सकाळपासून फोन जसा हट्टाला पेटला होता. कधी एंगेज, कधी स्विच ऑफ तर कधी आऊट ऑफ रेंजचे संदेश मिळत होते. पुण्यातील मैत्रिणीला तातडीचा निरोप द्यायचा होता. तिच्याकडूनपण तात्काळ उत्तराची अपेक्षा होती. अर्थातच व्हॉट्सअॅपला पर्याय नाही, हे लक्षात आले आणि सेलफोनमध्ये मेसेज लिहायला बसले. बाजूलाच नुकताच वाचून संपविलेला ‘लोकप्रभा’चा अंक होता. या अंकात कालिदासाच्या मेघदूतविषयी लेख होता. मुख्य म्हणजे कालिदासानी हे अजरामर काव्य नागपूरच्या रामटेक येथील ‘रामगिरी’ टेकडीवर बसून लिहिले होते हे या लेखावरून प्रथमच समजले. जगातील अजरामर अशा पहिल्यावहिल्या दूतकाव्याचा जन्म नागपुरात झाला. कालिदासासारख्या श्रेष्ठ कवीचे येथे वास्तव्य होते, या विचाराने खरंच ऊर भरून आला. पण. ए. एक मिनिट. अहो, मेघदूत. आणि व्हॉट्सअॅप शेजारी मेघदूत पडलाय, हातात व्हॉट्सअॅप आहे. या दूताचा इतका प्रवास कधी, केव्हा, कसा झाला? छे, असं कसं, आपण सर्वच साक्षीदार आहोत त्याला. खरंतर आपलंच कर्तृत्व आहे ते!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा