बनारसचा घाट हा सर्व वयोगटातील चित्र— छायाचित्रकारांना विषय म्हणून नेहमीच पुरून उरतो. म्हणूनच त्या सर्व चित्रांमध्ये आपल्या चित्राचे वेगळेपण राखणे हा कलावंतांसाठी नेहमीच आव्हानात्मक राहिलेला भाग असतो. कोलकात्याच्या आशिफ होसैन याने तेथील सरकारी आर्ट स्कूलमधून प्रशिक्षण घेतले आणि नंतर वारसास्थळांचे चित्रण करण्याची मोहीम हाती घेतली. बहुतांश कृष्णधवल आणि लाल, निळा किंवा चॉकलेटी रंगाचा अतिशय माफक वापर अशी त्याची चित्रणशैली आहे. त्यामुळे एक वेगळीच वातावरणनिर्मिती चित्रामध्ये होते. आशिफचे प्रदर्शन सध्या खार पश्चिमेस असलेल्या रिदम कलादालनात सुरू असून ३१ जुलैपर्यंत पाहता येईल.
आशिफ होसैन – response.lokprabha@expressindia.com
कलाजाणीव
बनारसचा घाट हा सर्व वयोगटातील चित्र— छायाचित्रकारांना विषय म्हणून नेहमीच पुरून उरतो. म्हणूनच त्या सर्व चित्रांमध्ये आपल्या चित्राचे वेगळेपण राखणे हा कलावंतांसाठी नेहमीच आव्हानात्मक राहिलेला...
First published on: 17-07-2015 at 01:03 IST
मराठीतील सर्व कलाजाणीव बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Art