अनंत जोशी वर्षां-दीड वर्षांतून फार तर एकच मोठं प्रदर्शन करतो. त्याच्या नव्या ‘मास्करेड अॅण्ड अदर अपॉलॉग्ज’ या प्रदर्शनासाठी काम सुरू असताना फ्रान्सच्या ‘शार्ली एब्दो’ या व्यंगचित्र-नियतकालिकाचा बोलबाला भारतात नव्हताच, पण २०१४ सालच्या बदलत्या राजकीय-सांस्कृतिक परिस्थितीत व्यंगचित्रांनी मात्र कलेची स्वायत्तता कायम ठेवली आहे, असं अनंतला वाटत होतं. यातूनच त्यानं, वृत्तपत्रांत छापून आलेल्या व्यंगचित्रांवर आधारित मालिका रंगवण्याचं ठरवलं. ती व्यंगचित्रं जशीच्या तशी न सादर करता, उलट त्यातला आशय कळणार नाही आणि ती चित्रंच वाटतील अशाच पद्धतीनं जलरंग आणि अन्य रंगसाधनं त्याने कागदावर वापरली. ही चित्रं टीव्हीच्या पडद्याप्रमाणे जणू, आतून प्रकाश असलेली भासावीत, अशा प्रकारे त्यांची मांडणी केली. हे प्रदर्शन सुरू असतानाच ‘शाली एब्दो’च्या कार्यालयावर हल्ला झाला.. आणि व्यंगचित्रांचे असे देव्हारे माजवल्यासारखं त्यांना ‘साजरं’ करणं, हे अनंतसारख्या ख्यातनाम चित्रकारानं का आरंभलं असेल, हा प्रश्न पडलेल्यांना मनोमन उत्तर मिळण्याची वाट खुली झाली.
अनंत जोशी
कलाजाणीव
अनंत जोशी वर्षां-दीड वर्षांतून फार तर एकच मोठं प्रदर्शन करतो. त्याच्या नव्या ‘मास्करेड अॅण्ड अदर अपॉलॉग्ज’ या प्रदर्शनासाठी काम सुरू असताना फ्रान्सच्या ‘शार्ली एब्दो’ या व्यंगचित्र-नियतकालिकाचा...
First published on: 30-01-2015 at 01:00 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Art