नॅशनल जिओग्राफिक सोसायटीने छायाचित्रणाच्या प्रचारप्रसारार्थ युवर शॉट फोटो कम्युनिटी स्थापन केली आहे. त्यात अनेक तरुण छायाचित्रकार त्यांनी टिपलेले महत्त्वपूर्ण क्षण सादर करत असतात. गेल्याच आठवडय़ात सौविक कुंडा यांनी टिपलेले हे छायाचित्र नॅशनल जिओग्राफिकने प्रसिद्ध केले. रणथंबोरच्या जंगलात एका वाघिणीने बछडय़ांना जन्म दिल्यानंतर सौविकने त्यांचे अवखळ बालपण अनेक छायाचित्रांमध्ये बंदिस्त केले. त्यातील एक दिलखेचक छायाचित्र.

Story img Loader