सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मेष चंद्र-हर्षलच्या युती योगामुळे मनातील विचार सत्यात आणाल. परंतु विचार न करता कृती नसावी. नोकरी-व्यवसायात हाती घेतलेल्या कामात दिरंगाई झाली तरी धीर सोडू नका. पाठपुरावा करत राहा. वरिष्ठांचा मार्गदर्शनाखाली नव्या गोष्टी शिकून घ्याल. सहकारी वर्ग आपल्या समस्या मांडेल. जोडीदाराचे हट्ट पुरवावे लागतील. नातेवाईक, मित्र-मत्रिणी यांच्या भेटीगाठी होतील. अचानक खर्च वाढतील. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. अपचन व पित्ताचा त्रास होईल.
वृषभ बुध-शुक्राच्या लाभ योगामुळे कला व व्यवहाराचा सुरेख मेळ साधाल. अर्थार्जन चांगले होईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. ज्येष्ठ मंडळींच्या कामाच्या पद्धतीत बदल कराल. नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराल. सहकारी वर्गाचे साहाय्य मिळेल. जोडीदाराची त्याच्या कार्यक्षेत्रात धावपळ होईल. कौटुंबिक समस्या समजून घेऊन सोडवाल. सत्याची कास सोडू नका. पडणे, मार लागणे, घसरणे यापासून सावधान!
मिथुन आत्माकारक रवी आणि मनाचा कारक चंद्र यांच्या लाभ योगामुळे मनातील भावना आणि विचार यांचा समतोल राखाल. नोकरी-व्यवसायात उत्तम कामगिरी पार पाडाल. वरिष्ठांची शाबासकी मिळवाल. सहकारी वर्गाला योग्य प्रकारे प्रशिक्षण देऊन तयार कराल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. न पटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष कराल. अतिचिकित्सा व ऊहापोह करणार नाही. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. उष्णतेचे विकार सतावतील. फोड येतील.
कर्क चंद्र व शुक्र या स्त्री ग्रहांच्या लाभ योगामुळे कलाक्षेत्रात प्रगती होईल. नातेसंबंध दृढ होतील. मित्रपरिवार, नातेवाईक यांची आपुलकी जपाल. नोकरी-व्यवसायात कला व तंत्रज्ञानाचा योग्य समन्वय साधाल. सहकारी वर्गाकडून मदत मिळेल. अनुभवी लोकांचे मार्गदर्शन लाभेल. जोडीदाराच्या कर्तृत्वाला साजेशी दाद मिळेल. एकमेकांचा अभिमान बाळगाल. लहानमोठा प्रवास कराल. जखम चिघळल्यास दुखणे वाढेल. त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावा.
सिंह चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे उमेद व उत्साह वाढेल. परंतु उतावीळपणाने कोणताही निर्णय घेऊ नका. नुकसान होऊ शकते. नोकरी-व्यवसायात सध्या तरी बदलाचा विचार उपयोगाचा नाही. आहे त्या परिस्थितीत सुधारणा होईल. सहकारी वर्गात गरसमज पसरतील. हितशत्रूंना वाव देऊ नका. जोडीदारासह सूर जुळतील. विचारांची देवाणघेवाण कराल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. पाठीचा मणका व गुडघे यांचे आरोग्य जपा. अतिताण येऊ देऊ नका.
कन्या शुक्र-शनीच्या केंद्र योगामुळे शुक्राच्या स्वच्छंदीपणाला शनीच्या चिकाटीचा लगाम बसेल. त्यामुळे कामात सातत्य राखाल. नोकरी व्यवसायात सरकारी कामे मार्गी लागतील. प्रयत्न सोडू नका. सहकारी वर्गाची मदत कराल. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. कौटुंबिक वातावरण धावपळीचे जाईल. कामाच्या धकाधकीत मज्जासंस्थेचे आरोग्य जपा. औषधांसह व्यायामाचीही गरज भासेल.
तूळ चंद्र-नेपच्युनच्या लाभ योगामुळे नावीन्यपूर्ण विचारांना वाव द्याल. कलात्मक गोष्टींमध्ये मन रमेल. उत्साह वाढेल. नोकरी-व्यवसायातील निर्णयात अचानक काही बदल करावे लागतील. नवी आव्हाने स्वीकाराल. सहकारी वर्गात नाराजी पसरेल. त्यांच्या अडचणी जाणून घ्याल. जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करताना जास्त ताण घेऊ नका. सामंजस्याने वागाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. भावंडांची मदत कराल. रक्तातील साखरेवर ताबा ठेवा.
वृश्चिक चंद्र-बुधाच्या नवपंचम योगामुळे व्यवहारचातुर्य दाखवाल. समयसूचकतेमुळे कमी श्रमात अधिक काम पूर्ण कराल. चांगले विचार आचरणात आणाल. नोकरी-व्यवसायात ध्येयाकडे वाटचाल कराल. वरिष्ठांचा पािठबा मिळाला नाही तरी धीर धरा. आपले मत प्रभावीपणे मांडाल. जोडीदारासह वेळ आनंदात घालवाल. आíथक गुंतवणूक करताना काळजी घ्या. खर्च कमी करा. मूळव्याधीचा त्रास उद्भवल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल.
धनू चंद्र-बुधाच्या लाभ योगामुळे भावना व विचारांचा समतोल राखाल. वैचारिक पातळी उंचावेल. नोकरी-व्यवसायात स्मरणशक्तीच्या जोरावर आपली बाजू आणि मत ठामपणे मांडाल. सहकारी वर्गाचे साहाय्य मिळेल. नियोजित काम वेळेत पूर्ण कराल. जोडीदाराच्या मताशी सहमत नसलात तरी वाद वाढवू नका. काही गोष्टी सोडून द्याव्या लागतील. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. आहारात गोडावर नियंत्रण ठेवा. वेळेवर काळजी घेणे आवश्यक!
मकर बुद्धीचा कारक बुध व आधुनिक तंत्रज्ञानाचा कारक हर्षल यांच्या लाभ योगामुळे आगळेवेगळे बौद्धिक छंद जोपासाल. अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपले सादरीकरण उच्च प्रतीचे होईल. नोकरी-व्यवसायात संशोधन व विकास कार्यात मोलाची कामगिरी कराल. मेहनतीचे फळ मिळेल. नवे करार लाभदायी ठरतील. जोडीदाराच्या साथीने कठीण प्रसंगातून मार्ग काढाल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे लागेल. सामंजस्याने वागावे.
कुंभ गुरू व चंद्र या शुभ ग्रहांच्या नवपंचम योगामुळे ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल. त्यांच्या मार्गदर्शनामुळे नवी दिशा मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती कराल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांचा पािठबा मिळेल. आपल्या कामाची दखल घेतली जाईल. नव्या ओळखीतून कामे गतिमान होतील. सहकारी वर्ग योग्य निर्णय घेईल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. जबाबदाऱ्या पार पाडाल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कफ व वात विकार बळावतील. दुर्लक्ष करू नका.
मीन शनी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे अंगी चिकाटी व सातत्य येईल. अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा ध्यास घ्याल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी राखाल. वेळेचे भान ठेवाल. आपल्या अधिकारांचा उपयोग करून गरजूंना मदत कराल. जोडीदाराची मनधरणी करावी लागेल. एकमेकांची मते समजून घेणे आवश्यक! कौटुंबिक वातावरण त्रस्त राहील. श्वसन संस्था सांभाळा. प्रदूषणाचा त्रास होईल.