lp03लंडन येथील नेहरू सेंटरतर्फे प्रतिवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या भारत महोत्सवामध्ये एका भारतीय कलावंताला पाचारण करण्यात येते. या महोत्सवाचे निमंत्रण मिळणे हे कलावंतांसाठी मानाचे मानले जाते. यंदाच्या महोत्सवासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध छायाचित्रकार सी. आर. शेलारे यांना पाचारण करण्यात आले आहे. त्यांचे प्रदर्शन सध्या लंडन येथे सुरू आहे. सध्या दिवस रंगपंचमीचे असून अशाच एका रंगपंचमीदरम्यान त्यांनी टिपलेले हे छायाचित्रही याच प्रदर्शनात आहे. रंगांशी खेळण्यात माहीर छायाचित्रकार, असे शेलारे यांच्याबाबतीत म्हटले जाते.
सी. आर. शेलारे

lp02

Story img Loader