गेली दोन वर्षे इन्फ्रारेड फोटोग्राफीचा वापर करत उद्धव ठाकरे यांनी अनेक प्रयोग केले. त्यातून साकारलेल्या काही उत्तम छायाचित्रांचे प्रदर्शन गेल्याच आठवडय़ात जहांगीर कलादालनात पार पडले. त्या निमित्ताने सामान्य रसिकांना इन्फ्रारेड फोटोग्राफीतील काही अनोखे प्रयोग पाहता आले. या तंत्रामध्ये केवळ लाल रंगाचे किरण फोटोप्लेटपर्यंत पोहोचतात व उर्वरित रंगांचे किरण न पोहोचू शकल्याने त्यांची प्रतिमा केवळ कृष्णधवल असल्यासारखीच दिसते. यामुळे त्यातील लाल रंगाचा नेमका उठाव घेऊन चांगले चित्रण करता येते. मात्र त्यासाठी छायाचित्रकाराला त्या तंत्राची नेमकी जाण असावी लागते. ती जाण ठाकरे यांना असल्याचे त्यांच्या छायाचित्रांतून प्रत्ययास येते. कृष्णधवल छायाचित्रांमध्येही त्यांनी हे इन्फ्रारेड तंत्र वापरून वेगळा परिणाम साधण्यात यश मिळवल्याचे या प्रदर्शनात लक्षात आले. उद्धव ठाकरे आजवर एरिअल व वाइल्डलाइफ फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध होते. पण या प्रदर्शनात त्यांनी त्यांचे व्यक्तिचित्रणासंदर्भातील कौशल्यही तेवढय़ाच ताकदीने सादर केल्याचे अनुभवता आले.
उद्धव ठाकरे
कलाजाणीव
गेली दोन वर्षे इन्फ्रारेड फोटोग्राफीचा वापर करत उद्धव ठाकरे यांनी अनेक प्रयोग केले. त्यातून साकारलेल्या काही उत्तम छायाचित्रांचे प्रदर्शन गेल्याच आठवडय़ात जहांगीर कलादालनात पार पडले. त्या निमित्ताने...
First published on: 16-01-2015 at 01:02 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Art