माणसाला अन्न आणि वस्त्राइतकीच महत्त्वाची गरज असते निवाऱ्याची. म्हणजेच घराची. घर या शब्दावरून मराठी भाषेत वेगवेगळ्या म्हणी आणि वाक् प्रचार आहेत. त्याबद्दल-
आज पद्मजासाठी शिकवणीचा शब्द होता. ‘घर’. मी म्हटले, ‘‘पद्मजा, ज्या घरात राहून तू मराठीचे धडे गिरवत आहेस त्या वास्तूबद्दल आज मी तुला शिकविणार आहे.’’ घर म्हणजे होम असे सांगून मी नेहमीच्या पद्धतीने शिकवणी चालू केली.
वर्तमानपत्रात लोकसभा निवडणुका विदूषकाप्रमाणे वागणाऱ्या एका नेत्याच्या नेतृत्वाखाली लढविल्यामुळे आपण हरलो, असा आरोप त्याच पक्षाच्या पराभूत उमेदवाराने केला होता, अशी बातमी होती. या बातमीचे शीर्षक म्हणूनच ‘घरचा आहेर’ असे ठेवले होते. मी पद्मजाला म्हटले घरचा आहेर देणे म्हणजे जवळच्याच एखाद्या व्यक्तीने टीका किंवा कानउघाडणी करणे.
दुसरी बातमी होती ‘न घर का न घाट का’ अशी स्थिती झालेल्या एका नेत्याची. पद्मजाला म्हटले, ‘‘न घर का न घाट का, म्हणजे न इथला न तिथला असे झाल्यामुळे हाती काहीच न पडणे.
तिसऱ्या बातमीमध्ये एका नामवंत कलाकाराने म्हटले होते की ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ या उक्तीवर माझा मनापासून विश्वास आहे. मला चहाचा कप देताना सौ.देखील पेपरमध्ये डोकावली व म्हणूनच ती पटकन उद्गारली, ‘‘पद्मजा निंदकाचे घर असावे शेजारी म्हणजे सच्चा टीकाकार आपल्या आसपास असावा. त्याच्या टीकेमुळे आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्याची प्रेरणा आपणास मिळते व त्यामुळे आपण अधिकाधिक परिपूर्ण होत जातो.’’
इतक्यात बाहेरून रखवालदाराचा आवाज आला. तो बिल्डिंगमध्ये घुसणाऱ्या भटक्या कुत्र्याला हाकलवून देत होता. ते पाहून मी पद्मजाला म्हणालो, ‘‘कुत्र्यावरून आठवले, मराठीमध्ये एक म्हण आहे ‘थोराघरचे श्वान त्याला अहो हाड म्हणावे.’ याचा अर्थ होणार एखाद्या नामवंत माणसाच्या आजूबाजूस सदैव वावर असणाऱ्या फडतूस माणसाला पण त्याची खरी लायकी नसताना मान देणे भाग पडते. किंवा वेळप्रसंगी त्याचा उपमर्द करतानादेखील गोड शब्द वापरावे लागतात.’’
घरचे झाले थोडे..
माणसाला अन्न आणि वस्त्राइतकीच महत्त्वाची गरज असते निवाऱ्याची. म्हणजेच घराची. घर या शब्दावरून मराठी भाषेत वेगवेगळ्या म्हणी आणि वाक् प्रचार आहेत. त्याबद्दल-
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-12-2014 at 12:33 IST
मराठीतील सर्व मराठी तितुकी फिरवावी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An informative article about phrases words in marathi language