01vijayमेष या आठवडय़ात व्यापार-उद्योग, नोकरी आणि व्यक्तिगत जीवनामध्ये ज्या घडामोडी घडतील, त्यामुळे तुम्हाला क्षणाचीही उसंत लाभणार नाही. गुरूसारखा भाग्यवर्धक ग्रह राशीच्या पंचमस्थानात प्रवेश करेल. तेथे त्याचे वास्तव्य एक वर्षांहून अधिक काळ राहणार आहे. ज्यामुळे अष्टमस्थानातील शनीची प्रतिकूलता कमी होईल. व्यवसाय- धंद्यात उत्पन्नाचा एखादा नवीन मार्ग मिळेल. नोकरीमध्ये तुमची अडचण किंवा गरसोय कमी झाल्यामुळे उत्साह वाढेल. काहींची नवीन संधीकरिता निवड होईल.

वृषभ गुरू राशिबदल करून चतुर्थस्थानात म्हणजेच सुखस्थानात प्रवेश करेल. तेथे त्याचे वास्तव्य आता एक वर्षांहून अधिक काळ असेल. या दरम्यान तुमच्या व्यक्तिगत जीवनातील सुखद प्रसंगाची केवळ नांदीच नाही, तर ती पूर्ण झाल्याची भावना तुम्हाला समाधानी करेल. व्यवसाय- उद्योगात मात्र जे चांगले काम केले आहे त्यामध्ये वाढ करण्यापेक्षा त्याचा फायदा घेण्याकडे तुमचा कल राहील. नोकरीच्या ठिकाणी पूर्वी केलेल्या कष्टातून तुम्हाला विशेष सुखसुविधा मिळतील. घरामध्ये शुभकार्य ठरेल आणि पार पडेल.

मिथुन गुरू राशिबदल करून तृतीयस्थानात प्रवेश करेल. तेथे आता गुरूचे भ्रमण एक वर्षांहून अधिक काळ असणार आहे. सर्वागीण प्रगतीच्या दृष्टीने हे गुरूचे भ्रमण तुम्हाला लाभदायक ठरेल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात काही तरी भव्यदिव्य करण्याची कल्पना तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. कारखानदारांना देशात किंवा परदेशात नवीन शाखा उघडाविशी वाटेल. नोकरीमध्ये एखाद्या विशेष कामगिरीकरिता तुमची निवड होईल. व्यक्तिगत जीवनात बराच काळ लांबत आलेली एखादी योजना सफल होण्याचे समाधान लाभेल.

कर्क एका नवीन संक्रमणाच्या उंबरठय़ावर तुम्ही येऊन पोहोचलेले असाल. गुरू धनस्थानात प्रवेश करणार आहे. तेथे त्याचे वास्तव्य आता एक वर्षांहून अधिक कालावधीचे असेल. या दरम्यान तुमच्या आíथक आणि कौटुंबिक जीवनात काही कारणाने बहार येईल. व्यापार-उद्योगात बरकत येईल. प्राप्तीचे प्रमाण वाढल्यामुळे तुम्हाला पशाची चिंता वाटणार नाही. नोकरीमध्ये नेहमीपेक्षा जादा पगारवाढ होईल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये मंगलकार्य ठरेल/ पार पडेल. स्वत:ची वास्तू खरेदी करू शकाल.

सिंह नवीन संधी तुमच्यापुढे असतील. त्याचा फायदा घ्यायला गेल्यावर हातातले काम जाईल, अशी भीती मनात येईल. एक-दोन आठवडे थांबा, सर्व भीती मनातून जाईल. या आठवडय़ात गुरू राशिबदल करून तुमच्याच राशीत येणार आहे. तेथे त्याचे वास्तव्य एक वर्षांहून अधिक काळ असेल. व्यापार-उद्योगातील अडथळे नाहीसे होऊन तुम्ही वेगाने वाटचाल करू शकाल. नोकरीच्या ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त पगारवाढ किंवा पदोन्नती होण्याची शक्यता आहे. घरामध्ये बराच काळ लांबत आलेला एखादा प्रश्न सुटेल.

कन्या तुमची द्विधा मन:स्थिती करणारे हे ग्रहमान आहे. व्यापार-उद्योगात बाजारातील चढउतारांकडे बारकाईने लक्ष द्या. नोकरदार व्यक्तींनी पडेल ते काम करण्याची तयारी ठेवावी. घरामध्ये एखाद्या व्यक्तीच्या अनुपस्थितीमुळे एकाकीपणा जाणवेल. या आठवडय़ात गुरू राशिबदल करून व्ययस्थानात प्रवेश करणार आहे. तेथे त्याचे भ्रमण आता एका वर्षांहून अधिक काळ असणार आहे. या दरम्यान नोकरी व्यवसाय आणि घरगुती जीवन या तीनही आघाडय़ांवर तुमचा पवित्रा सावध ठेवून काम करावे लागेल.तूळ प्रगती करायची म्हटली की, चांगले आणि वाईट अशा दोन्ही अनुभवांकरिता तयार व्हावे लागते. व्यापार-उद्योग आणि नोकरी यामध्ये प्रत्येक कामात तुम्ही पुढाकार घेऊन काही प्रश्न मार्गी लावाल. या आठवडय़ात गुरू राशिबदल करून लाभस्थानात प्रवेश करणार आहे. त्याचे भ्रमण आता तेथे एक वर्षांहून अधिक काळ असेल. नोकरीमध्ये पगारवाढ आणि विशेष सवलतींकरिता तुमची निवड होईल. घरामध्ये माझे तेच खरे असा तुमचा दृष्टिकोन राहील. घरामध्ये अवघड प्रश्नात उकल होईल.

वृश्चिक गुरूसारखा भाग्यवर्धक ग्रह राशिबदल करून दशमस्थानात येणार आहे. त्याचे वास्तव्य आता तेथे एक वर्षांहून अधिक काळ असणार आहे. राशीतील शनीमुळे आलेली निराशा काही प्रमाणात कमी होईल. व्यापार-उद्योगात हाताबाहेर गेलेले प्रश्न मार्गी लागतील. नोकरीमध्ये पगारवाढ किंवा बढती द्यायला वरिष्ठ राजी होतील; व्यापार-उद्योगात नवीन हितसंबंध निर्माण होतील. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या अडचणी समजून घेऊन थोडीफार मदत करतील. घरामध्ये बुजुर्ग व्यक्तींचा सल्ला लक्षात घेतला तर त्याचा उपयोग होईल.

धनू प्रगतीच्या एका नवीन वळणावर तुम्ही येऊन पोहोचले असाल. त्यातून काही तरी चांगले घडेल असा तुम्हाला विश्वास वाटेल. व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगतीकारक घटनांची नांदी होईल, तर सांसारिक जीवनात काही शुभसंकेत मिळतील. या आठवडय़ात गुरू राशिबदल करून भाग्यस्थानात प्रवेश करणार आहे. तेथे त्याचे वास्तव्य आता एक वर्षांहून अधिक काळ असेल. हा संपूर्ण कालावधी तुमच्या इच्छा-आकांक्षा पल्लवित करणार आहे. व्यापारामध्ये नवीन कामे मिळतील आणि खर्चाचे प्रमाण कमी होईल.

मकर प्रगती म्हटली की, जीवनामध्ये बदलांना सामोरे जावे लागते. गुरूसारखा प्रभावी ग्रह राशीच्या अष्टमस्थानात येईल. तेथे त्याचे वास्तव्य एका वर्षांहून अधिक काळ असेल. तुम्ही तुमची मर्यादा सोडली, तर त्याचा भरुदड तुम्हाला सहन करावा लागेल. व्यापार-उद्योगात आपल्या आíथक कुवतीचा विचार करून सर्व निर्णय घ्याल. घरामध्ये ‘कर्तव्य हीच काशी’ असे धोरण उपयोगी पडेल. स्वत:च्या प्रकृतीकडे लक्ष ठेवा. नोकरी आणि व्यवसाय-उद्योगातील कामे तातडीने उरका. घरामधल्या वाढत्या खर्चाकरिता तरतूद करून ठेवा.

कुंभ ग्रहमान तुमच्यामध्ये एक वैचारिक नांदी करणारे आहे. व्यापार-उद्योग आणि नोकरीच्या कामात आधुनिकीकरणाला तुम्ही महत्त्व द्याल. कौटुंबिक जीवनात काही तरी चांगले घडेल असे तुम्हाला वाटत राहील. गुरू राशिबदल करून या आठवडय़ात राशीच्या सप्तमस्थानात प्रवेश करेल. तेथे त्याचे वास्तव्य आता पुढील एक वर्षांहून अधिक काळ असणार आहे. व्यापारात तुमच्या कौशल्यांना चालना मिळाल्यामुळे मनाप्रमाणे काम करू शकाल. नोकरीमध्ये संस्थेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी वरिष्ठ तुम्हाला देतील.

मीन विशिष्ट ग्रहमान आले की, माणसाच्या आचारविचारात आपोआप फरक पडायला सुरुवात होते. नोकरीमध्ये कोणाच्याही मदतीशिवाय चांगले काम कराल. घरामध्ये सगळ्यांची मोट बांधणे थोडेसे कठीण होईल. या आठवडय़ात गुरू राशिबदल करून षष्टस्थानात प्रवेश कराल. तेथे तो बारा महिन्यांपासून अधिक काळ राहील; पण तुमची मर्यादा ओळखून वागा. व्यापारात स्पर्धकांकडे लक्ष ठेवा. नोकरीमध्ये आव्हानात्मक पण कष्टदायक काम तुमच्या वाटय़ाला येईल.
विजय केळकर response.lokprabha@expressindia.com

Story img Loader