सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष चंद्र-हर्षलचा लाभ योग हा स्वत:ला चांगल्या प्रकारे परखण्यासाठी उपयुक्त ठरेल. आपल्या कमतरतांवर मात करून पुढे जाल. नोकरी-व्यवसायात कामाचे व वेळेचे नियोजन करावे. सहकारी वर्गाला योग्य मार्गदर्शन मिळाल्याने कामातील चुका टळतील. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. मुलांचे प्रयत्न सफल होतील. वडीलधाऱ्या मंडळींची काळजी घ्याल. जोडीदारासह प्रेमाचे नाते दृढ होईल. डोळे, खांदे आणि श्वसनाचे त्रास जाणवल्यास त्वरित उपचार घ्यावेत.
वृषभ चंद्र-गुरूचा समसप्तम योग हा ज्ञानवर्धक योग आहे. गरजवंतांना मदतीचा हात पुढे कराल. नोकरी-व्यवसायात अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळेल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळवाल. सभा आणि चर्चा गाजवाल. सहकारी वर्गाच्या मदतीने कामात नेमकेपणा दाखवाल. आर्थिक गणिते नव्याने मांडाल. परिस्थितीचा साकल्याने विचार करून मगच निर्णय जाहीर कराल. मुलांची प्रगतीच्या दिशेने वाटचाल चालू होईल. जोडीदाराच्या कष्टाला फळ मिळेल. कफ, सर्दी, खोकला बळावेल.
मिथुन चंद्र-नेपच्यूनचा नवपंचम योग हा भावनाप्रधान योग आहे. लेखन, वाचन, मनन, चिंतन यात अंत:स्फूर्तीचा लाभ होईल. वैचारिक समतोल साधाल. नोकरी-व्यवसायात मोठय़ा संधी चालून येतील. हाती घेतलेले प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी सातत्य आणि कठोर परिश्रमाची तयारी ठेवाल. मुलांच्या खर्चावर आळा घालावा लागेल. त्यांच्या अवाजवी हट्टावर नियंत्रण ठेवा. मित्रांच्या कठीण प्रसंगी मदतीला धावाल. डोळे आणि ओटीपोटाचे दुखणे अंगावर काढू नका.
कर्क चंद्र-शनीचा समसप्तम योग हा सातत्याचे धडे देणारा योग आहे. धरसोड वृत्ती सोडून शिस्तीचा अवलंब केल्यास वरवर कठीण वाटणारे काम लवकरच हातावेगळे कराल. वरिष्ठांचा तगादा सहन करावा लागेल. सहकारी वर्गाच्या मदतीला तोड नाही. जोडीदारासह हलके वाद होतील. त्यात कटुता नसेल. मुलांचे गैरसमज दूर कराल. ओळखीच्या व्यक्तींना मदत करताना डोईजड जोखीम उचलू नका. गुडघे आणि पोटऱ्या वातामुळे भरून येतील. आहारात योग्य बदल करावे लागतील.
सिंह चंद्र-बुधाचा लाभ योग हा व्यवहार आणि भावना यांचा समतोल राखणारा योग आहे. चंद्राच्या कुतूहलाला बुधाच्या बुद्धीची जोड मिळाल्याने संशोधन क्षेत्रात कार्य करण्याची संधी उपलब्ध होईल. नोकरी-व्यवसायात आपल्या पदाला योग्य असा अधिकार गाजवाल. सहकारी वर्गाच्या गुणांचे कौतुक कराल. पूर्वीच्या ओळखीतल्या मान्यवरांच्या भेटी होतील. आर्थिक नियोजन कामी येईल. कंबर किंवा पायातील शीर दबल्याने दुखणे वाढण्याची शक्यता!
कन्या शुक्र-मंगळाचा युतियोग हा उत्साहवर्धक आणि नवनिर्मितीचा कारक योग आहे. शुक्राच्या कलात्मक दृष्टीला मंगळाच्या तंत्रज्ञानाची जोड मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा मिळवाल. आपल्या कामातील अचूकता आपणास योग्य दाद मिळवून देईल. सहकारी वर्गाचे साहाय्य महत्त्वाचे ठरेल. जोडीदाराचे काम रखडल्याने त्याची मन:स्थिती नाजूक होईल. त्याला भावनिक आधाराची गरज भासेल. मुलांचे कष्ट फळतील. आतडय़ांचे आरोग्य जपावे लागेल.
तूळ बुध-गुरूचा नवपंचम योग आध्यात्मिक प्रगतिकारक योग आहे. बुधाच्या बुद्धीला गुरूच्या ज्ञानाची साथ मिळेल. या ज्ञानाचा व्यावहारिक जीवनात यथायोग्य उपयोग कराल. नोकरी-व्यवसायात आपुलकीची नाती दृढ होतील. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. सहकारी वर्गाकडून उल्लेखनीय मदत मिळेल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात नव्या घडामोडी होतील. परिस्थितीचा स्वीकार करावा लागेल. मुलांच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न घ्याल. अपचन आणि पित्ताचा प्रभाव त्वचेवर दिसून येईल.
वृश्चिक चंद्र-मंगळाचा युतियोग हा उत्साहवर्धक योग आहे. संकटातूनही संधीचा शोध घ्याल. आपल्यातील गुणांचा पुरेपूर उपयोग करून इतरांच्या मदतीला धावाल. नोकरी-व्यवसायातील अडचणी तात्पुरत्या असल्याने त्यांचा फार विचार करून ताण वाढवू नका. सहकारी वर्गासह मोजकेच बोलावे. जोडीदाराच्या कामाचा वेग वाढल्याने त्याच्या मेहनतीचे चीज होईल. मुलांच्या बुद्धिमत्तेला पोषक वातावरण आणि संधी उपलब्ध होतील. शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखा.
धनू रवी-चंद्राचा लाभ योग हा सामाजिक कार्याला पूरक ठरेल असा योग आहे. समाजातील गरजवंतांना मदतीचा हात पुढे कराल. नोकरी-व्यवसायात स्वत:च्या हिमतीने महत्त्वाचे निर्णय जाहीर कराल. थोडय़ाफार प्रमाणात जोखीम पत्करावी लागेल. वरिष्ठ आणि सहकारी वर्गाकडून चांगली साथ मिळेल. जोडीदाराचा आत्मविश्वास वाढेल. मुलांना त्यांचे त्यांना निर्णय घेऊ द्या. पचन संस्थेचे कार्य सुधारण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करणे आवश्यक ठरेल.
मकर रवी-नेपच्यूनचा नवपंचम योग हा वडीलधाऱ्या मंडळींकडून उत्तेजन देणारा योग आहे. त्यांच्या अनुभवातून आपणास महत्त्वाचे धडे मिळतील. नोकरी-व्यवसायात हाती घेतलेल्या कामांना गतिमान करण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागतील. आपली मते सहजासहजी वरिष्ठांना पटणार नाहीत. डोकं शांत ठेवावे. जोडीदाराच्या कामाचा व्याप वाढेल. प्रगती होईल. मुलांना योग्य मार्गदर्शन कराल. हाडं, सांधे, शिरा यांचे दुखणे बळावल्यास वैद्यकीय उपचार घ्यावेत.
कुंभ चंद्र-नेपच्यूनचा नवपंचम योग हा कार्यशीलतेला पुष्टी देणारा योग आहे. आपल्या भावनांना योग्य न्याय द्याल. सकारात्मक विचारांचा प्रसार कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मोठय़ा जबाबदाऱ्या पार पाडाल. सहकारी वर्गाला आपला पाठिंबा द्याल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. मुलांचा प्रगतिकारक प्रवास मनाला आनंद देईल. जोडीदारासह प्रेमाचे आणि विश्वासाचे संबंध दृढ होतील. दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार बळावतील. पथ्य पाळावे.
मीन चंद्र-शुक्राचा युतियोग हा आपुलकी, जिव्हाळा वाढवणारा योग आहे. जवळच्या व्यक्तींचे प्रेम मिळवाल. मुलांच्या भावनांची कदर कराल. जोडीदाराच्या कामातील यशामुळे कौटुंबिक वातावरणातही उत्साह असेल. नोकरी-व्यवसायात परदेशासंबंधित कामे मार्गी लागतील. सहकारी वर्गाची मेहनत दिसून येईल. समाजासाठी आपल्या हातून महत्त्वाचे काम घडेल. मोठय़ा आर्थिक उलाढाली करू नका. फुप्फुसाचे आरोग्य जपा. योग्य आहार आणि व्यायाम याला पर्याय नाही.