सांगली जिल्ह्यतील वाळवा तालुक्यात कृष्णा नदीच्या खोऱ्यात सागरोबा डोंगरावर यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य वसले आहे. १९८५ मध्ये या वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा मिळाला. महाराष्ट्रातील लहान अभयारण्यांपकी एक असलेल्या सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्रफळ १०.८७ चौरस किलोमीटर इतके आहे. हे मानवनिर्मित अभयारण्य आहे. धो.म. मोहिते या वृक्ष आणि वन्यजीव प्रेमीच्या ध्यासातून साकारलेलं आणि लोकसहभागातून आकाराला आलेले हे अभयारण्य त्यामुळेच वेगळं आहे. लोकांनी ठरवलं तर शासनासोबत राहून किती उत्तम काम करता येऊ शकतं याचं सुंदर उदाहरण म्हणजे सागरेश्वर अभयारण्य. भरपूर पाऊस, धुक्याची दाटी, गार वारा आणि हिरवागार परिसर मनाला प्रसन्न करून टाकतो. विविध पक्षांचा कुंजारव, डोंगरमाथ्यावरून कोसळणारे छोटे-मोठे धबधबे आणि चिंब भिजण्यासाठी आतुरलेली माणसं.. मनातल्या ओढीला तृप्तीचा समृद्ध अनुभव देणाऱ्या या अभयारण्यात सागरेश्वर महादेवाचं मंदिर आहे. येथे प्राचीन मंदिराचा समूह आहे. एकूण ४७ मंदिरे व १३ ओवऱ्या आहेत. आंघोळीचं आणि पिण्याचे कुंड वेगवेगळे आहेत. या कुंडात वर्षभर पाणी असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा