विविध आकाराच्या कॅनव्हॉसवर चित्रण करणारे अनेक जण असतात पण वास्तवदर्शी चित्रण पुरुषभर उंचीच्या कॅनव्हॉस किंवा कागदावर चितारायचे तर मात्र परिप्रेक्क्षाचे (पस्र्पेक्टिव्हचे) भान त्या चित्रकाराला जबरदस्त असावे लागते. असे उत्तम भान राखणाऱ्या नव्या पिढीतील चित्रकारांमध्ये सुरेश भोसले यांचा समावेश होतो. सर जजी (जेजे) कला महाविद्यालयातून भोसले यांनी ललित कलेमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली असून त्यांना प्रतिष्ठेची के.के. हेब्बर, आर्ट सोसायटी ऑफ इंडियाची विद्यार्थी शिष्यवृत्तीही मिळाली. २०००, २००६, २००७ व २००९ या सर्व वर्षांंसाठी त्यांना बॉम्बे आर्ट सोसायटीचा प्रतिष्ठेचा निसर्गचित्रण पुरस्कार मिळाला असून २००२ साली जेजेचा पी. ए. धोंड पुरस्कारही मिळाला. जलरंगावर त्यांची चांगली हुकमत आहे.
सुरेश भोसले
कलाजाणीव
विविध आकाराच्या कॅनव्हॉसवर चित्रण करणारे अनेक जण असतात पण वास्तवदर्शी चित्रण पुरुषभर उंचीच्या कॅनव्हॉस किंवा कागदावर चितारायचे तर मात्र परिप्रेक्क्षाचे (पस्र्पेक्टिव्हचे) भान त्या चित्रकाराला...

First published on: 03-07-2015 at 01:03 IST
मराठीतील सर्व कलाजाणीव बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Art