01vijayमेष प्रत्येक आघाडीवर तुमच्यापुढे एक नवीन आव्हान असेल, पण तुम्ही ते समर्थपणे हाताळण्या-साठी सक्षम व्हाल. व्यापार-उद्योगात हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नका. मत्री आणि पसा यांची गल्लत करू नका. नोकरीमध्ये तुमचे स्पर्धक आणि हितशत्रू छोटेसे कारण काढून वरिष्ठांकडे कागाळ्या करतील, पण तुम्ही तुमचे काम चालू ठेवा. घरामध्ये इतरांना तुम्ही शिस्तीचे धडे शिकवाल. वेळ आल्यावर मात्र स्वत:च बजेटबाहेर जाऊन पसे खर्च कराल. स्वत:चीच एखादी हौसमौज भागवून घ्याल.

वृषभ तुमच्या अवतीभवती ज्या व्यक्ती असतील त्यांचे वागणे, बोलणे आणि अंतरंग यांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक असेल. त्यामुळे कोणाशी कसे वागावे, असा तुमच्यापुढे प्रश्न असेल. व्यापार-उद्योगामध्ये काही व्यक्ती गोड बोलून तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. नोकरीत वरिष्ठ आणि सहकारी तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवून त्यांचा मतलब साध्य करून घेतील. लांबच्या प्रवासाचे बेत पुढे ढकलले जातील. घरामध्ये सगळ्यांची मोट बांधणे कठीण जाईल. त्याकरिता स्वत:च्या हौसेला मुरड घालावी लागेल.

मिथुन सगळे काही चांगले आहे, असे ग्रहमान सुचवते. पण तुम्ही मात्र काहीच ठीक चालले नाही, असे उद्गार तुम्ही तुमच्या तोंडून काढाल. त्यामुळे सभोवतालच्या व्यक्तींना खरे काय आणि खोटे काय असा संभ्रम पडेल. व्यापार-उद्योगात एखादी जुनी आणि किचकट वसुली हातात पडू शकेल. जोडधंद्यात काम करताना गिऱ्हाईकांच्या शब्दाला मान द्या. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या सूचनांचा अर्थ नीट समजल्याशिवाय कामाला सुरुवात करू नका. घरामध्ये जुने प्रॉपर्टीसंबंधी किंवा वाटण्यांसंबंधीचे प्रश्न नव्याने डोके वर काढण्याची शक्यता आहे.

कर्क ‘मानलं तर समाधान’ अशी एकंदरीत तुमची परिस्थिती असणार आहे. व्यापार-उद्योगात घाईगडबडीत कोणाला कसलेच आश्वासन देऊ नका किंवा नवे करार करू नका. नोकरीमध्ये प्रत्यक्ष काम कमी आणि दिखावा जास्त असा प्रकार असेल. संस्थेकडून मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा गरफायदा घेण्याकडे तुमचा कल राहील. घरामध्ये काटकसरीने आणि शिस्तीचे धडे तुम्ही इतरांना शिकवाल, पण स्वत: मात्र वारेमाप पसे खर्च कराल. जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ती मिळवल्याखेरीज चन पडणार नाही.

सिंह जेव्हा आपल्या मनामध्ये एकाच वेळी अनेक विचार घोळत असतात त्या वेळी कशाला महत्त्व द्यावे असा संभ्रम निर्माण होतो. तशी तुमची स्थिती या आठवडय़ात असेल. व्यापार-उद्योगात मालाची विक्री आणि फायद्याचे प्रमाण वाढविण्याकरिता एखादी नवीन शक्कल लढवाल. नोकरीमध्ये तुमच्या कौशल्याचा आणि विशिष्ट प्रावीण्याचा वरिष्ठ उपयोग करून घेतील. त्याच्या बदल्यात एखादी खास सवलत देतील. घरामध्ये सर्वाना आवडणारी योजना तुम्ही ठरवाल. त्यामध्ये किती पसे खर्च करायचे या विषयावर तुमचे इतरांशी मतभेद होतील.

कन्या एखादी गोष्ट जेव्हा करायची नसते, त्या वेळी तीच गोष्ट करण्याचा मोह आवरता येत नाही, अशी तुमची स्थिती असेल. व्यापार-उद्योगात पशाचे प्रमाण थोडेसे अपेक्षेपेक्षा कमी असल्याने राजमार्गाने जाण्यापेक्षा वाकडी वाट करून जावेसे वाटेल. पण नंतर त्यातून गुंतागुंत होईल. नोकरीमध्ये एकदम कृती न करता त्यावर विचार करून योग्य काय आणि अयोग्य काय हे तुम्ही समजू शकाल. घरामध्ये प्रिय व्यक्ती एखाद्या महागडय़ा वस्तूची मागणी तुमच्यासमोर ठेवतील. त्यामुळे तुम्ही त्यात टाळाटाळ कराल.

तूळ तुमच्या राशीला उत्तम बुद्धिमत्ता लाभलेली आहे, परंतु व्यावहारिक जीवनात तुमचाच फायदा होणार आहे. व्यावसायिक जागेचे सुशोभीकरण किंवा सजावट कराल. सध्याच्या कामामध्ये आधुनिक तंत्राचा वापर करण्याचा बेत असेल. खेळते भांडवल बँक किंवा इतर मार्गाने उपलब्ध होईल. नोकरीच्या कामात उत्तम काम केल्यामुळे वरिष्ठ तुमचे कौतुक करतील, पण अधिकारांचा वापर मात्र जपून करा. घरामध्ये सर्वाना खूश करण्याकरिता मेळावा आयोजित कराल. आवडीच्या वस्तू खरेदी करण्याचे नियोजन होईल.

वृश्चिक सकृद्दर्शनी तुमची स्थिती खूप चांगली आहे, असे इतरांना वाटेल. पण प्रत्येक गोष्ट मिळविण्याकरिता जी धडपड करावी लागेल ती तुमची तुम्हालाच माहीत असेल. व्यापार-उद्योगात एखादी नवीन योजना नजीकच्या भविष्यात कार्यान्वित कराविशी वाटेल. नोकरीमध्ये वरिष्ठ केलेल्या कामाचे श्रेय तुम्हाला देतील, पण त्या कामाकरिता व्यक्तिगत सुखात कमतरता सहन करावी लागेल. घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला समाधानी ठेवण्यामध्ये तुम्हाला बरीच तडजोड करावी लागेल. बुजुर्ग व्यक्तींशी त्यांची मते पटणार नाहीत.

धनू अनेक संधी एकाच वेळी तुमच्यापुढे असल्यामुळे त्यातील कोणत्या संधीला महत्त्व द्यावे, असा तुमच्यापुढे प्रश्न पडेल. व्यवसाय-उद्योगात प्राप्ती वाढविण्यासाठी एखादा वेगळा प्रयोग तुम्हाला करावासा वाटेल. बेकार व्यक्तींनी जास्त चिकित्सा केली नाही तर त्यांना काम मिळू शकेल. सध्याच्या नोकरीत वरिष्ठ तुमच्याकडून मोठय़ा अपेक्षा ठेवतील. घरामध्ये सगळे काही ठीक वाटेल. पण तुम्ही स्वत: घराकडे लक्ष देऊ न शकल्यामुळे इतरांची थोडीशी चिडचिड सहन करावी लागेल.

मकर एखादी गोष्ट आपल्याला तत्त्वत: मान्य नसते, परंतु प्राप्त परिस्थितीशी तडजोड करून आपल्याला पुढे सरकत राहावे लागते. सध्याचे तुमचे ग्रहमान थोडेसे असेच आहे. व्यापार-उद्योगात प्राप्तीचे प्रमाण थोडेसे कमी झाल्याने तुम्ही चिंतेत पडाल. अशा वेळी ज्यांना तुमच्याकडून स्वार्थ साधायचा आहे, अशा व्यक्ती तुमच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करतील. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या सूचना आणि त्यांचा अर्थ नीट समजून घ्या. नाही तर केलेले काम वाया जाईल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींशी विनाकारण गरसमज होतील.

कुंभ सर्व काही व्यवस्थित चालले आहे, असे समजून तुम्ही थोडेसे बिनधास्त व्हाल. व्यापार-उद्योगात बाजारातील स्पध्रेनुसार तुम्हाला तुमचे अस्तित्व टिकवण्यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागतील. नोकरीमध्ये एखाद्या न आवडणाऱ्या सहकाऱ्याबरोबर काम करणे भाग पडेल. त्याची कार्यपद्धती पसंत न पडल्यामुळे कामामध्ये विलंब होईल. वरिष्ठांची आज्ञा विसरून गेलात तर त्यांना राग येईल. घरामध्ये तुमच्या हट्टी आणि आडमुठय़ा स्वभावाचे इतरांना दर्शन होईल. त्यावरून तुमच्यावर टीका होण्याची शक्यता आहे.

मीन तुम्ही नुसतेच काम करत नाही तर यामध्ये एक प्रकारची आत्मीयतासुद्धा असते आणि ज्या वेळेला तुम्ही इतरांकडून त्याच्या परतफेडीची अपेक्षा ठेवता तेव्हा तुमची निराशा होते. व्यवसाय-उद्योगात व्यावसायिक जागेची दुरुस्ती, सुशोभीकरण करून गिऱ्हाईकांना आकर्षति करण्याची योजना आखाल. घरामध्ये सगळ्यांचा मौजमजेचा मूड असेल, पण तोंडे वेगवेगळ्या दिशेला असल्याने कोणताच बेत निश्चित होणार नाही.

Story img Loader