सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष रवी-गुरूच्या युतीयोगामुळे महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचे प्रयत्न कराल. आत्मविश्वास वाढेल. आíथक उन्नती होईल. नोकरी-व्यवसायात आपले विचार ठामपणे मांडाल. सहकारी वर्गाकडून अपेक्षित मदत मिळेल. त्यांच्या सहाय्यामुळे मोठे लाभ होतील. जोडीदाराचा उत्कर्ष होईल. त्याच्यासह वेळ आनंदात जाईल. कौटुंबिक वातावरण उत्साहाचे असेल. मित्रमंडळींच्या कुटुंबासाठी धावपळ करावी लागेल. अ‍ॅलर्जीची सर्दी त्रासदायक ठरेल. वैद्यकीय उपाय काही काळ चालू ठेवावेत.

वृषभ चंद्र-शुक्राच्या युतीयोगामुळे सुखाची अभिलाषा बाळगून त्याचा उपभोग घ्याल. कलेचा आस्वाद घ्याल. नोकरी-व्यवसायात गतीला विरोध होईल. शांत डोक्याने विचार करून निर्णय घ्याल. सहकारी वर्गाला मदतीचा हात पुढे कराल. जोडीदाराची त्याच्या हिमतीच्या जोरावर प्रगतीच्या दिशेने वाटचाल होईल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या समस्या समजून घ्याल. सर्दी-खोकला अंगावर काढू नका. रक्ताभिसरणाकडे लक्ष असू द्या.

मिथुन गुरू-रवीच्या युतीयोगामुळे आत्मविश्वास  बळावेल. योजलेली कामे वेळेत पूर्ण कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांना आपले म्हणणे समजावून द्याल. त्यांचा पािठबा मिळवाल. सहकारी वर्गाची विशेष मदत लाभेल. वैयक्तिक व संस्थेच्या दृष्टीने ती लाभकारक ठरेल. जोडीदार आपल्या कार्यक्षेत्रात अधिक व्यस्त असेल. त्यामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या आपल्यालाच पेलाव्या लागतील. मित्रपरिवार मदतीला धावून येईल. उष्णता व उत्सर्जन संस्था यांचे त्रास सतावतील.

कर्क चंद्र-मंगळाच्या लाभ योगामुळे यश मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहाल. कामातील उत्साह वाढेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. ज्येष्ठ वरिष्ठांच्या अनुभवाचे बोल उपयोगी पडतील. सहकारी वर्गाचे प्रश्न व्यवस्थापकांपुढे मांडाल. अन्यायाला वाचा फोडाल. जोडीदाराचा चांगला पािठबा मिळेल. कौटुंबिक वातावरण उत्साही ठेवण्यात जोडीदाराचा मोठा वाटा असेल. हृदयाचे आरोग्य जपा. कुटुंबासह निवांतपणे काही काळ घालवणे उपयुक्त ठरेल.

सिंह बुध-हर्षलच्या नवपंचम योगामुळे आपल्या चांगल्या स्मरणशक्तीचा योग्य उपयोग करून घ्याल. आपले मुद्दे स्पष्टपणे मांडाल. नोकरी-व्यवसायात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर कराल. वरिष्ठांकडून वाहवा मिळवाल. आíथक ताळमेळ साधाल. सहकारी वर्गाला  काही आश्वासने द्यावी लागतील. जोडीदारासह वेळ आनंदात जाईल. कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. घरातील आपल्या धाकासोबत थोडे प्रेमही व्यक्त करावे. मूत्राशयाच्या तक्रारी डोकं वर काढतील.

कन्या गुरू-बुधाच्या युतीयोगामुळे बुधाचा व्यवहारी दृष्टिकोन आणि गुरूचे ज्ञान यांचा सुरेख मिलाप होईल. नोकरी-व्यवसायात प्रगती कराल. वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारी वर्गाच्या अनुभवातून नव्या गोष्टी शिकण्याची तयारी दाखवाल. जोडीदाराशी विचार जुळतील. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. विचारांमधील सकारात्मकतेमुळे आजारातून लवकर बरे व्हाल.

तूळ चंद्र-बुधाच्या लाभयोगामुळे आत्मविश्वास वाढेल. व्यवहार कुशलतेने काही मुद्दे नव्याने पुढे आणाल. नोकरी-व्यवसायात जुन्या परिचयातल्या वरिष्ठांच्या भेटीगाठी होतील. अनुभवातून शहाणपण शिकाल. सहकारी वर्ग मदत करेल तसेच आपणही त्यांना मार्गदर्शन कराल. जोडीदाराचे वेळापत्रक थोडे निराळे असेल. दोघेही स्वतंत्रपणे कौटुंबिक जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडाल. कौटुंबिक वातावरण उत्साही असेल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींवर वेळेवर उपाय योजा.

वृश्चिक चंद्र-मंगळाच्या केंद्र योगामुळे भावनांवर विचारांचा ताबा ठेवावा लागेल. धरसोडपणा उपयोगी पडणार नाही. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांकडून समजुतीच्या चार गोष्टी ऐकाव्या लागतील. सहकारी वर्गाचा पािठबा मिळवण्यासाठी त्यांचे विचार ऐकून घ्यावेत. जोडीदाराची साथ चांगली मिळेल. एकमेकांना पूरक असे विचार मांडाल. कौटुंबिक वातावरण आनंदी व उत्साही राहील. नव्या ओळखी होतील. अति थंड व अति उष्ण पदार्थाचे सेवन टाळा. पोटाचे आरोग्य अचानक बिघडेल.

धनू चंद्र-नेपच्युनच्या लाभयोगामुळे मानसिक शक्ती वाढेल. अडचणींवर मात करण्यासाठी धर्य एकवटाल. उपजत कलागुणांना वाव मिळेल. नोकरी व्यवसायात आपले मत वरिष्ठांना समजावून द्याल. सहकारी वर्गाला दिलेला शब्द पाळतील. व्यावसायिक नाती जपाल. जोडीदारासह तात्कालिक कारणांवरून वाद झाला तरी त्यात कटुता येऊ देऊ नका. कुटुंबातील सदस्यांचा भावनिक आधार मिळेल. घशाला इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता आहे.

मकर चंद्र-मंगळाच्या लाभयोगामुळे चांगल्या कामासाठी चिकाटी धरून ठेवाल. आप्तेष्टांना मदत करण्यासाठी धडाडीने पुढे व्हाल. नोकरी-व्यवसायात आपले निर्णय संस्थेच्या हिताचे असले तरी ते सर्वानुमते मान्य केले जाणार नाहीत. वरिष्ठांचे पाठबळ मिळवण्यासाठी खूप कष्ट घ्याल. सहकारी वर्गाकडून अपेक्षित पािठबा मिळणार नाही. आपले हक्क, अधिकार झगडून प्राप्त करून घ्यावे लागतील.  कौटुंबिक मतभिन्नतेमुळे मानसिक स्वास्थ्य बिघडेल.

कुंभ शनी-चंद्राच्या लाभयोगामुळे साधकबाधक विचार करून मगच अंतिम निर्णय घ्याल. व्यवहारी दृष्टिकोन फार उपयोगी पडेल. नोकरी-व्यवसायात भरीव कार्य करण्याची संधी उपलब्ध होईल. चांगल्या  प्रकल्पाचे योग्य नेतृत्व कराल. सहकारी वर्गाकडून वेळेत काम पूर्ण करून घ्याल. मार्गात येणाऱ्या अडचणींवर उपाय योजाल. जोडीदाराची त्याच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल. वाढत्या जबाबदारीची जाण ठेवाल. अतिश्रमामुळे अंगदुखी संभवते.

मीन गुरू-चंद्राच्या केंद्रयोगामुळे मनाप्रमाणे खरेदी कराल. अनाठायी खर्चाला लगाम घालणे आवश्यक! नोकरी-व्यवसायात काही वेळा महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होईल. सहकारी वर्ग आपल्या अनुभवातून मोलाचे मार्गदर्शन करेल. जोडीदार त्याच्या कामात व्यस्त असेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. दगदगीने शारीरिक थकवा जाणवेल. विश्रांतीची आवश्यकता जाणवेल.

Story img Loader