तरुण कलावंतांच्या पोटेन्शिअल या गटातर्फे या आठवडय़ात एक कृष्णधवल प्रदर्शन पार पडले. यातील चित्रे— छायाचित्रे सारी कृष्णधवल होती. त्या कृष्णधवलमधील मजा काही औरच असते. त्याकडेच रसिकांना वळविण्याचा हा एक प्रयत्न होता. यात मृत्युंजय कुमार याने टिपलेले हे छायाचित्र. यामध्ये चित्रचौकटीची एक मजा आहे. माती उकरणाऱ्या यंत्राच्या हाताची रचना पाश्र्वभूमीस ठेवून केलेले हे चित्रण विषयाच्या बाबतीत म्हणूनच वेगळे ठरते. त्यातही त्या यंत्राच्या चालकाच्या केबिनमधील तडकलेली काच या छायाचित्राला आणखी एक वास्तवाची मिती प्राप्त करून देते.
मृत्युंजय कुमार – response.lokprabha@expressindia.com
कलाजाणीव
तरुण कलावंतांच्या पोटेन्शिअल या गटातर्फे या आठवडय़ात एक कृष्णधवल प्रदर्शन पार पडले. यातील चित्रे— छायाचित्रे सारी कृष्णधवल होती. त्या कृष्णधवलमधील मजा काही औरच असते.

First published on: 17-07-2015 at 01:02 IST
मराठीतील सर्व कलाजाणीव बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Art