अलीकडेच पार पडलेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये विविध डिझायनर्सनी सादर केलेल्या कलेक्शनवर आर्किटेक्ट म्हणजेच वास्तुरचना या कलेचा मोठा प्रभाव असल्याचं जाणवलं. या कलेपासून डिझायनर्सना नेमकी काय प्रेरणा मिळाली असेल आणि कशी?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एखाद्या चित्रकाराचं चित्र असो वा कवीने लिहलेलं सुंदर गाणं, प्रत्येक कलेच्या मागे तिची अशी खास प्रेरणा असते. कोणतीही कला ही उत्स्फूर्त असते आणि त्या कलाकाराला एखाद्या गोष्टीचं, ठिकाणाचं भावलेलं रूपडं तो आपल्या कलेमार्फत लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. फॅशन किंवा एकूणच आपला पेहराव तयार करणं हीदेखील एक कला आहे. अगदी केसातल्या छोटय़ाशा पिनेपासून पायातल्या चप्पलपर्यंत अगदी कोणतीही गोष्ट बनवण्याचा प्रवास हा आधी प्रेरणेपासून सुरू होऊन मूळ कलाकृतीपर्यंत येऊ न पोहोचतो.
खरंतर फॅशन किंवा एकूणच पेहराव तयार करण्याची कला ही उपयोजित कलांमध्ये (अप्लाइड आर्ट) मोडत असल्याने या समूहातील कलांचा प्रत्यक्ष जीवनात होणारा उपयोग यांकडे प्रामुख्याने लक्ष दिलं जातं. त्यामुळे ‘अमुक एका डिझायनरने अमुक एका गोष्टीतून प्रेरणा घेऊन हा शर्ट बनवला आहे.’ असं जरी कोणी आपल्याला सांगितलं तरी, ‘ते सोड, हा शर्ट मला रोज घालता येणार आहे हा? तर मी विकत घेतो.’ या प्रश्नाच्या ‘हो’ या उत्तरावर आपण त्या शर्टसाठी पैसे खर्च करणार की नाही हे अवलंबून असतं. अर्थात यात आपलं काहीच चुकत नाही, पण म्हणून आपण जे कपडे घालतो त्यामागे नक्की ‘काय बुवा, डिझायनरचा विचार असेल?’ हा विचार कधीतरी करून बघायला काय हरकत आहे.

तसं पाहायला गेलो तर बाजारात आपल्याला उपलब्ध असणाऱ्या प्रत्येक कपडय़ामध्ये तो शिवताना बाजारपेठेचा, गिऱ्हाइकांचा केलेला अभ्यास असतोच. पण या अर्थात त्यांना मोठय़ा प्रमाणात कपडे तयार करायचे असल्यामुळे प्रत्येक वेळी इन्स्पिरेशन शोधण्याचा वेळ त्यांच्याकडे नसतो. पण डिझायनर्सचं तसं होतं नाही. त्यांना निवडक ग्राहकांसाठी निवडक कलेक्शन बनवायचं असतं त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कलेक्शनमागे एक प्रेरणा असते. त्यामुळेच त्यांच्या एकाच कलेक्शनमधील प्रत्येक पीसमध्ये कनेक्शन सापडतं.
प्रत्येक पीस दुसऱ्याशी एखाद्या तरी गुणामुळे जोडला गेलेला असतो. मग तो कधी रंगाच्या बाबतीत असतो, तर कधी प्रिंट्सच्या, पॅटर्नच्या बाबतीतसुद्धा आपल्याला समानता आढळू शकते.
प्रमाणबद्धता
प्रमाणबद्धता हा गुण आर्किटेक्चर आणि फॅशन यांना जोडतो. डिझायनर कोणत्या गोष्टीपासून प्रेरणा घेऊ न त्याचं कलेक्शन बनवेल याचा अंदाज त्यालाही नसतो. कधी एखादं पुस्तक त्याचं प्रेरणा ठरू शकतं तर कधी एखादं गाणंसुद्धा. विविध प्रांतांतील, देशांतील कला, परंपरा कित्येक डिझायनर्सच्या कलेक्शन्समागच्या मूळ प्रेरणा असलेल्या आपण अनेकदा पाहिलं आहे. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या लॅक्मे फॅशन वीकमधील डिझायनर्सच्या कलेक्शन्समागे अशीच एक प्रेरणा आहे ती म्हणजे ‘आर्किटेक्ट’. डिझायनर्सनी विविध देशांतील, प्रांतांतील काही ठराविक आर्किटेक्टचा वापर त्यांच्या कलेक्शनमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे केलेला दिसून आला. आर्किटक्चर हीसुद्धा फॅशनप्रमाणेच उपयोजित कलेचाच एक भाग आहे. एखाद्या छोटय़ाशा खोलीपासून ते टोलेजंग इमारतीपर्यंत प्रत्येक वास्तू बनवताना फक्त त्याची लयबद्धता आणि डिझाइन याचाच नाही तर त्याच्या प्रमाणबद्धतेचा विचारसुद्धा करावा लागतो. फॅशनच्या बाबतीतही तोच नियम लागू पडतो. प्रत्येक पेहराव बनवताना आधी पॅटर्नचा विचार सर्वात आधी करावा लागतो. साडी तयार करताना ती पाचवारी हवी की नऊ वारी याचा आधी विचार करावा लागतो. मग बाकीच्या गोष्टी ठरतात. तसंच पुरुषांच्या शर्टमध्ये कटिंगच्या वेळी एक इंचाचा फरक जरी आला तरी संपूर्ण शर्ट बिघडू शकतो. डिझायनर पायल खांडेवालाच्या म्हणण्यानुसार, ‘प्रमाणबद्धतेची गरज ही प्रत्येक गोष्ट निर्माण करताना लागतेच. फॅशनच्या बाबतीतच म्हणायचं झालं तर रंगसंगती, प्रिंट्स, पॅटर्न यांच्या अचूक प्रमाणबद्धतेतूनच उत्तम कलेक्शन तयार होऊ शकतं.’ याच प्रमाणबद्धतेला डोळ्यासमोर ठेवून बनवलेलं तिचं ‘ए परफेक्ट फिट’ हे कॉन्ट्रास्ट ड्रेसिंगचं उत्तम उदाहरण होतं. सफेद रंग हाताळणं जितकं सोप्पं वाटतं तितकंच त्याला दुसऱ्या रंगांची जोड देणं कठीण असतं. हे आव्हान पायलनं तिच्या कलेक्शनमधून लीलया पूर्ण केलं होतं.

प्रेरणा
फ्रान्स ते आसाममधील छोटंसं गावं अशा कुठूनही प्रेरणा मिळू शकते हे या वेळी डिझायनर्सनी दाखवून दिलं. फॅशन इंडस्ट्रीवर फ्रेंच संस्कृतीचा आणि त्यातसुद्धा रेनेसाँ कालखंडाचा प्रभाव अनेक डिझायनर्स आणि त्यांच्या कलेक्शन्सवर पडलेला अनेकदा पाहायला मिळाला आहे. फॅशनची सुरुवातच युरोपातून आणि मुख्यत्वे फ्रान्समधून झाली होती आणि त्यामुळेच फॅशन संदर्भातील काही प्रमुख मापदंड युरोपियन डिझायनर्सनी मांडून ठेवलेले आहेत. आजही त्यांचा प्रभाव जगभरातील वेगवेगळ्या डिझायनर्सच्या कलेक्शन्समधून दिसून येतो. रेनेसाँ काळात फ्रान्स कला क्षेत्रात अग्रस्थानी होता. चित्रकला, साहित्य, संगीत यासोबतच या काळात वास्तुकलेलासुद्धा बहार आला होता. या काळातील वास्तुकलेत भारदस्तपणा होताच, पण त्यासोबतच त्यात एक लय होती. सुबकता होती. आणि एक ठहराव होता. रेनेसाँ काळाचे हेच सौंदर्य डिजिटल प्रिंट्सच्या माध्यमातून कपडय़ांवर पकडून ठेवण्याचा प्रयत्न डिझायनर सोनिया गोहिलने यंदा केला होता.
पॅरिससारखं शहर जेव्हा प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं, तेव्हा त्याच्यावरून प्रेरणा घेऊन कोणी डिझायनर कलेक्शन करणार नाही, असं होऊच शकत नाही. या आधीसुद्धा अनेक डिझायनर्सच्या कलेक्शनमागची प्रेरणा पॅरिस आणि तेथील आर्किटेक्चर होतं. यंदाही पॅरिसमधील आर्किटेक्चरमध्ये वापरली गेलेली ब्लॅक अँड व्हाईट रंगसंगती आणि तेथील फुलांच्या बागा यांच्यावरून प्रेरणा घेऊ न डिझायनर अर्चना कोचरने तिचं कलेक्शन सादर केलं होतं.

फ्रान्सप्रमाणेच पोर्तुगीज आर्किटेक्चरचा प्रभावसुद्धा डिझायनर्सवर पडलेला दिसून येतो. भारतात पोर्तुगीज वसाहतीतील एक प्रदेश म्हणजे पाँडिचेरी. आज तेथील समाजजीवनावर पोर्तुगीज आणि तमिळ या दोन्ही संस्कृतींचा एकत्रित प्रभाव पाहायला मिळतो. पोर्तुगीजांचे स्थापत्यशास्त्राचे नमुने आणि दक्षिण भारतीय टेक्सटाईल यांचा संगम असलेले कलेक्शन यंदा डिझायनर श्रुती संचेतीने सादर केले होते. त्याचप्रमाणे डिझायनर केन फर्न्‍स याने या वेळी त्याच्या कलेक्शनसाठी पोर्तुगीजांच्या सिरॅमिक टाइल्सवरील नक्षीकामातून प्रेरणा घेतली होती.
युरोपियन आर्किटेक्चरनंतर जर कुठले आर्किटेक्चर डिझायनर्सना आकर्षित करत असेल तर ते आहे ‘इस्लामिक आर्किटेक्चर’. इस्लामिक मकबरांवरील बारीक नक्षीकाम आणि पेस्टल शेड्सचा वापर सर्वानाच मोहून टाकतो. यावरूनच प्रेरणा घेतलेले कलेक्शन यंदा डिझायनर पायल सिंघलने सादर केले होते. इस्लामिक आर्किटेक्चरमधून युद्ध, बलशाली बादशाह आणि त्यांचा रक्तरंजित इतिहास लपून राहू शकत नाही. त्यामुळेच साहजिकच या कलेक्शनला एक काळी छटा मिळते.
आर्किटेक्चरमधून फक्त टोलेजंग इमारतीच डिझायनर्सना प्रेरणा देतात असं नाही. आसाममधील छोटय़ाशा खेडय़ातील टुमदार घरंसुद्धा एखाद्या कलेक्शनमागील प्रेरणा असू शकतं. ही किमया डिझायनर देबश्री समंथाने करून दाखवली. तिने या घरांचा वापर टेक्सटाईलच्या माध्यमातून करून एकदम फंकी कलेक्शन सादर केलं होतं.
प्रिंट्स आणि एम्ब्रॉयडरी
आर्किटेक्चरचा वापर प्रत्यक्ष डिझाईनिंगमध्ये करताना त्याचं रूपांतर प्रिंट्स आणि एम्ब्रॉयडरीत होतं.
आर्किटेक्चरचा वापर डिझायनर्स प्रिंट्स, पॅटर्न्‍सच्या रूपाने करतात. डिजिटल प्रिंट्सच्या मदतीने इमारती, चर्च, मकबरा यांचे फोटो काढून त्यांचे प्रिंट्स कपडय़ांवर घेणे आता सोप्पे झाले आहे. एम्ब्रॉयडरीचा वापर करून नक्षीकाम कपडय़ांवर बुट्टय़ाच्या स्वरूपात कपडय़ांवर उतरवले जाते. त्याचप्रमाणे पुरातन इमारतींवरील रंगसंगतीसुद्धा डिझायनर्सना आकर्षित करते. त्या काळच्या बहुतेक वास्तूंवर क्रीम, बेज, सफेद, गुलाबी, फिक्कट हिरवा या रंगांचा वापर करून लाल, नारंगी हे गडद रंग मोजक्याच ठिकाणी डिटेलिंगसाठी वापरले जात असतात. या रंगांचा वापर करून डिझायनर्स त्यांची कलेक्शन्स बनवतात.
ट्रेंड्स
प्रेरणांचा विचार करण्याच्या आधी ट्रेंड्सचा विचार करावा लागतो.
प्रत्येक डिझायनरला त्याचं कलेक्शन बनवताना प्रथम सीझनचे ट्रेंड्स समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्या ट्रेंड्सच्या आधारेच आपल्या ग्राहकाची मागणी काय आहे याची कल्पना त्याला येते आणि त्यावरून तो आपलं कलेक्शन बनवत असतो. या ट्रेंड्सच्या आधाराने त्याची प्रेरणा दिशा घेते. यंदाच्या फॅशन ट्रेंड्समध्ये स्ट्रेट फिट ड्रेसेस, स्ट्र्ड आऊट फिट, पेस्टल शेड्स, सिंपल आणि एलिगंट डिटेलिंग यांचा समावेश आहे. आणि या सर्व मुद्दय़ांचा समावेश आर्किटेक्चरमध्येसुद्धा होतो. त्यामुळे यंदा अनेक डिझायनर्सची आर्किटेक्चर ही प्राधान्य प्रेरणा ठरली आहे. थोडक्यात आर्किटेक्चरच्या माध्यमातून पॉवर ड्रेसिंग हा मुद्दासुद्धा अधोरेखित झालेला पाहायला मिळतो. पण एका ठिकाणी जिथे आर्किटेक्चर पॉवर ड्रेसिंगचा पुरस्कार करतं तिथेच दुसरीकडे ताजमहालसारखा मकबरा, पॅरिससारखं शहर त्यांना बांधण्यामागचा मूळ उद्देश म्हणजे प्रेम, नजाकत, प्रत्येक इमारत बांधताना त्याला जोडला गेलेला भावनिक बंध यांमुळे कलेक्शनला एलिगन्सची किनारसुद्धा लाभते.
थोडक्यात ‘एक से भले दो’ या उक्तीला सार्थ करत यंदा आर्किटेक्चर आणि फॅशन या दोघांनी हातात हात घालून काम केलेलं यंदा बऱ्याच कलेक्शनमधून समोर आलेय. यांमुळे आपल्या इतिहासाची पानेही चाळली गेली आणि नेहमीपेक्षा थोडी हटके कलेक्शन्ससुद्धा पहायला मिळाली.