सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-मंगळाच्या केंद्र योगामुळे मनाची एकाग्रता कमी होईल. अविचाराने कोणताही निर्णय घेऊ नका. नोकरी-व्यवसायात न सहकारीवर्गाकडून अपेक्षित काम करून घेण्यासाठी थोडे कडकपणे वागाल. जोडीदारासह सामंजस्याने वागणे हितावह ठरेल. लहरी स्वभावाला आळा घालाल. कौटुंबिक वातावरण आनंदी व उत्साही राहील. कुटुंब सदस्यांकडून शुभवार्ता समजतील. पचन व उत्सर्जन संस्थेत बिघाड होईल. वैद्यकीय सल्ला आवश्यक!

वृषभ चंद्र-बुधाच्या नवपंचम योगामुळे मनातील गोष्टी योग्य प्रकारे व्यक्त कराल. वाचन, लेखन यांत मन रमेल. कामातल्या पद्धतीतील छोटय़ा बदलामुळे मोठा फायदा होईल. नोकरी-व्यवसायात सरकारी कामे मार्गी लागतील. आपल्या ज्ञानाची इतरांवर छाप पाडाल. सहकारीवर्गाला योग्य मार्गदर्शन कराल. जोडीदारासह चर्चा कराल. त्याच्या कामाच्या तणावातून त्याला हलकेपणा द्याल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. लघवीची जळजळ होईल.

मिथुन चंद्र-बुधाच्या केंद्र योगामुळे चातुर्याने परिस्थिती हाताळाल. एखाद्या गोष्टीबद्दल मनात शंका आल्यास मनमोकळ्या चच्रेतून ती दूर कराल. नोकरी-व्यवसायात वैयक्तिक पातळीवर व संस्थेच्या दृष्टीनेही लाभदायक ठरतील अशा योजना राबवाल. सहकारीवर्गाच्या उत्कर्षांचा विचार कराल. जोडीदार त्याच्या कामाच्या व्यापात अधिकच व्यस्त असेल. कुटुंबाला फारसा वेळ देऊ शकणार नाही. महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आपणच पार पाडाल. कफ विकार वाढेल.

कर्क गुरू-चंद्राच्या केंद्र योगामुळे आíथक स्थिती चांगली राहील, परंतु अनावश्यक ठिकाणी खर्च कराल. स्वत:वर नियंत्रण ठेवणे आवश्यक! नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे मोलाचे मार्गदर्शन मिळेल. सहकारीवर्गाकडून योग्य ते साहाय्य लाभेल. कामे वेळेत पूर्ण कराल. जोडीदारासह वेळ आनंदात जाईल. लहान-मोठे प्रश्न चच्रेने सोडवाल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. कुटुंब सदस्यांची आजारपणात सेवाशुश्रूषा कराल. मानसिक ताणतणावामुळे दमणूक होईल.

सिंह मंगळ-नेपच्यूनच्या नवपंचम योगामुळे आपल्या कलात्मक छंदांसाठी वेळ राखून ठेवाल. तंत्रज्ञानाचा सर्जनशीलतेने उपयोग करून घ्याल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे साहाय्य लाभेल. नव्या गोष्टी शिकायला मिळतील. सहकारीवर्गाला आवश्यक ती मदत कराल. जोडीदाराची समजूत काढावी लागेल. मनातील प्रेम योग्य प्रकारे व्यक्त कराल. कुटुंबातील सदस्यांना आपला आदरयुक्त धाक राहील. युरीक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्याने सांधेदुखीचा त्रास उद्भवेल.

कन्या शनी-चंद्राच्या प्रतियोगामुळे हाती घेतलेली कामे लांबणीवर पडतील. पण धीर सोडू नका. नोकरी-व्यवसायात निर्धाराने पुढे जाल. योग्य निर्णय योग्य वेळी घेणे आवश्यक आहे. सहकारीवर्गाकडून चांगले मार्गदर्शन मिळेल. जोडीदार भावनिक पािठबा देईल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. तरुणांच्या अडचणींवर चच्रेने मात कराल. आरोग्य चांगले राहील.

तूळ चंद्र-मंगळाच्या लाभयोगामुळे हाती घेतलेले काम जिद्दीने पूर्ण कराल. कष्टाची तयारी दाखवाल. नोकरी-व्यवसायात अधिकाराचे पद भूषवाल. वरिष्ठांचा योग्य तो मान राखाल. सहकारीवर्गाच्या मदतीमुळे आत्मविश्वास वाढेल. जोडीदारासह जुळवून घ्याल. एकमेकांसाठी वेळ काढाल. कौटुंबिक वातावरण उत्साही असेल. नातेवाईक व मित्रमंडळी गरजेला उपयोगी पडतील. क्षुल्लक निमित्ताने जखम झाल्यास ती चिघळण्याची शक्यता वाटते. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

वृश्चिक गुरू-हर्षलच्या नवपंचम योगामुळे आपला स्वतंत्र बाणा जपणे पसंत कराल. संघाचे नेतृत्व कराल. तडफदारपणाचा लाभ होईल. नोकरी-व्यवसायात आíथक निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. सहकारीवर्ग मनाजोगते काम करेल. जोडीदाराची उन्नतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील. त्याला आपल्या भावनिक आधाराची जरूर भासेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. साथीच्या आजारांपासून सावध राहा. आहार व व्यायामाकडे लक्ष द्या.

धनू गुरू-चंद्राच्या केंद्र योगामुळे अनावश्यक खर्चात वाढ होईल. अनेक अडचणींना धर्याने सामोरे जाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे म्हणणे मनाविरुद्ध मान्य करावे लागेल. सहकारीवर्ग आपल्या बाजूने उभा राहील. सोपवलेली कामे वेळेत पूर्ण करेल. जोडीदार कामानिमित्त परदेश वारी करेल. एकमेकांच्या कार्यक्षेत्राचा आदर बाळगाल. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. नातेवाईकांना मदत कराल. मांडय़ा व पोटऱ्यांचे स्नायू आखडण्याची शक्यता भासते.

मकर रवी-चंद्राच्या केंद्र योगामुळे मनातील मोठे विचार कृतीत आणणे कठीण जाईल. हाती घेतलेली कामे पूर्णत्वास नेण्यास जास्त मेहनत घ्यावी लागेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या विचारांनी पुढे जाणे हितावह ठरेल. सहकारीवर्ग तात्पुरते सांभाळून घेईल. जोडीदारासह मोकळी चर्चा कराल. त्याच्या अस्वस्थतेचे कारण शोधून काढाल. कौटुंबिक सदस्यांच्या समस्या समजून भावनिक आधार देण्याचा प्रयत्न कराल. ताप, सर्दी, खोकला यांची योग्य दखल घ्यावी.

कुंभ चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे हाती घेतलेले काम प्रयत्नपूर्वक पूर्ण कराल. व्यवहारकुशलतेने अडचणींतून मार्ग काढाल. नोकरी-व्यवसायात अधिकाराचे पद भूषवाल. वरिष्ठ व इतर सहकारीवर्ग यांचा मेळ घालाल. सहकारीवर्गाला योग्य सल्ला द्याल. नातेवाईक व मित्रमंडळींसोबत वेळ आनंदात जाईल. जोडीदारासह चांगले सूर जुळतील. एकत्र प्रवास कराल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. हवामानातील बदलाचा प्रकृतीवर परिणाम होईल.

मीन गुरू-चंद्राच्या समसप्तम योगामुळे आपल्या आवाक्याबाहेरील गोष्टींची जबाबदारी पेलवू पाहाल, पण जरा सावधान! जेवढे झेपेल तेवढेच कबूल करा. नोकरी-व्यवसायातील इतरांच्या चुकीचा स्वत:ला मनस्ताप करून घेऊ नका. सहकारीवर्ग मदतीला तत्पर असेल. जोडीदाराचा सल्ला हितावह ठरेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. आतडय़ाचे विकार बळावतील.

Story img Loader