‘‘अरेच्चा! बोटीतून प्रवासाची सुरुवात नेमकी कुठून बरं करावी?..’’ गेल्याच आठवडय़ात पार पडलेल्या पोटर्र्ेट आर्टिस्ट ग्रुपच्या वार्षिक सोहळ्यात दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावणाऱ्या चित्रकार प्रमोद lp05कुर्लेकर यांचे हे चित्र; लहान मुलांतील बाल्य, निरागसता आणि कुतूहल या भावनांचे बोलके चित्रण करते.lp02
सांगलीच्या कलाविश्व महाविद्यालयातून जीडी आर्ट प्रथम श्रेणीत पूर्ण केल्यानंतर प्रमोद कुर्लेकर यांना २००४-०६ या वर्षांंसाठी ‘पूर्णप्रज्ञा इन्स्टिटय़ूट ऑफ फाइन आर्ट’तर्फे वासुदेव कामत यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी प्रकल्प शिष्यवृत्ती मिळाली. १९९९ साली राज्य पुरस्कार (विद्यार्थी), २००६, २००७, २०१० राज्य पुरस्कार व्यावसायिक गटात, २००१ कॅम्लिन आर्ट फाउंडेशन पुरस्कार विद्यार्थी गटात तर नंतर हाच पुरस्कार २०११ साली व्यावसायिक गटात त्यांना मिळाला आहे. २००७, २००८, २००९ अशी तीन वर्षे बॉम्बे आर्ट सोसायटीचा राज रवि वर्मा पुरस्कार मिळविण्याची हॅट्ट्रिकही त्यांच्या नावावर आहे. तर २०११ सालीही त्यांना हाच पुरस्कार पु्न्हा एकदा मिळाला. तरुण आश्वासक चित्रकारांमध्ये त्यांचा समावेश होतो.