला. त्यानंतर तेर येथे वेगवेगळ्या कालखंडांत पुरातत्त्वीय उत्खनन करण्यात आले.

तेर गावात शिरल्यावर प्रथम लागते ते रामिलगप्पा खंडप्पा लामतुरे संग्रहालय. आपल्या गावात परदेशी प्रवासी येतात आणि इथल्या जुन्या वस्तू घेऊन जातात हे पाहून लहान रामिलगप्पाचे कुतूहल जागे झाले. त्याने याबद्दल मुख्याध्यापकांना विचारल्यावर त्यांनी तेर गावच्या इतिहासाबद्दल आणि इथे मिळणाऱ्या वस्तूंच्या ऐतिहासिक महत्त्वाबद्दल रामिलगप्पाला माहिती सांगितली. त्यानंतर रामिलगप्पांनी अशा वस्तू जमवायला सुरुवात केली. हळूहळू गावकऱ्यांनीही आपल्याला सापडलेल्या वस्तू त्यांना आणून द्यायला सुरुवात केली. अशा प्रकारे रामिलगप्पांचा संग्रह वाढत गेला. आयुष्यभर जमवलेला संग्रह त्यांनी १९७२ मध्ये शासनाच्या हवाली केला. तोच २२,८९२ वस्तूंचा संग्रह आपल्याला रामिलगप्पा खंडप्पा लामतुरे संग्रहालयात पाहायला मिळतो. यामध्ये सातवाहन, चालुक्यकालीन नाणी, मातीची भांडी, दगडात, मातीत बनलेल्या मूर्ती, प्राणिप्रतिमा, पदक, दगडात कोरलेले शिलालेख, गद्धेगाळ, नक्षीकाम, शंखाच्या बांगडय़ा, वस्तू, हस्तीदंती वस्तू, पाण्यावर तरंगणारी वीट इत्यादी अनेक गोष्टी पाहायला मिळतात. या संग्रहालयातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहाव्या-सातव्या शतकातील उत्तरेश्वर मंदिराची लाकडी चौकट. मंदिराच्या गर्भगृहाची ही चौकट चिखलात पडून राहिल्याने इतक्या वर्षांनंतरही तशीच्या तशी होती. पुरातत्त्व खात्याने त्यावर काम करून ती संग्रहालयात ठेवलेली आहे. त्यावरील मूर्ती, नक्षीकाम, कोरीव काम पाहण्यासारखे आहे.

वस्तुसंग्रहालय पाहून त्याच रस्त्याने पुढे गेल्यावर आपण गोरोबाकाकांच्या मंदिराजवळ पोहोचतो. या ठिकाणी वारकरी आणि भक्तांचा मोठय़ा प्रमाणात वावर असतो. बाजूला चालुक्य काळातले काळेश्वर मंदिर आहे. या मंदिरात दोन सुंदर वीरगळ पाहायला मिळतात. मंदिराचा कळस आणि गर्भगृह ढासळलेले आहे. त्याची पुनर्बाधणी करण्याची आवश्यकता आहे. मंदिर परिसरात अनेक िपडी, सतीशिळा आणि समाधी पाहायला मिळतात.तेरणा नदी ओलांडून गेल्यावर आपण दाट वस्तीत असलेल्या उत्तरेश्वर मंदिरापाशी पोहोचतो. ६-७ व्या शतकात कलचुरी राजवटीत संपूर्णपणे विटांमध्ये बांधलेले हे एकमेव मंदिर आज महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. मंदिराच्या बांधकामात शोभा आणण्यासाठी विविध प्रकारचे नक्षीकाम, मकरशिल्प असलेल्या विटा खास बनवून वापरलेल्या आहेत. मंदिराबाहेर काही वीरगळ पाहायला मिळतात. उत्तरेश्वर मंदिरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर चत्यगृहासारखे गजपृष्ठाकार रचना असलेले त्रिविक्रमाचे मंदिर पाहायला मिळते. हे मंदिरही पूर्ण विटांनी बांधलेले असून मंदिरात श्रीविष्णूची त्रिविक्रम मूर्ती आहे. मंदिरासमोर असलेल्या मंडपात गरुडाची मूर्ती आहे.

कसे जाल?

रस्त्यामार्गे किंवा रेल्वेने जाता येईल. उस्मानाबादहून २५ किमी आणि तुळजापूरहून ५० किमी अंतरावर तेर गाव आहे. गावात खाण्यापिण्याचीही उत्तम सोय आहे.

अमित सामंत amitssam9@gmail.com

Story img Loader