मेष ग्रहस्थिती तुमची परिस्थिती त्रिशंकूसारखी करणारी आहे. नोकरी आणि व्यवसायामध्ये ज्या चांगल्या घटनांची नांदी होईल. त्यामुळे तुमच्यात नवीन उत्साह सळसळेल. खूप काही तरी करावेसे वाटल्यामुळे थांबण्याची तुमची तयारी नसेल. पण मनाच्या कोपऱ्यामध्ये घरगुती जबाबदाऱ्यांची जाणीव झाल्यामुळे मधूनच तुमचे हात बांधल्यासारखे वाटेल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना शब्द देताना जास्त मुदत मागून घ्या. घरामध्ये आवडत्या व्यक्तींच्या आणि विशेषत: मुलांच्या गरजांना प्राधान्य दिले जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वृषभ गेल्या काही महिन्यांत तुम्हाला चांगले ग्रहमान मिळाल्यामुळे जी इच्छा तुमच्या मनात आली ती सहजगत्या पूर्ण झाली. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढला. व्यापार-उद्योगात पशाचे प्रमाण चांगले असल्यामुळे तुमचे इरादे बुलंद असतील. नवीन भागीदारी किंवा मत्रीकराराचे प्रस्ताव पुढे येतील. नोकरीमध्ये नवीन प्रोजेक्ट-करिता लांबच्या प्रवासाची संधी देतील. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये सगळ्यांच्या विचारांचा तुमच्यावर प्रभाव असेल, त्यांच्या सहमतीने एखादे महत्त्वाचे काम तुम्ही पार पाडाल.

मिथुन बहुतांशी ग्रहमान तुम्हाला अनुकूल असल्यामुळे प्रत्येक आघाडीवर तुम्ही एखादे मोठे स्वप्न पाहिले तर त्यात आश्चर्य नाही. व्यापार-उद्योगात कामाचा पसारा वाढवायच्या दृष्टीने काही नवीन करारमदार/ बोलणी होण्याची शक्यता आहे. त्याचा अर्थ निष्णात व्यक्तीकडून समजून घ्या. ज्यांना नोकरी किंवा व्यावसायिक कामानिमित्त परदेशात जायची इच्छा आहे त्यांना चांगला कालावधी आहे. चालू नोकरीत अधिकार गाजवण्याची खुमखुमी तुमच्यात निर्माण होतील. घरामध्ये एखादे मंगलकार्य ठरेल.

कर्क ज्या प्रश्नांनी तुम्हाला गेल्या दोन-तीन आठवडय़ांपासून बराच त्रास दिला होता अशा प्रश्नात एक घाव दोन तुकडे करण्याचा तुम्ही निश्चय कराल. व्यापार-उद्योगात परिस्थिती तुम्हाला अनुकूल होण्याची लक्षणे दिसू लागल्यामुळे तुमच्या इच्छा-आकांक्षा बळावतील. नोकरीमध्ये तुम्हाला वरिष्ठांनी दिलेले आश्वासन पूर्ण झालेले नसेल तर तुमच्यातील बंडखोरवृत्ती जागृत होईल. नोकरीमध्ये बदल करू इच्छिणाऱ्यांना चांगली संधी दिसून येईल. घरामध्ये एखाद्या प्रश्नावर सुरुवातीला वादविवाद होतील.

सिंह जी गोष्ट तुमच्या मनामध्ये आहे. ती पूर्ण करण्याकरिता तुम्ही जंग जंग पछाडाल. वेळप्रसंगी एखाद्या युक्तीचाही वापर कराल. व्यवसाय-उद्योगात उंच भरारी मारण्याकरिता नवीन व्यक्तींशी हातमिळवणी करावीशी वाटेल. परदेश व्यवहारांना चालना मिळेल. नोकरीच्या ठिकाणी आपले महत्त्व वाढविण्याकरिता तुम्ही वरिष्ठांच्या पुढे पुढे कराल. कदाचित त्यातून एखादी नवीन जबाबदारी तुमच्या गळ्यात येऊन पडेल. घरामध्ये नूतनीकरण, साफसफाई किंवा डागडुजी यांसारख्या गोष्टींना महत्त्व द्याल.

कन्या निरभ्र आकाशामध्ये एकदम ढग जमा झाल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते तशी परिस्थिती निर्माण होईल. पण त्याला घाबरून न जाता तुम्ही जर धर्याने काम केले तर मनातली इच्छा पूर्ण करू शकाल. व्यापार-उद्योगात प्रवाहाविरुद्ध जाऊन एखादा निर्णय घेणे भाग पडेल. अशा वेळी तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. हातामध्ये पसे राखून ठेवा. नोकरीमध्ये तुम्हाला न विचारता वरिष्ठ तुमच्या कामाचे स्वरूप बदलून टाकतील. घरामध्ये एखाद्या कटू निर्णयावरून थोडेफार वाद-विवाद होतील.

तूळ ज्यांनी पूर्वी तुम्हाला विरोध केला होता, त्यांच्या नाकावर टिच्चून तेच काम एकटय़ाने पूर्ण करण्याची धमक तुमच्यात निर्माण होईल. व्यवसाय-उद्योगात मध्यस्थांच्या मदतीने एखादे मोठे काम हातात घ्यावेसे वाटेल. नोकरीमध्ये नवीन कामगिरीकरिता तुमची निवड झाल्याने तुम्हाला काही विशेष फायदे संस्थेकडून मिळण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या प्रयत्नात सफल व्हाल. घरामध्ये एखादी जबाबदारी स्वत: शिरावर घेऊन ती पार पाडण्याचे श्रेय मिळवाल. लांबच्या भावंडांना भेटण्याचा योग येईल.

वृश्चिक ग्रहमान सुधारत असल्यामुळे तुमची निराशा कमी होईल. ज्या प्रश्नांमुळे गेल्या तीन-चार महिन्यांत तुम्ही गांजून गेले होतात त्यामध्ये एखादा व्यावहारिक तोडगा सुचेल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात एकेकाळी ज्यांच्याकडून तुम्हाला नकारघंटा ऐकायला लागली होती त्यांच्याकडून सहकार्य मिळण्याची शक्यता निर्माण होईल. नोकरीमध्ये एखादे किचकट काम हातावेगळे करण्यात तुम्ही सफल व्हाल. घरामध्ये मुलांच्या भविष्यात प्रगतीसंबंधी काही समस्या असतील तर त्यावर तुम्ही तोडगा शोधून काढाल.

धनू जरा परिस्थिती सुधारत आहे असे वाटते ना वाटते तोच नवीन अडथळे दिसू लागतील. व्यवसाय-उद्योगात जुन्या पद्धतींना राम राम ठोकून नवीन पद्धत अमलात आणायचे ठरवाल. तुमची कार्यक्षमता वाढावी हाच त्याचा उद्देश असेल. नोकरीमध्ये वरिष्ठांनी तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल करायचे आश्वासन दिले असेल तर त्याचे संकेत मिळतील. मात्र तुम्ही थोडेसे साशंक असाल. सांसारिक जीवनात छोटे-मोठे खटके उडतील. पण तुम्ही त्यात पड खाणार नाही. प्रकृतीच्या कुरबुरीकडे वेळीच लक्ष द्यावे लागेल.

मकर ग्रहमान बदलले की एकंदरीतच सर्व समीकरणे बदलून जातात. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात तुमच्या दृष्टीने जी महत्त्वाची कामे आहेत ती तातडीने संपवण्याचा प्रयत्न करा. नोकरीमध्ये तुमच्या प्रगतीमुळे सहकाऱ्यांच्या मनामध्ये जर असूया निर्माण झाली असेल तर त्याची तुम्हाला जाणीव होईल. तरीही तुम्ही त्याचा परिणाम स्वत:वर न होऊ देता आपले काम नेहमीच्या पद्धतीने चालू ठेवा. घरामध्ये सहसा तुम्ही कोणावरही रागवत नाही. एखाद्या व्यक्तीच्या विचित्र वागण्यामुळे तुमचा रागाचा पारा वर जाईल.

कुंभ मानसिकदृष्टय़ा तुम्ही आता खूप उत्साही असाल. परंतु तुमच्या शारीरिक मर्यादांचा विचार केल्याशिवाय कोणतेही मोठे काम हातात घेऊ नका. व्यापार-उद्योगात इतरांना खूश ठेवून सहभागी करून घेतले तर तुमच्या कष्टाचे प्रमाण कमी होईल. नोकरीमध्ये जास्त फायदे मिळविण्याकरिता आपणहून वरिष्ठांकडे एखादे नवीन काम मागण्यापेक्षा जे काम हातात आहे ते व्यवस्थितपणे संपवून नंतर तुमचा मोहरा नवीन गोष्टींकडे वळवा. घरामध्ये एखाद्या प्रश्नावरती तुमचे विचार इतरांपेक्षा वेगळे असतील

मीन व्यापार-उद्योगात कितीही मोह झाला तरी कोणताही निर्णय बेधडकपणे न घेता त्याच्या भविष्यातील होणाऱ्या परिणामांचा नीट विचार करा. आíथक बाजू जरी समाधानकारक असली तरी हातात पडणाऱ्या पशाची बचत करा. नोकरीमध्ये एखाद्या कामाविषयी तुम्ही वरिष्ठांना आश्वासन दिले असेल. तर ते तुम्हाला पूर्ण करण्याकरिता आग्रह धरतील. गुप्त शत्रूंकडे मात्र बारकाईने लक्ष ठेवा. घरामधील बुजुर्गाचे मत तुम्हाला पटणार नाही. पण नंतर ते बरोबर होते अशी कबुली तुम्ही द्याल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com