पोस्टकार्डाचा संवाद.. भिंतीवर शीर्षक लिहिलेले.. सोबत दोन जुने वॉकमन. त्यातील एकावर रेकॉर्डिग सुरू आहे. कलादालनात कलाकृती पाहण्यासाठी आलेल्या रसिकांमधील संवाद किंवा जे काही तिथे घडते आहे, ते त्यावर रेकॉर्ड होते आणि पलीकडे असलेल्या दुसऱ्या वॉकमनवर ते सारे रेकॉर्ड होणारे ऐकण्याची सोयदेखील आहे. त्याही पलीकडे भितींवर आणखी एक वॉकमन उघडून ठेवलेल्या अवस्थेत आहे. त्यावर मध्यभागी केसांचा एक पुंजका अडकलेल्या अवस्थेत. तो सारखा त्या वॉकमनच्या खाचेत अडकून त्याचा विशिष्ट आवाज येतोय.. तो काही सांगण्याचा प्रयत्न करतोय का? मुंबईसारख्या शहरात सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्यांच्या व्यथा मांडणारी ही कलाकृती आहे अमोल पाटील या कलावंताची. यातील केसांचा पुंजका हा लोकांनी नाकारलेल्या, टाकलेल्या वस्तूंचे प्रतिनिधित्व करतो आणि त्याच्याशी संबंधित काम करणारे सफाई कामगारही काही सांगण्याचा प्रयत्न करताहेत, असे त्याला प्रतीकात्मक पद्धतीने सुचवायचे आहे.
कलाजाणीव
पोस्टकार्डाचा संवाद.. भिंतीवर शीर्षक लिहिलेले.. सोबत दोन जुने वॉकमन. त्यातील एकावर रेकॉर्डिग सुरू आहे.
First published on: 06-02-2015 at 01:04 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Art